नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये IPO म्हणजे काय आणि आयपीओ बद्दल सर्व माहिती (IPO information in Marathi) पाहणार आहोत.
आयपीओ चा अर्थ काय होतो (IPO meaning in marathi)
सर्वात अगोदर आपण आयपीओ चा नेमका अर्थ काय होतो हे पाहू.
तर आयपीओ म्हणजे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offer).
सोप्या शब्दात कुठलीही कंपनी जेव्हा सर्वसामान्य लोकांना आपल्या कंपनी मध्ये पैसे गुंतवण्याची पहिली संधी देते त्यालाच प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offer) असे म्हणतात.
आयपीओ म्हणजे काय उदाहरणासहित | IPO information in Marathi
आता आपण आयपीओ म्हणजे काय हे एका उदाहरणातून पाहू.
समजा तुम्ही एक कंपनी सुरू केली. काही दिवसातच तिचा धंदा खूप चांगला वाढला आणि आता तुम्हाला कंपनीचा विस्तार करायचा आहे.
पण विस्तार करायचा म्हंटल की त्यासाठी भांडवल लागणार. आता तुमच्या कडे 2-3 पर्याय असणार.
एक तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता किंवा तुम्ही कोणाकडून पैसे उसने घेऊ शकता.
बँकेकडून कर्ज घेतले तर त्यावर तुम्हाला भरपूर व्याज द्यावे लागेल. सोबतच कोणी उसने पैसे देईल याची पण काही खात्री देता येत नाही.
मग तुम्ही म्हणाण की या व्यतिरिक्त काही पर्याय आहे का ? तर आहे . तुम्ही सर्व सामान्य लोकांकडून पैसे उचलू शकता आणि यालाच आयपीओ असे म्हणतात.
आता तुम्ही म्हणाण की यात त्या सामान्य लोकांचा काय फायदा.
हे सामान्य लोक तुमच्या कंपनीचे हिस्सेदार होतात. म्हणजे जेवड्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले आहेत तेव्हडा हिस्सा त्यांना मिळतो.
तर मित्रांनो जेव्हा तुमची कंपनी ग्रो होईल तिचा विस्तार होईल तेव्हा तिचे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे किंमत वाढेल आणि पर्यायी सामान्य लोकांनी गुंतवलेल्या पैशयात ही वाढ होईल.
सोबतच जेव्हा कंपनी नफा कामावते तेव्हही त्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदारांना मिळतो .
आयपीओचे प्रकार
मित्रांनो आयपीओचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात-
- बूक बिल्ड आयपीओ (Book-Build IPO)
- फिक्स्ड प्राइस आयपीओ (Fixed Price IPO)
बूक बिल्ड आयपीओ (Book-Build IPO)
या प्रकारात अगोदर 20% शेअर वरती बोली लावण्यात येते आणि नंतर एक प्राइस बँड निच्छित करण्यात येतो, उदारणार्थ 150-200 याप्रकारे.
फिक्स्ड प्राइस आयपीओ (Fixed Price IPO)
तुम्हाला नावावरून अंदाज आलाच असेल की या प्रकारात आयपीओ मधील शेअर ची किंमत फिक्स्ड असते.
या प्रकारात आयपीओची खरी मागणी बाजारात किती आहे याचा अंदाज लागत नाही.
आयपीओ क्लोज झाल्या नंतरच त्या कंपनीची बाजारातील मागणी कळते कारण त्या नंतर शेअर मार्केट मध्ये ट्रेड व्यायला लागतात.
आयपीओशी निगडीत काही संकल्पना
- Opening Date – ज्या तारखेला आयपीओ सर्व लोकांसाठी खुला करण्यात येतो ती तारीख.
- Closing Date – आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख.
- Allotment Date – ज्या तारखेला शेअर वाटपाची माहिती मिळते.
- Refund Date – जर तुम्हाला आयपीओ मध्ये शेअर नाही भेटले तर तुमची रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्याची तारीख.
- Date Credit of Shares – या तारखेला तुम्हाला मिळालेले शेअर्स तुमच्या डेमॅट खात्यात जमा होतात.
आयपीओ मध्ये गुंतवणूक कशी करतात ?
मित्रांनो आजकाल आयपीओ अप्लाय करणे अगदी सोपे आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तर तुमच्या कडे डिमॅट अकाउंट नक्कीच असेल.
तुम्ही ज्या ॲपचा वापर करत असाल त्यात तुम्हाला आयपीओचा पर्याय भेटेल.
उदारणार्थ येथे आपण Upstox चे उदाहरण पाहू.
ॲप उघडल्या नंतर तुम्हाला पुढील पर्याय दिसेल-
येथे तुम्हाला इन्वेस्ट इन आयपीओ चा पर्याय दिसेल. सोबत तुम्हाला वेगवेगळे आयपीओ जे की सध्या सुरू आहेत ते दिसतील.
जेव्हा तुम्ही एखादा आयपीओ निवडाल तेव्हा त्या आयपीओ बद्दलची सर्व माहिती ही त्याच ठिकाणी देलेली असते.
तुम्ही याचा उपयोग करून अधिकची माहिती घेऊ शकता. जसे कंपनी काय करते तिचे मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे.
आयपीओ ची तारीख किती आहे , आणि अशी बरीच माहिती यात दिलेली असते.
आयपीओ बद्दलचे काही महत्वपूर्ण मुद्दे
- मित्रांनो आयपीओ मध्ये दर वेळेस फायदा होईलच असे नाही.
- कुठला पण IPO बाजारातयेण्या अगोदर SEBI द्वारे त्या कंपनी ची संपूर्ण माहिती घेऊन ती माहिती पब्लिक केली जाते.
- कुठली पण कंपनी जेव्हा IPO लॉंच करते तेव्हा त्या आयपीओ मधून कमीत कमी 25 कोटीचे भांडवल उभा राहिले पाहिजे असा सेबीचा नियम आहे.
- IOP मधून कमी कालावधीत जास्त नफा कामावण्याची संधी असते . पण ही गोष्ट नेहमीच खरी असेल असे नाही. म्हणून योग्य टी माहिती आणि रिसर्च करून कुठली पण गुंतवणूक करणे फायद्याचे असते.
- आयपीओ मध्ये गुंतवणूककरण्या अगोदर त्या कंपनीचे अनॅलिसिस करणे आणि सर्व माहिती घेणे महत्वाचे असते.
IOP आणि FPO मधील फरक
जसं की एखादी कंपनी पहिल्यांदा बाजारातून पैसा उचलते तेव्हा त्याला आपण आयपीओ (IPO) असे म्हणतो.
पण जेव्हा कंपनीला परत पैश्यांची गरज असते आणि परत ती कंपनी मार्केट मधून पैसे उचलते तेव्हा त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) असे म्हणतात.