FD का म्युच्युअल फंड? | FD vs Mutual Fund
FD vs Mutual Fund: मित्रांनो आजच्या आर्थिक युगात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि म्युच्युअल फंड (MF) हे दोन्ही पर्याय गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. पण, या दोघांमध्ये निवड करताना गुंतवणूकदारांची गरज, जोखीम घेण्याची तयारी, आणि आर्थिक उद्दिष्टांचा विचार करणे महत्त्वाचे असते
चला तर मग आज तुमचे हे कन्फ्युजन दूर करू आणि तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवले पाहिजे एफडी की म्यूचुअल फंड हे पाहू.
फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय?
फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एक असा गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम निश्चित कालावधीसाठी ठेवता. या ठेवीवर तुम्हाला पूर्वनिर्धारित व्याज दर मिळतो. भारतात जानेवारी 2025 नुसार हा दर 7.25% आहे. RBI हा दर गरजेनुसार आणि काळानुसार बदलात राहते. म्हणून गुंतवणूक करताना एकदा लटेस्ट एफडी रेट काय आहे तपासून घ्या.
फिक्स्ड डिपॉझिटचे फायदे
- जोखीममुक्त पर्याय: FD हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो, कारण तुमची रक्कम बँकेत संरक्षित असते.
- स्थिर व्याजदर: व्याज दर निश्चित असल्यामुळे बाजारातील चढ-उताराचा तुमच्या रिटर्नवर परिणाम होत नाही.
- कर सवलत: काही FD योजनेत तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो (उदा. काही 5 वर्षांच्या करबचत FD).
काही चांगल्या FD योजना जर तुम्हाला हव्या असतील तर आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.
फिक्स्ड डिपॉझिटची मर्यादा
- महागाई दर वाढला तरी व्याजदर स्थिर असल्यामुळे प्रत्यक्षात रिटर्न कमी होऊ शकतो.
- दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी रिटर्न तुलनेने कमी असतो.
FD चा रिटर्न Calculate करण्यासाठी तुम्ही आमचे FD Return कॅल्कुलेटर वापरू शकता.
Income tax on interest on fixed deposit
मित्रांनो तुमच्या FD वर मिळालेल्या व्याजावर आयकर लागू होतो, जो तुमच्या एकूण उत्पन्नावर आधारित असतो.
FD व्याजावर कर
- कर स्लॅब: FD वरील व्याजावर कर तुमच्या उत्पन्नाच्या कर स्लॅबप्रमाणे लागू होतो. 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असते, परंतु त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर लागतो.
- व्याजाची गणना: FD वरील व्याजावर कर दरमहा किंवा वार्षिक आकारला जातो. व्याजाची एकूण रक्कम तुमच्या उत्पन्नात समाविष्ट होतो.
- TDS (Tax Deducted at Source): जर तुमचे FDव रील व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल (65 वर्षांवरील व्यक्तींसाठी 50,000 रुपये), तर बँक TDS वजा करते.
- कर सवलत: FD वरील व्याजावर प्रत्यक्ष कर सवलत मिळत नाही, परंतु काही विशेष FD योजनांमध्ये कर लाभ मिळू शकतो, जसे की 5 वर्षांच्या TAX saving FD.
म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा गुंतवणूक फंड आहे, जिथे अनेक गुंतवणूकदार आपली रक्कम एकत्र करून विविध साधनांमध्ये गुंतवतात (उदा. शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स इ.). म्यूचुअल फंड बद्दल सर्व सखोल माहिती आमच्या म्युच्युअल फंड म्हणजे काय? या लेखात देलेली आहे.
म्युच्युअल फंडचे फायदे थोडक्यात
- उच्च परतावा: फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत म्युच्युअल फंड अधिक चांगले रिटर्न देऊ शकतो.
- विविधता: म्युच्युअल फंड विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यामुळे तुमचे जोखीम कमी होते.
- Liquidity: तुम्हाला गरज पडल्यास म्युच्युअल फंडमधील रक्कम सहजपणे काढता येते.
- कर लाभ: काही म्युच्युअल फंड योजनांवर जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुक केली तर कर सवलत मिळते.
फिक्स्ड डिपॉझिट vs म्युच्युअल फंड
मुद्दा | फिक्स्ड डिपॉझिट (FD) | म्युच्युअल फंड (MF) |
---|---|---|
जोखीम | सुरक्षित, जोखीम कमी | जोखीम जास्त, पण रिटर्न जास्त |
रिटर्न | स्थिर, व्याज निश्चित | चढ-उतार होणारा, पण जास्त |
Liquidity | मुदत संपल्यानंतरच पैसे मिळतात | सहजपणे पैसे काढता येतात |
कर सवलत | काही FD योजना कर सवलत देतात | ELSS प्रकारच्या फंडांवर कर सवलत |
तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?
- जोखीम नको असेल तर: तुम्ही सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
- जास्त रिटर्न हवा असेल तर: जर तुमची जोखीम पत्करण्याची तयारी असेल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर असेल, तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी आथिक अधिक योग्य ठरू शकतो.
- गुंतवणुकीचा उद्देश: तुम्ही जी गुंतवणूक करणार आहात ती किती वेळासाठी करणार आहात या वरती गोष्टी ठरतात. काही FD मध्ये लॉक इन पीरियड असतो म्हणू तुम्ही त्यातील पैसे काही ठराविक कालावधी नंतरच काढू शकता.
फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही पर्याय त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी फायदेशीर आहेत. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम घेण्याच्या क्षमतेचा, आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध कालावधीचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.
सूचना: गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले.

नमस्कार मित्रांनो,
मी सचिन जगताप , MarketMarathi.com चा संस्थापक. ब्लॉगिंग क्षेत्रात मी मागील ५-६ वर्षांपासून कार्यरत आहे. मला WordPress, SEO, आणि डिजिटल मार्केटिंग याबद्दल अनुभव आहे. आर्थिक विषयांवर वाचन व रिसर्च करणे, तसेच माझ्या गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडणे हे माझे आवडते विषय आहेत.