मित्रांनो तुम्ही कधी ना कधी पोर्टफोलियो (Portfolio) हा शब्द नक्कीच ऐकला असेल. आपण आज या लेखा मध्ये पोर्टफोलियो म्हणजे काय ? अर्थात Portfolio meaning in Marathi याबद्दल माहिती पाहणार आहोत.
या सर्व माहितीचा उपयोग करून तुम्ही पण एक चांगला पोर्टफोलियो तयार करू शकाल.
पोर्टफोलियोचा अर्थ काय होतो | पोर्टफोलियो म्हणजे काय (Portfolio meaning in Marathi)
तर मित्रांनो पोर्टफोलियो म्हणजे विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा संग्रह.
समजा तुमची गुंतवणूक थोड्या प्रमाणात शेअर मार्केट थोड्या प्रमाणात सोने आणि थोड्या प्रमाणात रीयल इस्टेट (जमीन) मध्ये आहे. तर तुम्ही म्हणणार की माझा पोर्टफोलियो स्टॉक्स, सोने आणि जमिनीतील गुंतवणुकीने बनला आहे.
आता यात प्रतेकची गुंतवणूक ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या प्रमाणात असणार. कोणी स्टॉक्स मध्ये जास्त पैसे गुंतवलेले असणार तर कोणी सोन्यामध्ये.
एकंदरीतच काय तर ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली असते त्या सर्व गोष्टींचा एकत्रित संग्रह म्हणजे पोर्टफोलियो.
पोर्टफोलियो मधील घटक
मित्रांनो पोर्टफोलियो हा अनेक गोष्टींनी बनलेला असतो. यात मुख्यत्वे पुढील घटक असू शकतात.
- स्टॉक्स – तुमच्या पोर्टफोलियो मध्ये तुम्ही विविध कंपण्याचे स्टॉक समाविष्ट करू शकता. याचा फायदा म्हणजे तुमची गुंतवणूक झपाट्याने वाढण्यास मदत होईल.
- म्यूचुअल फंड – डायरेक्ट स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्या पेक्ष्या तुम्ही म्यूचुअल फंड च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.
- बॉन्ड – बॉन्ड हा पण गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोचे डायव्हर्सिफिकेशन करू शकता.
- गोल्ड – तुमच्या पोर्टफोलियोचा काही भाग हा गोल्ड इन्वेस्टमेंटने बनलेला असू शकतो.
- रीयल इस्टेट – काही गुंतवणूक रीयल इस्टेट मध्ये पण करू शकता म्हणजे तुमच्या पोर्टफोलियोचे अजून जास्त डायव्हर्सिफिकेशन होईल.
- यफडी – कदाचित तुमची काही गुंतवणूक यफडी मध्ये असू शकते. तर ती पण तुमच्या पोर्टफोलियोचा एक घटक असणार.
1. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन
मित्रांनो आपण गुंतवणूक का करतो, आपल्याला चांगला परतावा मिळवा म्हणून बरोबर.
म्हणून चांगला परतावा मिळण्यासाठी आणि गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी आपली गुंतवणूक कुठल्या एक क्षेत्रात मर्यादित ठेऊ नये.
जसे की अगोदर सांगितल्या प्रमाणे तुम्ही शेअर्स , म्यूचुअल फंड , सोने किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये आपली गुंतवणूक करू शकता.
या मुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल सोबतच तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यास मदत होईल.
2. रिस्क मॅनेजमेंट
जसं की मी वरती सांगितले आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी ती वेगवेगळ्या क्षेत्रात असणे गरजेचे आहे.
यात तुम्ही किती जोखीम घेऊ शकता या वर तुमच्या पोर्टफोलियो ची रचना ठरते.
उदारणार्थ तुम्हाला चांगला परतावा पाहिजे आणि तुम्ही रिस्क घेऊ शकत असाल तर तुमच्या पोर्टफोलियो मधील जास्त गुंतवणूक ही इक्विटि मध्ये म्हणजेच शेअर्स मध्ये असेल.
या उलट जर तुम्हाला कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची असेल तर तुमची जास्त गुंतवणूक ही सोने , रीयल इस्टेट किंवा बॉन्ड मध्ये असू शकते.
थोडक्यात तुम्ही रिस्क मॅनेजमेंट नुसार तुमचा पोर्टफोलियो तयार करू शकता.
3. आपला पोर्टफोलियो तपासात रहा
वारंवार आपला पोर्टफोलियो तपासणे खूप गरजेचे आहे. जसे की कुठली गुंतवणूक चांगला परतावा देत नाही आहे हे तपासणे, एखादा घटक चांगला परतावा देत असेल तर त्यात गुंतवणूक वाढवणे.
याने तुमच्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळण्यास खूप मदत होते.
पोर्टफोलियोचे फायदे (Benefits of portfolio)
1. गुंतवणुकीचे डायव्हर्सिफिकेशन
मित्रांनो तुमची गुंतवणूक कुठल्या एक प्रकारात सीमित न ठेवता तुम्ही जर अनेक विभागात पैसे गुंतवले जसे की स्टॉक, गोल्ड , म्यूचुअल फंड तर तुमच्या गुंतवणुकीतून परतावा चांगला मिळण्यास मदत होते. शिवाय पैसे बुडण्याचा धोका ही कमी होतो.
म्हणून आपला पोर्टफोलियो हा विविधतेने बनलेला असावा.
तुमची गुंतवणूक ही वेगवेगळ्या प्रकारात असणे यालाच पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन असेही म्हणतात.
पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वरती सांगितल्या प्रमाणे पोर्टफोलिओ विविधिकरण.
2. सुलभता
मित्रांनो आजकाल अनेक मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमची गुंतवणूक एक जागी ट्रॅक करू शकता.
याच्या मुळे गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी तुम्ही सेबीच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकता.