मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय (share market mhanje kay) हे पाहणार आहोत. शेअर मार्केट बद्दल सर्व माहिती (Share market information in Marathi) अगदी डिटेलमध्ये या लेखांमध्ये सांगितलेली आहे.
सर्वात अगोदर आपण शेअर मार्केट या शब्दाचा शब्दशः अर्थ समजून घेऊ. तर शेअर (Share) म्हणजे समभाग किंवा अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हिस्सा आणि ज्या ठिकाणी या शेअरची खरेदी विक्री होते ते ठिकाण म्हणजे शेअर बाजार (Share market) होय.
आता आपण शेअर मार्केट बद्दल सर्व माहिती अगदी डीटेल मध्ये पाहू.
शेयर म्हणजे काय ?
चार मित्र एका दुकानात चॉकलेट खरेदी करण्यासाठी जातात. तेव्हा दुकानदार त्यांना सांगतो की ‘घ्यायचा असेल तर पूर्ण बॉक्सच घ्यावा लागेल आणि याची किंमत दोनशे रुपये आहे.’
पण यापैकी तर कोणाकडेच एवढे पैसे नसतात. मग हे काय करतात प्रत्येकाचे 50-50 रुपये असे मिळून 200 रुपये गोळा करतात आणि तो चॉकलेटचा बॉक्स खरेदी करतात.
आता त्या बॉक्सला आपण समान भागात वाटले तर प्रत्येकाला 25 टक्के भाग भेटेल. म्हणजे काय तर प्रत्येक जण हा त्या चॉकलेट बॉक्सचा 25% टक्के मालक असेल.
म्हणजे प्रतेकचा त्या बॉक्समध्ये 25% शेअर असेल. बस हेच उदाहरण खऱ्या जीवनामध्ये एका कंपनीला लागू करायचे आहे.
यात फरक फक्त एवढाच की एका कंपनीमध्ये असे हजारो शेअर असतात. जर तुम्ही त्यातले काही शेअर विकत घेतले तर तेवढा तुमचा मालकी हक्क त्या कंपनीमध्ये होतो.
शेअर मार्केट म्हणजे काय ?
आता तुम्हाला शेअर म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजले. आता याच शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी एक नियोजित बाजार म्हणजे शेअर मार्केट होय.
शेअर मार्केटमध्ये आपल्या देशात प्रमुख दोन स्टॉक एक्सचेंज (Stock exchanges) आहेत.
- बीएसई (BSE – Bombay Stock Exchange)
- एनएसई (NSE – National Stock Exchange)
हे स्टॉक एक्सचेंजेस (Stock exchanges) शेअर च्या खरेदी विक्री साठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि शेअर मार्केट मधील खरेदी विक्री व कंपनी वरती नियंत्रण ठेवतात.
ब्रोकर म्हणजे काय ? (Broker meaning in Marathi)
ब्रोकर हा गुंतवणूकदार (म्हणजे तुम्ही) आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत असतो.
शेअर्स चे प्रकार
शेअर्सचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
- इक्विटी शेअर्स (Equity Shares)
- प्रेफरन्स शेअर्स (Preference Shares)
- डीआरवी शेअर (DRV Shares)
यामध्ये सर्वात जास्त प्रचलित किंवा खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या शेअरचा प्रकार म्हणजे इक्विटी शेअर्स.
इक्विटी शेअर्स म्हणजे काय ?
जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये आपले शेअर विक्रीस काढते तेव्हा त्या शेअर्सला इक्विटी शेअर्स असे म्हणतात.
कंपनीला जर तिचा बिझनेस वाढवायचा असेल आणि त्यासाठी काही पैशाची गरज असेल तर ती कंपनी आपले काही शेअर्स बाजारात विक्रीस काढते.
समजा उदारणार्थ एका कंपनीला दहा लाख रुपयाची गरज आहे आणि त्यांनी त्यासाठी आपले दहा हजार शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून विक्रीस काढले. 10,00,000/10,000 म्हणजे प्रतेक शेअर ची किंमत शंभर रुपये होणार.
असे शेअर्स विकून कंपनी पैशाची बांधणी करते आणि तिचा बिजनेस वाढवते. तुम्ही खरेदी केलेल्या शेअरचे मूल्य पण जशी जशी कंपनी वाढते आणि तिचा बिजनेस वाढतो तसे वाढत जाते.
मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी ?
याबद्दल सर्व माहिती आमच्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? या लेखात दिलेली आहे.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना सर्वात पहिली पायरी म्हणजे स्वतःचे डिमॅट अकाउंट (Demat Account). शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट (Demat Account) गरजेचे आहे.
डिमॅट अकाउंट कसे चालू करायचे याची माहिती आम्ही आमच्या डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे या लेखांमध्ये दिलेली आहे.
डिमॅट खाते सुरू केल्यानंतर जसे आपल्या बँक अकाउंट (Bank Account) मध्ये पैसे असतात त्याचप्रमाणे डिमॅट अकाउंट मध्ये पण पैसे असावे लागतात जेणेकरून हे पैसे तुम्ही शेअरच्या खरेदी विक्रीसाठी वापरू शकाल
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला ब्रोकर म्हणजेच दलाल ची गरज पडते. आजकाल अनेक मोबाईल ॲप मध्ये अगदी सहज डिमॅट खाते उघडून मिळते.
यासाठी बेस्ट ॲप कुठले याच्याबद्दल आम्ही आमचा हा लेख लिहिलेला आहे.
शेअर मार्केट टिप्स
- मित्रांनो शेअर मार्केट हे जखमीचे क्षेत्र आहे कुठल्या पण कंपनीचे शेअर्स विकत घेण्याअगोदर त्या कंपनी बद्दल सखोल माहिती घेणे खूप गरजेचे आहे.
- आपण गुंतवणूक करताना आपल्याकडील शिल्लक रक्कमच वापरावी कोणाकडून कर्ज काढून किंवा उसने पैसे घेऊन कधीच गुंतवणूक करू नये.
- मित्रांनो शेअर मार्केट मधून जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी तुमची गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी.
अधिक माहिती साठी सेबी च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
आमचा म्यूचुअल फंड वरचा हा लेख नक्की वाचा.
Sher marketing manje Kay