नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये डिमॅट अकाउंट म्हणजे काय (Demat account information in Marathi) आणि डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
डिमॅट अकाउंट बद्दल माहिती (Demat account information in Marathi)
डिमॅट अकाउंट म्हणजे काय (Demat account meaning in Marathi)
सर्वात अगोदर आपण डिमॅट खाते म्हणजे काय हे पाहू.
समजा तुम्हाला तुमचे पैसे शेअर मार्केट , म्यूचुअल फंड किंवा बॉन्ड मध्ये गुंतवायचे आहेत. तर मग या सगळ्या मध्ये तुम्ही पैसे डायरेक्ट गुंतऊ शकता का ? तर उत्तर आहे नाही.
मग यासाठी लागतो एक एजेंट. याच एजेंटला ब्रोकर (Broker) असेही म्हणतात. भारतात वेगवेगळे ब्रोकर आहेस जसे की Zerodha, Upstox , Groww किंवा Angle Broking.
थोडक्यात तुम्हाला जी पण गुंतवणूक करायची आहे ती फक्त यांच्या माध्यमातूनच करता येते.
यासाठी तुमच एक खातं उघडलं जातं त्यालाच डिमॅट अकाउंट (Demat account) असे म्हणतात.
डिमॅट अकाउंट मध्ये तुमचे शेअर्स इलेक्ट्रोनिक पद्धतीने साठवले जातात. शेअर्स सोबतच डिमॅट अकाउंट मध्ये बॉन्ड आणि ETF पण स्टोर केले जातात
डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे (How to open Demat account in Marathi)
आता आपण या भागात डिमॅट अकाउंट कसे उघडायचे हे पाहू.
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents required to open Demat account)
मित्रांनो एकदा तयारी करून ठेवली की सर्व सोप्पं होता म्हणून अगोदर कागदपत्रे तयार असणे गरजेचे आहे.
डिमॅट अकाउंटसाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे लागतील-
- बँक पासबूक
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
कमीत कमी एव्हडे कागदपत्रे आपल्याला लागतात. सोबतच तुमचा चालू मोबाईल क्रमांक, कारण यावर्ति तुम्हाला OTP प्राप्त होतील.
डिमॅट अकाउंट उघडण्याच्या स्टेप्स
स्टेप 1-
सर्वात अगोदर प्ले स्टोर (Play Store) वरुण पुढील पैकी कुठले ही एक मोबाइल ॲप डाउनलोड करून घ्या.
- Zerodha
- Upstox
- Groww
- Angle Broking
या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण Upstox ॲप घेतले आहे.
कारण Upstox वरती डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी कुठल्याच प्रकारचा चार्ज लागत नाही.
सर्वात अगोदर डाउनलोड बटणावर क्लिक करून मोबाइल ॲप डाउनलोड करून घ्या.
स्टेप 2-
आता डाउनलोड झाल्या नंतर ते ॲप उघडा.
तुम्ही डाउनलोड केलेल्या ॲप नुसार थोडा फार बदल होऊ शकतो. पण मूळ स्टेप्स सारख्याच आहेत.
तुमचा चालू मोबाईल क्रमांक एंटर करा, जर OTP विचारला तर तो एंटर करा.
आता तुम्हाला पुढील पर्याय दिसेल. त्यातील पहिलं पर्याय निवड.
या नंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड बद्दल माहिती विचारली जाईल. पॅन कार नंबर एंटर करा आणि तुमची जन्म तारीख एंटर करा.
स्टेप 3-
आता तुम्हाला तुमचा पत्ता दिसेल जो तुमच्या पॅन कार्ड वरुण घेतलेला असेल तो नक्की करा.
स्टेप 4-
या नंतर तुम्हाला तुमचे बँक अकाऊंट लिंक करावे लागेल.
येथे तुम्ही UPI चा पर्याय नवडू शकता किंवा बँक ची माहिती एंटर करू शकता.
याच्या नंतर बाकी काही जास्तीची माहिती तुम्ही स्कीप करून पुढे या.
स्टेप 5-
या स्टेप मध्ये तुम्हाला आधार कार्ड चा नंबर एंटर करायचा आहे.
इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर भरायचा आहे.
ही तुमची शेवटची स्टेप असेल. यानंतर तुमची KYC पूर्ण होण्यास 3-4 दिवसाचा वेळ लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल वर तुमचं यूजर आइडि (User ID) आणि पासवर्ड प्राप्त होईल . ज्याचा वापर करून तुम्ही परत लॉगिन करू शकाल.
जरी तुम्हाला काही अडचण आल्यास आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.
डिमॅट अकाउंटचे फायदे
1. सुरक्षितता
मित्रांनो पूर्वीच्या काळी शेअरची खरेदी विक्री ही पेपर च्या माध्यमातून होत असे.
याचे खूप तोटे होते जसे की बनावट पेपर , पेपर हरवणे , चोरी जाणे , खराब होणे.
म्हणून 1996 नंतर याला डिजिटल स्वरूपात बदलून सर्व व्यवहार हे डिमॅट अकाउंटचा उपयोग करून केले जाऊ लागले.
शिवाय या सर्व गोष्टी SEBI सक्त निदर्शनात होतात.
2. वापरण्यात सुविधा
सर्व गोष्टी ऑनलाईन आणि डिजिटल झाल्या मुळे गुंतवणूकदार आपले डिमॅट अकाउंट कधीही कोठेही शकतात.
तसेच त्यात व्यवहार करू शकतात. अगदी मोबाईल फोन चा वापर करून आपण सर्व गोष्टी घरबसल्या पाहू शकतो.
3. वेळेची बचत
शेअरची खरेदी विक्री डिजिटल झाल्या मुळे सर्व व्यवहार झटपट होतात. खरेदी केलेले शेअर 1 दिवसाच्या आत आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात.
4. कर्जाची सुविधा
मित्रांनो तुमच्या डिमॅट अकाउंट मधील ठेवी वर तुम्ही बँके कडून कर्ज काढू शकता.
5. करा मध्ये सवलत
डिमॅट अकाउंट मधून खरेदी विक्री केल्या नंतर आपल्याला करामध्ये सेबी तर्फे सूट दिली जाते.
डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाऊंट फरक
बऱ्याच लोकांचा यात गोंधळ होतो की डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाऊंट यांच्यात काय फरक आहे.
तर डिमॅट अकाउंट हे एखाद्या बँक अकाऊंट सारखे असते. ज्या प्रकारे आपल्या बँक अकाऊंट मध्ये पैसे साठवले जातात त्याच प्रकारे तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये शेअर साठवले जातात.
मात्र ट्रेडिंग अकाऊंट हे एक व्यासपीठ आहे जिथे तुम्ही शेअर ची खरेदी विक्री करता. यात खरेदी केलेले शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये साठवले जातात.
किंवा जर तुम्ही एखादा शेअर विकला तर तो तुमच्या डिमॅट अकाउंट मधून वजा होतो.
आजकाल आपल्याला हे दोन्ही अकाऊंट एकाच वेळी ब्रोकर तर्फे काढून मिळतात. त्यामुळे आपलं तान कमी होतो.
समजा तुम्हाला TATA Motors चे 10 शेअर खरेदी करायचे आहेत. यासाठी तुम्ही ट्रेडिंग अकाऊंट चा वापर करणार आणि एकदा का तुम्ही ते शेअर खरेदी केले तर मग ते शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये स्टोर होणार .