शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

मित्रांनो आपण हा लेख वाचत आहात म्हणजे नक्कीच तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? याविषयी सविस्तर माहिती पाहत असाल.

तर मित्रांनो याच गोष्टीला गृहीत धरून आज आपण या लेखामध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सर्व माहिती एकदम बेसिक पासून पाहणार आहोत.

मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की या लेखात आपण फक्त गुंतवणुकीचे पर्याय आणि त्याचीच माहिती पाहणार आहोत. या लेखात ऑप्शन आणि फ्युचर या सारख्या किंवा ट्रेडिंग बद्दल माहिती देणार नाहीत.

जर ती माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय

मित्रांनो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे प्रामुख्याने 3 पर्याय आहेत, ते पुढील प्रमाणे –

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. डायरेक्ट कंपन्यांचे वैयक्तिक स्टॉक्स खरेदी करणे
  2. म्यूचुअल फंड
  3. ईटीअफ (ETF)

आता या प्रतेक पर्याया विषयी आपण सविस्तर माहिती पाहू.

वैयक्तिक स्टॉक्स खरेदी करणे

मित्रांनो हा सर्वात जास्त वापरला जाणार पर्याय आहे. अश्या प्रकारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी

तुम्हाला चांगल्या कंपन्या शोधून त्यांचा बारकाव्याने स्टडी करावा लागतो , आणि नंतरच त्या कंपनीचा स्टॉक खरेदी करायचा की नाही हे ठरवावे लागते.

हा पर्याय कोणासाठी चांगला असू शकतो, तर मी म्हणेन की ज्यांच्याकडे मुबलक वेळ आहे आणि ज्यांना स्टॉक अनॅलिसिस जमतं अश्या लोकांसाठी हा पर्याय चांगला आहे.

याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या पसंतीच्या कंपनी मध्ये इन्वेस्ट करू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हडे शेअर खरेदी करू शकता.

या प्रकारे गुंतवणूक करताना तुम्हीच एक्स्पर्ट असता . कुठला स्टॉक कधी खरेदी करायचा, कधी विकायचा किंवा किती दिवस होल्ड करायचा हे सगळे निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यावे लागतात.

म्यूचुअल फंड

मित्रांनो या बद्दल अधिकची माहिती तुम्हाला म्यूचुअल फंड म्हणजे काय? या लेखात मिळेल.

थोडक्यात सांगायचे झाल्यास या प्रकारे गुंतवणूक करायची झाल्यास तुम्हाला कुठल्याच कंपनीच्या शेअरचे अनॅलिसिस करण्याची किंवा त्या कंपनीच्या अभ्यासाची गरज राहत नाही.

फक्त तुमच्या आवडीचा म्यूचुअल फंड निवडा आणि त्यात एकठोक किंवा एसआयपी च्या स्वरूपात गुंतवणूक करून टाका.

ईटीअफ (ETF)

मित्रांनो ETF तुलनेने कमी प्रमाणात वापरला जाणार गुंतवणुकीचा पर्याय आहे. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? काही बेसिक गोष्टी

मित्रांनो मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्या अगोदर मार्केट बद्दल काही बेसिक गोष्टी समजून घ्या. याबद्दल अधिकची माहिती शेअर मार्केट म्हणजे काय या लेखा मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला बेसिक माहिती असेल तर तुम्ही तो लेख वाचण्याची गरज नाही.

सोबतच काही चांगली पुस्तके वाचने ही फायद्याचे ठरते. काही चांगली पुस्तके आम्ही आमच्या शेअर बाजार मराठी पुस्तके या लेखात सांगितलेली आहेत.

मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्याच्या स्टेप्स

स्टेप 1

मित्रांनो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे ब्रोकर निवडून डिमॅट अकाउंट ओपन करणे.

मित्रांनो आजकाल शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे झाले आहे. आजकाल खूप सारे मोबाईल अ‍ॅप बजारत आलेले आहेत.

यामुळे तुम्हाला ब्रोकर वगेरे शोधण्याची गरज पडत नाही. तसेच डिमॅट अकाउंट फ्री मध्ये ओपन करून मिळते.

स्टेप 2

मित्रांनो पुढची महत्वाची पायरी म्हणजे योग्य कंपनी निवडणे म्हणजेच योग्य स्टॉक निवडणे.

यासाठी तुम्ही त्या कंपनीचा बरकाव्याने स्टडी करणे खूप गरजेचे असते. मित्रांनो कंपन्या कश्याप्रकारे निवडायच्या , स्टॉक अनॅलिसिस काय असते याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

स्टेप 3

यानंतर पुढची स्टेप येते निवडलेला स्टॉक खरेदी करणे. जसं की मी वरती म्हंटल आजकाल हे सर्व मोबाईल अ‍ॅपमुळे अगदी सोपं झालेलं आहे.

आता हा खरेदी केलेला स्टॉक तुम्ही किती दिवस होल्ड करणार हे तुमच्या वरती अवलंबून असते.

मित्रांनो वरती सांगितलेल्या स्टेप्स पैकी सर्वात महत्वाचे म्हणजे डिमॅट अकाउंट ओपन करणे आणि दुसरं म्हणजे योग्य स्टॉक निवडणे.

यातील डिमॅट अकाउंट तुम्हाला एकदाच उघडायचे आहे पण स्टॉक निवडताना मात्र नेहमी योग्य कंपनी निवडूनच स्टॉक खरेदी केले पाहिजे.

स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्ष्यात ठेवण्याच्या गोष्टी

  1. तुम्ही गुंतवणूक का करत आहात हे ठरवणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला कुठले स्टॉक खरेदी करावे आणि त्यांना किती वेळ होल्ड करावे हे समजण्यास मदत होते.
  2. सोबतच तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याचाही विचार स्टॉक खरेदी करताना करावा,
  3. स्टॉक खरेदी करताना त्यात विविधता असणे खूप गरजेचे आहे. एकाच कंपनीचे खूप स्टॉक्स न घेता वेगवेगळ्या कंपण्याचे थोडे थोडे स्टॉक्स घ्यावेत.
  4. गुंतवणूक करताना मार्केट,कंपनी आणि एकूणच बाजारात वातावरण कसे आहे याचा अंदाज घेत चला.

Leave a Comment