NSE Holidays 2026: शेअर मार्केट कोणत्या दिवशी बंद राहणार? गुंतवणूकदारांनी नक्की पाहा

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर NSE Holidays 2026 माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या दिवशी ट्रेडिंग प्लॅन केल्यास तुमचा प्लॅन पूर्ण होणार नाही किंवा निर्णय चुकीच्या वेळी घ्यावा लागू शकतो.

2026 मध्ये Share Market Holiday कधी कधीआहे या सोबत ते कुठल्या ठराविक सणांमुळे बंद राहणार आहे हे सर्व या लेखात आपण पाहणार आहोत.

NSE Holidays 2026 (Complete List)

खाली 2026 मधील NSE सुट्ट्यांची संभाव्य यादी दिली आहे:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जानेवारी – मार्च

  • 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
  • 18 मार्च – होळी

एप्रिल – जून

  • 2 एप्रिल – राम नवमी
  • 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • 7 मे – बुद्ध पौर्णिमा

जुलै – सप्टेंबर

  • 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
  • 27 ऑगस्ट – गणेश चतुर्थी

ऑक्टोबर – डिसेंबर

  • 2 ऑक्टोबर – गांधी जयंती
  • 12 नोव्हेंबर – दिवाळी (लक्ष्मी पूजन)
  • 25 डिसेंबर – ख्रिसमस

टीप: काही सुट्ट्या शनिवार किंवा रविवारी आल्यास स्वतंत्र ट्रेडिंग हॉलिडे दिला जात नाही.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

दिवाळीच्या दिवशी NSE पूर्ण दिवस बंद नसते. त्या दिवशी मर्यादित वेळेसाठी मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाते.

  • साधारण 1 तास ट्रेडिंग होते
  • वेळ संध्याकाळी जाहीर केली जाते
  • याला शुभ मानले जाते आणि अनेक गुंतवणूकदार या दिवशी नवीन गुंतवणूक सुरू करतात

NSE Holidays माहित असणे का गरजेचे?

1. ट्रेडिंग प्लॅनिंगसाठी

Intraday किंवा short-term ट्रेडर्ससाठी सुट्ट्यांची माहिती खूप महत्त्वाची असते.

2. SIP आणि गुंतवणुकीवर परिणाम

Mutual Fund SIP किंवा ऑर्डर execution पुढील working day ला shift होऊ शकतो.

3. मार्केट मूव्हमेंट समजण्यासाठी

सुट्टीदरम्यान एखादी मोठी बातमी आल्यास, त्याचा परिणाम पुढील ट्रेडिंग दिवशी दिसतो.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स

  • सुट्ट्यांच्या आधी मोठे ट्रेडिंग निर्णय घेण्याचा विचार करा
  • सुट्टीनंतर मार्केट gap up किंवा gap down उघडू शकते, त्यामुळे तयारी ठेवा
  • long-term असल्या सुट्ट्या वगेरेचे टेंशन घेण्याची गरज नाही.

Market holidays 2026 ची माहिती प्रत्येक गुंतवणूकदारासाठी उपयुक्त आहे. योग्य प्लॅनिंग केल्यास तुम्ही तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनवू शकता.

विशेषतः दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग आणि सुट्टीनंतरचे मार्केट मूव्हमेंट याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Leave a Comment