FD vs Gold: गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फिक्स्ड डिपॉझिट की सोने | FD vs Gold in Marathi

मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची असते. पण गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे अनेकदा गोंधळ होतो.

फिक्स्ड डिपॉझिट की सोने | FD vs Gold in Marathi

फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि सोने (Gold) हे भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानले जातात. काही लोक सुरक्षिततेसाठी FD निवडतात तर काही लोक महागाईपासून बचाव करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात.

चला तर मग आज तुमचे हे कन्फ्युजन दूर करू आणि FD vs Gold यामध्ये नेमका कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे हे समजून घेऊ.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फिक्स्ड डिपॉझिट (FD) म्हणजे काय?

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे बँकेत एक ठराविक रक्कम निश्चित कालावधीसाठी ठेवण्याची गुंतवणूक योजना होय. या कालावधीत तुमच्या पैशावर बँक ठराविक व्याज देते.

सध्या भारतातील अनेक बँका साधारण 6% ते 7.5% पर्यंत व्याजदर देतात. हा दर बँक आणि कालावधीनुसार बदलू शकतो.

जर तुम्हाला FD बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमचा हा लेख नक्की वाचा Fixed Deposit म्हणजे काय?

फिक्स्ड डिपॉझिटचे फायदे

सुरक्षित गुंतवणूक: FD हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो.
स्थिर रिटर्न: व्याजदर निश्चित असल्यामुळे बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही.
निश्चित कालावधी: 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD करता येते.
सोपे गुंतवणूक साधन: कोणालाही सहज FD सुरू करता येते.

फिक्स्ड डिपॉझिटची मर्यादा

• महागाई वाढली तर FD चा प्रत्यक्ष रिटर्न कमी होऊ शकतो.
• दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी रिटर्न तुलनेने कमी असतो.
• FD वरील व्याजावर आयकर लागू होतो.

सोन्यातील गुंतवणूक म्हणजे काय?

मित्रांनो भारतात सोन्याला एवढा जास्त महत्व आहे की बस. तुम्हाला तर माहिती आहे की सोन्याला देवाचा धातू म्हणतात. सोन्या पेक्ष्या जास्त किंमत मला नाही वाटत की भारतात कशाला आहे.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी

सोन्याच्या किमती महागाई आणि जागतिक परिस्थितीवर अवलंबून बदलत असतात. जागतिक अस्थिरता निर्माण झाल्यास शेअर मार्केट मध्ये नेगेटिव परिणाम दिसून येतो. या उलट सोन्याच्या किमतीत मात्र अश्या स्थितीत पॉजिटिव इफेक्ट दिसून येतो. युद्धाच्या वगेरे स्थिति मध्ये सोने हा एक स्थिर पर्याय आहे.

सोन्यात गुंतवणुकीचे फायदे

महागाईपासून संरक्षण: महागाई वाढली तर सोन्याची किंमतही वाढते.
दीर्घकालीन चांगला रिटर्न: मागचा डेटा पहिला तर अनेक वर्षांमध्ये सोन्याने चांगला परतावा दिला आहे.
Liquidity: गरज पडल्यास सोने सहज विकता येते.
संपत्तीचे संरक्षण: आर्थिक संकटाच्या काळात सोने सुरक्षित मानले जाते.

सोन्यात गुंतवणुकीच्या मर्यादा

• सोन्यावर कोणतेही नियमित व्याज मिळत नाही.
• दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज जास्त असतो.
• सोन्याच्या किंमतीत चढउतार होतात.

फिक्स्ड डिपॉझिट vs सोने | FD vs Gold in Marathi

मुद्दाफिक्स्ड डिपॉझिट (FD)सोने (Gold)
जोखीमकमीमध्यम
रिटर्ननिश्चित व्याजबाजारावर अवलंबून
महागाई प्रभावकमी संरक्षणमहागाईपासून संरक्षण
Liquidityकाहीवेळा लॉक-इनसहज विकता येते
करव्याजावर कर लागतोविक्रीवर कॅपिटल गेन कर

FD आणि सोन्यातील गुंतवणूक – कोणता पर्याय चांगला?

सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर

जर तुम्हाला जोखीम नको असेल आणि स्थिर रिटर्न हवा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा चांगला पर्याय ठरू शकतो.

महागाईपासून संरक्षण हवे असेल तर

जर तुम्हाला जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि महागाईपासून तुमच्या पैशांचे संरक्षण करायचे असेल, तर सोन्यातील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते.

बॅलेन्स्ड गुंतवणूक

अनेक आर्थिक तज्ञ असे सांगतात की गुंतवणूक करताना फक्त एकाच पर्यायावर अवलंबून राहू नये. म्हणजेच पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करावे. FD, Gold आणि Mutual Funds यांचा संतुलित वापर केल्यास चांगला पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो.

मित्रांनो एकंदरीतच फिक्स्ड डिपॉझिट आणि सोने हे दोन्ही गुंतवणूक पर्याय त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी फायदेशीर आहेत. FD तुम्हाला सुरक्षितता आणि स्थिर रिटर्न देते, तर सोने महागाईपासून संरक्षण आणि दीर्घकालीन मूल्य वाढ देऊ शकते.

म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे आर्थिक उद्दिष्ट, जोखीम घेण्याची तयारी आणि गुंतवणुकीचा कालावधी यांचा विचार करून योग्य निर्णय घ्या.

सूचना: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे जरूरी असते.

Leave a Comment