मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे. अनेक लोकांचे स्वप्न असते की आपण करोडपती व्हावे, करोडपती नाही तर कमीत कमी ठीकठाक पैसे तरी आपल्याकडे असावे.
पण प्रश्न असा आहे की हे शक्य आहे का? आणि असेल तर ते कसे ?
म्हणूनच तुमच्या या सगळ्या विचारांचे उत्तर देण्यासाठी या लेखात आपण एक उदाहरण घेऊन हे पाहणार आहोत की बाबा अंदाजे किती रुपये गुंतवणूक किती काळासाठी केली तर आपण करोडपती होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊ……
SIP म्हणजे काय?
मित्रांनो SIP म्हणजे Systematic Investment Plan. यात तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता.
यामुळे तुम्हाला:
- नियमित गुंतवणूक
- चक्रवाढ व्याजाचा फायदा
- मार्केटच्या चढउताराचा सरासरी परिणाम
मिळतो.
SIP बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा SIP म्हणजे काय? हा लेख नक्की वाचा.
10 वर्षात 1 कोटी रुपये जमा करायचे असतील तर दर महिन्याला किती SIP करावी लागेल?
आता आपण हे फक्त एक उदाहरण घेतले आहे, जरी उदाहरण म्हणून 1 कोटी ही रक्कम घेतली असली तरी यात अशक्य असे काहीच नाही.
समजा तुम्हाला 10 वर्षात ₹1,00,00,000 तयार करायचे आहेत.
म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन सरासरी 12% ते 15% रिटर्न मिळू शकतो, त्या आधारावर खालील अंदाज पाहू.
SIP Calculation Table
| वार्षिक रिटर्न | दर महिन्याची SIP | 10 वर्षानंतर अंदाजे रक्कम |
|---|---|---|
| 12% | ₹43,000 | ₹1 कोटी |
| 15% | ₹38,000 | ₹1 कोटी |
म्हणजेच जर तुम्हाला 10 वर्षात करोडपती व्हायचे असेल तर साधारण: ₹38,000 ते ₹43,000 दर महिन्याची SIP करावी लागेल.
जर 20 वर्ष गुंतवणूक केली तर?
मित्रांनो SIP ची खरी ताकत दिसते ती म्हणजे लॉन्ग टर्म गुंतवणुकीत. खाली दिलेल्या टेबल मध्ये तुम्ही पाहू शकता की आपले टार्गेट सेम आहे 1 कोटी पण जर तेच टार्गेट 10 ऐवजी जर 20 वर्षात पूर्ण करायचे असेल तर SIP ची रक्कम फक्त 10 हजार होते. म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी खूप जास्त महत्वाचा आहे.
| कालावधी | SIP | अंदाजे रक्कम |
|---|---|---|
| 10 वर्ष | ₹40,000 | ₹1 कोटी |
| 20 वर्ष | ₹10,000 | ₹1 कोटी |
जर तुम्ही लवकर गुंतवणूक सुरू केली तर कमी SIP करूनही मोठी रक्कम तयार होऊ शकते. यालाच म्हणतात Power of Compounding.
असे वेगवेगळे calculations करण्यासाठी तुम्ही आमचा एसआयपी कॅल्क्युलेटर वापरू शकता.
SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
नियमित गुंतवणूक
SIP मुळे तुम्ही दर महिन्याला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता.
मार्केट रिस्क कमी
मार्केट कधी वर तर कधी खाली असते. SIP मुळे गुंतवणूक वेगवेगळ्या किमतींवर होते. म्हणजे तुम्हाला सरासरी परतावा दर मिळतो.
चक्रवाढ व्याजाचा फायदा
जितका जास्त कालावधी तितका compounding effect जास्त.
करोडपती बनण्यासाठी काय लक्षात ठेवावे?
जर तुम्हाला SIP द्वारे करोडपती व्हायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
- गुंतवणूक लवकर सुरू करा
- SIP नियमित चालू ठेवा
- चांगले म्युच्युअल फंड निवडा
- लॉन्ग टर्म ध्येय ठेवा.
मित्रांनो 10 वर्षात करोडपती होणे अशक्य नाही, पण त्यासाठी मोठी SIP करावी लागते. जर तुम्ही दर महिन्याला सुमारे ₹38,000 ते ₹43,000 SIP केली आणि त्यावर 12% ते 15% रिटर्न मिळाला, तर 10 वर्षात 1 कोटी रुपये तयार होऊ शकतात.
म्हणूनच गुंतवणूक लवकर सुरू करा आणि त्यात सातत्य ठेवा.
सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमींवर अवलंबून असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.
