नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये काही IPO Strategies in Marathi सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या पैकी अनेक जण वेग वेगळ्या आयपीओसाठी अप्लाय करत असता.
बऱ्याच लोकांचा आयपीओ लागतो कधी लागत नाही. खास करून जर कंपनी चांगली असेल किंवा फेमस असेल तर आपल्याला आयपीओ लागण्याची शक्यता ही खूप कमी असते.
म्हणूनच आज आपण या आर्टिकल मध्ये अश्या काही Strategies पाहणार आहोत जेणेकरून पुढील आयपीओ च्या वेळी तुम्हाला त्यांचा फायदा होईल.
IPO Strategies in Marathi
स्ट्रॅटेजी 1-
मित्रांनो ही स्ट्रॅटेजी एकदम बेसिक आहे. कदाचित तुमच्यातील बरेच लोक या स्ट्रॅटेजीचा उपयोग करत असतील.
मित्रांनो तुम्हाला काय करायच आहे तर एकाच आयपीओला तुमच्या कडील जेवढे डिमॅट अकाउंट आहेत तेवढ्या अकाऊंट मधून अप्लाय करायच आहे.
जसे की तुमचं अकाऊंट , तुमच्या भाऊ, बहीण, आई वडील असे डिमॅट अकाउंट जे तुमच्याकडे असतील त्यातून तुम्हाला त्या आयपीओला अप्लाय करायच आहे.
यामुळे आयपीओ भेटण्याची शक्यता खूप वाढते.
स्ट्रॅटेजी 2-
मित्रांनो ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे फंडामेंटल अनॅलिसिसवरती आधारित आहे.
आता मला सांगा तुम्ही आयपीओला अप्लाय करता आणि जर आयपीओ भेटला तर तुम्हाला त्या आयपीओ च्या लॉट एवढे शेअर भेटतात बरोबर?
मग जर कंपनीचे फंडामेंटलस् खूप स्ट्रॉंग असतील तर आपणच त्या कंपनीचे तेव्हडे स्टॉक्स विकत घेतले तर.
सांगतो सांगतो उदाहरण देऊन सांगतो,
समजा तुम्ही कुठल्या तरी कंपनीचा 1 लॉट घेणार होता आणि त्या एक लॉट ची किंमत होती 15000. आता तुम्हाला काय करायचय की त्याच 15,000 चे त्याच कंपनीचे शेअर ती कंपनी लिस्ट झाली की खरेदी करायचे आहेत.
फक्त हे शेअर एकदाच खरेदी न करता तुम्ही पाच पाच हजाराच्या 3 लॉट किंवा तुमच्या प्रमाणे खरेदी करू शकता.
म्हणजेच थोडक्यात काय तर जेव्हडे शेअर तुम्हाला आयपीओ च्या माध्यमातून मिळणार होते ते शेअर तुम्ही स्वतः बाजारभावाप्रमाणे खरेदी केले.
आता तुम्ही म्हणान की पाच पाच हजार प्रमाणे का तर, समजा तुम्ही सुरवातीला पंधरा हजार गुंतवले तर नंतर सेलिंग प्रेशर मुळे स्टॉक खाली येऊ शकतो.
या उलट याचा फायदा घेऊन तुम्ही सुरवातीला पाच हजार आणि नंतर जर स्टॉक खाली आला तर अजून पाच परत अजून खाली आला तर अजून पाच असे पैसे गुंतऊ शकता.
ही स्ट्रॅटजी पूर्ण पणे फंडामेंटल अनॅलिसिस वरती अवलंबून आहे. यालाच आपण ‘बाय ऑन एव्री डीप’ असे ही म्हणत असतो.
स्ट्रॅटेजी 3-
मित्रांनो ही स्ट्रॅटेजी टेक्निकल अनॅलिसिस वरती आधारित स्ट्रॅटेजी आहे.
या मध्ये कंपनी मार्केट मध्ये लिस्ट झाल्या नंतर तिच्या वरती नजर ठेऊन म्हणजेच टेक्निकल अनॅलिसिस करून नंतर एंट्री घ्यायची आहे.
यासाठी तुम्हाला टेक्निकल अनॅलिसिस म्हणजे काय हे माहिती असला पाहिजे.
मित्रांनो जर तुम्हाला टेक्निकल अनॅलिसिस म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कोंमेंट्स सेक्शन मध्ये नक्की सांगा.
काही इतर आयपीओ स्ट्रॅटेजी
- सक्षम कंपनीची निवड: कुठलाही आयपीओ खरेदी करताना कंपनी निवड हे खूप महत्वाचे आहे. नेहमी फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी निवडली पाहिजे.
- स्ट्रॉंग फायनॅन्स : IPO पूर्वी कंपनीचे वित्तीय प्रदर्शन मजबूत असणे आवश्यक आहे.
- कंपनीचे योग्य मूल्यांकन: कंपनीच्या शेअर्सचे योग्य मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. हे मूल्यांकन कंपनीच्या वित्तीय प्रदर्शनावरती, बाजारपेठ परिस्थिती आणि इतर संबंधित घटकांवर आधारित असते.
- नियम आणि कायद्यांचे पालन: आयपीओ खरेदी करताना एखादी कंपनी नियम आणि कायद्याचे पालन करत आहेना हे सेबीचे काम आहे. या प्रकारच्या कंपण्यात पैसे गुंतवणे आपण टाळले पाहिजे.
आयपीओ बद्दल अधिक माहितीसाठी आमचा आयपीओ म्हणजे काय हा लेख नक्की वाचा.