एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ | NTPC Green Energy IPO Details In Marathi

NTPC Green Energy IPO Details In Marathi

NTPC Green Energy IPO Details In Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत, जेणेकरून यात गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय तुम्ही करू शकाल.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी बद्दल काही बेसिक माहिती

मित्रांनो NTPC लिमिटेड ही मेन कंपनी आहे आणि NTPC Green Energy ही तिची उप कंपनी आहे. सध्या NTPC Green Energy चा 100% वाटा हा NTPC लिमिटेड या मुख्य कंपनीकडे आहे.

मित्रांनो NTPC Green ही कंपनी Renewable एनर्जी कंपनी आहे. Renewable म्हणजे अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Green Energy या कंपनीचा मुख्य फोकस हा Renewable एनर्जी या क्षेत्राशी निगडीत प्रोजेक्ट्सचे कंत्राट घेणे आणि तयार झालेली वीज सरकारी किंवा इतर कंपनीला विकणे असा आहे.

NTPC Green Energy यांच्याकडे सोलार आणि पवन म्हणजे विंड एनर्जि असे दोन्ही सोर्स आहेत. यातून तयार झालेली वीज ते वरती सांगितल्याप्रमाणे विकतात.

मित्रांनो 30 सेप्टेंबर 2024 पर्यन्तच्या डेटा नुसार NTPC Green Energy ही सगळ्यात जास्त अक्षय ऊर्जा तयार करणारी कंपनी आहे.

अजतागत कंपनीकडे 3220 MW क्षमतेचे सोलार प्रोजेक्ट्स आणि 100 MW क्षमतेचे विंड एनर्जि प्रोजेक्ट्स आहेत.

जून 30, 2024 च्या डेटा नुसार कंपनी सध्या 31 प्रोजेक्ट्स वरती काम करत आहे. हे प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्या नंतर त्यांची टोटल अक्षय ऊर्जा क्षमता तब्बल 11,771 MW एवढी होईल.

मित्रांनो कंपनीच्या एकूण उत्पन्नाच्या जवळ पास 90% हे फक्त सोलार एनर्जि मधून येत आहे तर उर्वरित थोड्याफार प्रमाणात विंड एनर्जि मधून येत उत्पन्न हे येत आहे.

इंडस्ट्री अनॅलिसिस

मित्रांनो इंडस्ट्री बद्दल तर तुम्हाला काही सांगायची गरज आहे असा मला वाटत नाही. मित्रांनो भारत हा विकसनशील देश आहे शिवाय लोकसंख्या वाढत आहे लोकांच्या गरजा दिवसंदिवास वाढत आहेत आणि म्हणूनच विजेचा वापर देखील असाच दिवसंदिवस वाढत जाणार यात काही शंका नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार कुठलं ही असलं तरी ते अक्षय उर्जेवर्ति फोकस हा करणारच. आत्ताच्या सरकारच्या काही पॉलिसी सांगायच्या झाल्या तर सहज बिजली हर घर योजना, त्यानंतर ग्रीन सिटि स्कीम आणि इतर सुद्धा काही PLI स्कीम च्या माध्यमातून सरकार या क्षेत्राला चांगल प्रमोट करत आहे.

सोबतच सोलार सारख्या क्षेत्रात गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात होत आहे. खालील प्रतिमा पाहून तुम्हाला याची कल्पना येईल-

NTPC Green Energy IPO Details In Marathi

अशीच काहीशी स्थिति विंड एनर्जि मध्ये सुद्धा आहे. एकंदरीत सांगायचे झाले तर मार्केट आणि गुंतवणूक वाढतच जाणार आहे.

NTPC Green Energy Financials

तपशील30 सप्टेंबर 2024 समाप्त सहा महिन्यांचा कालावधी30 सप्टेंबर 2023 समाप्त सहा महिन्यांचा कालावधीआर्थिक वर्ष 2024आर्थिक वर्ष 2023आर्थिक वर्ष 2022
ऑपरेशन्समधून मिळकत₹10,822.91₹10,083.21₹19,625.98₹14,497.09₹9,104.21
ऑपरेटिंग EBITDA (3)₹9,315.65₹9,146.10₹17,464.70₹13,096.16₹7,948.88
ऑपरेटिंग EBITDA मार्जिन (4)86.07%90.71%88.99%90.34%87.31%
करापूर्व नफा₹2,463.70₹2,808.00₹4,881.98₹3,908.87₹2,668.99
करानंतरचा नफा₹1,753.00₹2,081.62₹3,447.21₹4,564.88₹947.42
PAT मार्जिन (5)16.20%20.64%17.56%31.49%10.41%
व्याज कव्हरेज (6)2.602.762.642.803.17
शुद्ध कर्ज/इक्विटी (7)1.911.821.981.094.41


वरील आकडेवारीतून दिसते की, कंपनीच्या आर्थिक स्थिरतेत काही सुधारणा झाली आहे, परंतु नफा आणि कर्जाच्या स्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

मित्रांनो कंपनीच्या स्पर्धकांमद्धे Adani Green आणि ReNew Energy Global अशी काही नावे आहेत.

NTPC Green Energy Valuation

मित्रांनो कंपनीचा P/E Ratio 148 जो इंडस्ट्रीच्या (153.44) तुलनेत अगदी थोडाच आहे. P/E Ratio म्हणजे काय समजून घेण्यासाठी आमचा PE ratio म्हणजे काय? हा लेख नक्की वाचा.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ डिटेल्स

तपशीलदिनांक/माहिती
आयपीओ तारीख19 नोव्हेंबर 2024 ते 22 नोव्हेंबर 2024
लिस्टिंग तारीखबुधवार, 27 नोव्हेंबर 2024
फेस व्हॅल्यू₹10 प्रति शेअर
प्राईस बँड₹102 ते ₹108 प्रति शेअर
लॉट साइज138 शेअर्स
एकूण इश्यू साईज₹10,000.00 कोटी
फ्रेश इश्यू₹10,000.00 कोटी
किमान रिटेल अर्ज₹14,904

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top