NPS Information In Marathi | NPS योजनेची माहिती
NPS Information In Marathi: नमस्कार मित्रांनो! आज आपण या लेखात नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) म्हणजे काय, यामध्ये गुंतवणूक कशी करावी, त्याचे फायदे आणि ते निवृत्ती नंतर कसे उपयोगी पडते या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
NPS म्हणजे काय?
NPS (National Pension Scheme) ही एक सरकारी योजना आहे, जी केंद्रीय पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) द्वारे व्यवस्थापित केली जाते.
ही योजना मुख्यतः 18 ते 65 वयातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. तुमच्या निवृत्ती नंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे एक ठोस आर्थिक स्रोत तयार करणे हा या योजनेचा हेतु आहे. तुम्ही या योजनेत नियमानुसार नियमित योगदान करू शकता आणि त्याचा लाभ निवृत्ती नंतर मासिक पेन्शनच्या स्वरूपात मिळवू शकता.
NPS योजना प्रकार
NPS योजनेचे दोन मुख्य प्रकार आहेत:
- टियर 1 अकाउंट: हा अकाउंट प्रकार मुख्य निवृत्ती गुंतवणूक प्रकार आहे. यामध्ये तुम्ही एकदा पैसे गुंतवले की ते निवृत्ती पर्यंत लॉक राहतात म्हणजेच या खात्यातील पैसे तुम्हाला निवृत्ती नंतरच परत मिळतात. हे खाते फक्त निवृत्ती नियोजनासाठी आहे, त्यामुळे यात टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात.
- टियर 2 अकाउंट: हे खाते टियर 1 पेक्षा अधिक लवचिक असते. यात तुम्ही कधीही पैसे जमा आणि काढू शकता. मात्र, या खात्यात कर सवलत मिळत नाही.
NPS मध्ये गुंतवणूक कशी करावी?
NPS मध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ई-एनपीएस पोर्टलच्या माध्यमातून किंवा जवळच्या कोणत्याही एनपीएस एजन्सीमध्ये जाऊन नोंदणी करू शकता. यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, आणि बँक पास बूक यासारखी आवश्यक कागदपत्रे लागतात.
NPS चे फायदे
- कर बचत: टियर 1 खात्यामध्ये तुम्हाला वार्षिक 50,000 पर्यंत अतिरिक्त कर लाभ मिळतो. 80CCD (1B) अंतर्गत हा लाभ दिला जातो.
- संपत्ती निर्माण: NPS हे लॉन्ग टर्म गुंतवणूक साधन असल्यामुळे, तुम्हाला कंपाऊंडिंगचा लाभ मिळतो. यामुळे तुमचे गुंतवलेले पैसे कालांतराने वाढत जातात.
- सुरक्षितता आणि लवचिकता: NPS ही सरकारद्वारे मान्यताप्राप्त योजना असल्याने सुरक्षितता अधिक आहे. तसेच टियर 2 अकाउंटमुळे तुम्हाला काही प्रमाणात लवचिकता सुद्धा मिळते.
- अनेक गुंतवणूक पर्याय: यात इक्विटी, कॉर्पोरेट बॉण्ड, आणि गवर्नमेंट सिक्युरिटीज या तीन मुख्य श्रेणी आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पैसे गुंतवू शकता.
NPS मध्ये गुंतवणूक कशी करावी?
NPS मध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षातून ठराविक रक्कम जमा करू शकता. टियर 1 खात्यात किमान 500 रुपये आणि टियर 2 खात्यात किमान 1000 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तुम्ही वर्षातून किमान एकदा NPS मध्ये योगदान करणे बंधनकारक आहे.
NPS मधून रक्कम काढण्याचे नियम
NPS मधून पूर्ण रक्कम निवृत्तीपूर्वी काढणे शक्य नाही, मात्र काही खास परिस्थितीत (उदा. घर खरेदी, गंभीर आजार) काही रक्कम काढता येते.
निवृत्तीच्या वेळी, NPS मधील 60% रक्कम एकरकमी काढता येते आणि उर्वरित 40% मासिक पेन्शन म्हणून प्रतेक महिन्याला तुम्हाला मिळत राहते.
NPS कोणासाठी योग्य आहे?
मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंट नंतर आर्थिक स्वतंत्र हवे असल्यास तुम्ही NPS मध्ये पैसे गुंतउ शकता, आणि हाच या योजनेचा मुख्य हेतु सुद्धा आहे.
खास करून रिटायरमेंट नंतर तुम्हाला जर काही पैश्यांची गरज पडणार असेल तर ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे.
रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल अधिक माहिती आमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय? या लेखात दिलेली आहे.
NPS करिता अर्ज कसा करावा?
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने NPS साठी अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही eNPS पोर्टल वापरू शकता. अर्ज करताना तुम्हाला ओळखपत्र आणि आधार कार्डची गरज पडते.
निष्कर्ष
मित्रांनो, NPS ही एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी तुम्हाला निवृत्ती नंतर आर्थिक स्थिरता देण्यास मदत करते. जर तुम्हाला निवृत्ती नंतरची काळजी आजपासूनच घ्यायची असेल तर NPS ही सर्वोत्तम योजना आहे. त्यामुळे आजच तुमच्या भविष्याचा विचार करून NPS मध्ये गुंतवणूक करा आणि सुखी निवृत्त जीवनाचा लाभ घ्या!
NPS आणि PPF मधील फरक जाणून घेण्यासाठी आमचा PPF म्हणजे काय? हा लेख नक्की वाचा.