मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय | Market capitalisation meaning in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ? आणि त्याचा अर्थ उदाहरणासाहित (Market capitalisation meaning in marathi with example) समजून घेणार आहोत.

मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ? (Market capitalisation meaning in marathi with example)

मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन किंवा मार्केट कॅप (Market capitalisation) यालाच मराठी मध्ये बाजार भांडवलीकरण असे म्हणतात.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर बाजार भांडवलीकरण (Market capitalisation) म्हणजे त्या कंपनीची एकूण किंमत होय.

एकूण किंमत म्हणजे काय तर समजा तुम्हाला ती पूर्ण कंपनीच विकत घ्यायची असेल, तर किती पैसे द्यावे लागतील ती रक्कम.

कुठली पण कंपनी किती मोठी आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे हे पहावे लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ? (Market capitalisation meaning in marathi with example)

मार्केट कॅपिटलायझेशन कसे काढतात ? (How to calculate Market capitalisation)

मित्रांनो मार्केट कॅप तुम्ही पुढील सूत्राच्या मदतीने काढू शकता.

मार्केट कॅप = एका शेअरची किंमत X एकूण शेअर ची संख्या.

समजा ABC Ltd. एक कंपनी आहे आणि तिच्या एका शेअरची किंमत आहे 100 रुपये, असे त्या कंपनीचे 10,000 शेअर बाजारात आहेत.

म्हणून आपल्या सूत्रा प्रमाणे,

मार्केट कॅप = 100 X 10,000.

1,000,000.

1,000,000 ही झाली त्या कंपनी ची बाजारातील एकूण किंमत किंवा वॅल्यू म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन.

मित्रांनो शेअर ची संख्या जरी फिक्स असली तरी शेअर ची किंमत मात्र दर रोज बदलात असते.

मार्केट कॅपिटलायझेशनचा उपयोग (Use of Market capitalisation)

मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशनचा उपयोग करून आपण कंपन्यांना 3 प्रकारात विभागू शकतो.

  • लार्ज कॅप
  • मिड कॅप
  • स्मॉल कॅप

1. लार्ज कॅप कंपनी म्हणजे काय ? (Large cap companies)

मित्रांनो भारतातल्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाणे ज्या पहिल्या 100 कंपन्या आहेत त्यांना आपण लार्ज कॅप कंपन्या असे म्हणतो.

याची काही उदाहरणे खालील प्रमाणे-

क्रमवारीकंपनीचे नावमार्केट कॅपिटलायझेशन (कोटी मध्ये)
1रिलायन्स इंडस्ट्रीज1,680,705.71
2टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस1,197,881.94
3एच.डी.एफ.सी. बँक931,855.87
4आयसीआयसीआय बँक659,479.70
5हिंदुस्तान युनिलिव्हर626,045.50
6इन्फोसिस599,762.80
7हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन544,034.30
8बजाज फायनान्स468,572.70
9भारती एअरटेल420,259.40
10कोटक महिंद्रा बँक390,848.10

मार्केटकॅपिटलायझेशन हे सतत बदलात राहणारी संकल्पना आहे म्हणून सुधारित मार्केट कॅपिटलायझेशनसाठी संकेत स्थळाला भेट ध्या.

2. मिड कॅप कंपनी म्हणजे काय ? (Mid Cap Companies)

मित्रांनो या प्रकारात टॉप 101 ते 250 या कंपन्यांचा समावेश होतो. जसं की आपण वरती पहिलं टॉप 100 कंपन्या तर लार्ज कॅप च्या प्रकारात येतात. म्हणून त्या पुढील टॉप 101 ते 250 या कंपन्या मिड कॅप या प्रकारात येतात.

3. स्मॉल कॅप कंपनी म्हणजे काय ? (Small cap companies)

या प्रकारात उरलेल्या सर्व छोट्या मोठ्या कंपन्या येतात, म्हणजे 251 वी कंपनी ते पुढच्या सर्व कंपन्या.

मित्रांनो लार्ज कॅप कंपन्या चांगल्या स्थिरस्थावर असतात. या कंपन्यांंनमध्ये पैसे गुंतवल्यास रिस्क एकदम कमी असते.

या उलट स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये परतावा हा जास्त मुळू शकतो पण रिस्क पण जास्त असू शकते.

मित्रांनो कंपनी निवडताना कधीच शेअर ची किंमत पाहून निवडू नका, म्हणजे एखादा शेअर 10 रुपयाचा आहे आणि एक 100 तर असे नाही की 10 रुपयाचा शेयर जास्त स्वस्त आहे म्हणजे चांगला आहे.

इथेच तुमची मदत करते मार्केट कॅपिटलायझेशन ! .

मार्केट कॅपिटलायझेशनचा अजून एक उपयोग म्हणजे या विभाजनवरून म्यूचुअल फंडचे वेग-वेगळे प्रकार पडतात. ज्या बद्दल माहिती आपण इक्विटी म्यूचुअल फंड या लेखात दिलेली आहे.

मार्केट कॅपिटलायझेशनवर प्रभाव करणारे घटक (Factors That Impact Market Caps)

  • कंपनीची कामगिरी – मित्रांनो कंपनीची कामगिरी जेवडी चांगली असणार तेव्हडी तिच्या शेयरला मागणी असणार. पर्यायी कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन वाढणार.
  • गुंतवणूकदारांचा कल – हा मुद्दा आणि वरील मुद्दा एकमेकांशी लिंक आहेत. जर एखादी कंपनी चांगला परतावा मिळून देत असेल तर गुंतवणूकदारांचा कल त्या कंपनी कडे जास्त वाढतो.
  • मार्केटचा मूड आणि दिशा – मित्रांनो मार्केट जर तेजीत असेल तर गुंतवणूकदारांचा खरेदीकडे जास्त कल असतो. पर्यायी शेयरची किंमत वाढते म्हणून मार्केट कॅपिटलायझेशन पण वाढते.
  • कंपन्या-कंपन्यातील स्पर्धा – मित्रांनो ज्या कंपन्या स्पर्धेमध्ये टिकतात मार्केटिंग चांगली करतात त्याच कंपन्या बाजारात टिकतात. मग अश्या कंपन्याकडे गुणवणूकदारांचा जास्त कल राहतो.

अधिक माहिती साठी सेबीच्या संकेत स्थळाला भेट द्या.

Leave a Comment