फंडामेंटल अ‍ॅनालिसिस म्हणजे काय? | Fundamental analysis in Marathi

फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? | Fundamental Analysis in Marathi

नमस्कार मित्रांनो! आज आपण या लेखात शेअर मार्केटमधील सर्वात महत्त्वाची संकल्पना फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? (Fundamental analysis in Marathi) याबद्दल बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत. हा लेख तुमच्यासाठी यशस्वी गुंतवणुकीची पहिली पायरी ठरेल.

मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे ‘फंडामेंटल ॲनालिसिस’ करणे म्हणजे त्या कंपनीचा ‘360 अंश (360 Degree)’ अभ्यास करणे होय. हे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला त्या कंपनीला अनेक मापदंड लावून तपासावे लागते, जेणेकरून आपण आपले कष्टाचे पैसे योग्य जागी गुंतवत आहोत याची खात्री होईल.

फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? (Meaning)

शब्दशः फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे ‘मूलभूत विश्लेषण’. पण फक्त शब्दशः अर्थ समजून घेऊन आपले भागणार आहे का? नक्कीच नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यापूर्वी ती कंपनी नेमके काय काम करते, ती नफ्यात आहे की तोट्यात, तिच्यावर किती कर्ज आहे आणि तिचे भविष्य काय असू शकते, याचा सविस्तर अभ्यास करणे म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस होय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फंडामेंटल ॲनालिसिस कसे करतात? (Approaches)

फंडामेंटल ॲनालिसिस करत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. यासाठी प्रामुख्याने 2 पद्धतींचा (Approaches) वापर केला जातो:

अप्रोच (Approach)अभ्यासाचा क्रम (Sequence)उदाहरण (Example)
1. टॉप डाऊन अप्रोच (Top-Down)अर्थव्यवस्था ➔ इंडस्ट्री ➔ कंपनीआधी भारताचा GDP ➔ मग टायर इंडस्ट्री ➔ मग MRF कंपनी
2. बॉटम अप अप्रोच (Bottom-Up)कंपनी ➔ इंडस्ट्री ➔ अर्थव्यवस्थाआधी MRF कंपनी ➔ मग टायर इंडस्ट्री ➔ मग भारताचा GDP

1. टॉप डाऊन अप्रोच (Top-Down Approach)

टॉप डाऊन अप्रोचमध्ये सर्वात अगोदर आपण इकॉनॉमीचा (Economy) अभ्यास करतो. जसे की, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी चालू आहे, एकंदरीत ग्रोथ रेट काय आहे वगैरे.

इकॉनॉमी ॲनालिसिस केल्यानंतर आपण करतो इंडस्ट्री ॲनालिसिस (Industry Analysis). म्हणजे एखाद्या ठराविक क्षेत्राचा अभ्यास करणे. उदा. ‘टायर्स’ (Tyres). आता टायर्स ही एक पूर्ण इंडस्ट्री आहे. आणि सर्वात शेवटी आपण एका कंपनीचा अभ्यास करतो. जसे की, MRF Tyres या एका विशिष्ट कंपनीचा अभ्यास.

2. बॉटम अप अप्रोच (Bottom-Up Approach)

बॉटम अप अप्रोचमध्ये आपण वरती पाहिल्याच्या अगदी उलट क्रम वापरतो. म्हणजे अगोदर आपण एका कंपनीचा (उदा. MRF) अभ्यास करतो, त्यानंतर ती कंपनी ज्या क्षेत्रात काम करते त्याचे (Tyre Industry) विश्लेषण करतो आणि सर्वात शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेचा (Economy) विचार करतो.


कंपनी ॲनालिसिस करताना तपासण्याचे मुद्दे

मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे ॲनालिसिस करत असताना आपण प्रामुख्याने खालील 2 प्रकारचे मुद्दे विचारात घेत असतो:

1. परिमाणात्मक मुद्दे (Quantitative Factors)

यामध्ये कंपनीचे आकडे (Numbers) आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स तपासली जातात:

  • बॅलन्स शीट (Balance Sheet): कंपनीची मालमत्ता आणि कर्ज किती आहे.
  • प्रॉफिट अँड लॉस अकाउंट (P&L): कंपनीचा वार्षिक नफा आणि तोटा किती आहे.
  • कॅश फ्लो स्टेटमेंट (Cash Flow): कंपनीच्या हातात प्रत्यक्षात किती कॅश येत आहे.

2. गुणात्मक मुद्दे (Qualitative Factors)

यामध्ये कंपनीचे काम करण्याची पद्धत तपासली जाते:

  • व्यवस्थापन क्षमता (Management): कंपनीचे मालक आणि मॅनेजमेंट किती प्रामाणिक आणि हुशार आहे.
  • कंपनीची कार्यक्षमता: कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती चांगली आहे.
  • R&D (Research): कंपनी भविष्यातील नवीन उत्पादनांवर पैसे खर्च करते की नाही.

(मित्रांनो, प्रॅक्टिकल उदाहरण पाहण्यासाठी तुम्ही आमचा D-Mart (Avenue Supermarts) फंडामेंटल ॲनालिसिस हा लेख नक्की वाचा.)


इंडस्ट्री ॲनालिसिस (Industry Analysis)

इंडस्ट्री ॲनालिसिस करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. समजा आपण ‘टायर इंडस्ट्री’चा विचार केला, तर टायर्स बनवण्यासाठी रबर हा कच्चा माल (Raw Material) लागतो, मग त्या रबराचे भाव सध्या कसे आहेत? भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे टायरच्या मागणीवर काय परिणाम होईल? अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला यामध्ये करावा लागतो.

इकॉनॉमी ॲनालिसिस (Economy Analysis)

इकॉनॉमी ॲनालिसिस करत असताना आपण पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असतो. मित्रांनो, तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले असेल की भारताचा GDP वेगाने वाढत आहे आणि नुकतेच भारताने इंग्लंडला मागे टाकून जगात 5 वे स्थान गाठले आहे. यावरून भारताची इकॉनॉमी चांगली कामगिरी करत आहे हे समजते.

पण केवळ GDP बघून चालत नाही, त्यासोबतच देशातील महागाई दर (Inflation), व्याजदर आणि सरकारी धोरणे यांसारखे इतर मापदंडही विचारात घेणे गरजेचे असते.

फंडामेंटल ॲनालिसिसचे महत्त्व

मित्रांनो, शेअर बाजारात कोणाच्याही टिप्सवर (Tips) विश्वास न ठेवता, स्वतः सखोल माहिती काढणे आणि मगच आपले कष्टाचे पैसे गुंतवणे नेहमी योग्य ठरते. फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला चांगल्यात चांगली कंपनी शोधण्यात मदत करते.

विशेष म्हणजे, तुम्ही स्वतः एकदा सर्व गोष्टी शिकून घेतल्या, की नंतर तुम्ही सहज ॲनालिसिस करून चांगल्यात चांगला स्टॉक निवडू शकता.

मित्रांनो, यातील ‘कंपनी ॲनालिसिस’ (Company Analysis) वरती तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असल्यास आपण एक वेगळा लेख पब्लिश करू. तसे आम्हाला कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की सांगा.

(सोबतच कंपनीचे व्हॅल्युएशन कसे काढावे यासाठी आमचा P/E Ratio म्हणजे काय? हा लेख नक्की वाचा.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top