D-Mart Fundamental analysis in Marathi : नमस्कार मित्रांनो! आज आपण या लेखात D-Mart फंडामेंटल अॅनालिसिस पाहणार आहोत. D-Mart, ज्याला Avenue Supermarts Ltd. म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय रीटेल क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे.
आजच्या लेखात आपण D-Mart च्या व्यवसायाची संरचना, आर्थिक कामगिरी, आणि गुंतवणूक करण्याच्या संधी यावर चर्चा करणार आहोत. चला तर मग, चांगला स्टॉक निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर एक नजर टाकू.
डी मार्ट फंडामेंटल अॅनालिसिस | D-Mart Fundamental analysis in Marathi
डी मार्ट चे संचालन आणि व्यवस्थापन
D-Mart ची स्थापना 2002 मध्ये राधाकिशन दमाणी यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली D-Mart ने भारतीय किरकोळ (Retail) क्षेत्रात एक मजबूत स्थान निर्माण केले.
तुम्हाला माहिती असेल, D-Mart घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, सौंदर्यप्रसाधने, आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या विविध वस्तूं आपल्या स्टोर मध्ये विकते.
डी मार्ट चे ब्रीद वाक्य आहे – “कमी खर्च, जास्त उत्पादन”. यामुळे ग्राहकांना उत्तम किंमतीत उत्कृष्ट वस्तू मिळतात.
मित्रांनो डी मार्ट च्या बिझनेस मॉडेल मध्ये ते डायरेक्ट फॅक्टरी टु ग्राहक म्हणजे आपण असा रुल फॉलो करतात. या मुळे मधले पैसे खाणारे दलाल डायरेक्ट गायब होतात आहे आपल्याला वस्तु या कमी किमतील मिळतात.
Financial performance
आता आपण D-Mart च्या आर्थिक कामगिरीकडे एक नजर टाकू.
2024 च्या पहिल्या तिमाहीत D-Mart ने महसूल आणि नफा दोन्ही बाबतीत चांगली वाढ नोंदवली आहे. सोबतच 2023 च्या तिमाहीत EPS (Earnings Per Share) ₹9.10 होता, जो 2022 च्या तिमाहीत ₹8.53 होता. म्हणजे येथे ही चांगली पॉजिटिव ग्रोथ दिसून येत आहे.
ही वाढ म्हणजे D-Mart मध्ये लोकांनी दाखवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट मार्जिन साधारणतः 5.5% आहे, जो रीटेल क्षेत्रात चांगला मानला जातो.
शेअरहोल्डिंग पॅटर्न
D-Mart मध्ये राधाकिशन दमाणी यांचा मोठा हिस्सा असल्यामुळे व्यवस्थापन स्थिर राहते. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यास मदत मिळत आहे. D-Mart च्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये देखील सकारात्मक बदल झाले आहेत. सध्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे प्रमाण 23% आहे.
एकंदरीतच कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न लक्ष्यात घेता सध्या तरी कंपनी खूप स्टेबल दिसत आहे.
कर्ज आणि बॅलन्स शीट
D-Mart ने आपल्या कडील कर्ज खूप लिमिट मध्ये ठेवलं आहे. म्हणून डी मार्ट हा लंबी रेस का घोडा आहे.
D-Mart चा डेट टू इक्विटी रेशो 0.02 च्या आसपास आहे, म्हणजेच कंपनी स्वतःच्या निधीतून व्यवसाय चालवत आहे. तुम्ही विचार करत असाल की कर्ज कमी असणं चांगलं का? कारण कमी कर्जामुळे कंपनीवर आर्थिक ताण कमी होतो, आणि ते त्यांच्या दीर्घकालीन वाढीच्या योजनांसाठी आवश्यक तेव्हडे पैसे खर्च करू शकतात.
D-Mart चे भविष्य: वाढीच्या संधी आणि आव्हाने
मित्रांनो भारतातील रीटेल मार्केट हे सध्या चांगली ग्रोथ दाखवत आहे. भारतात होणारी डिजिटायझेशनची प्रगती, ऑनलाइन शॉपिंगची वाढती लोकप्रियता, आणि D-Mart च्या नवीन शाखा उघडल्यामुळे कंपनीची ग्रोथ चांगली सुरू आहे. D-Mart ने 2023 मध्ये 20 नवीन स्टोअर उघडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या स्टोअरची संख्या 300 च्या पुढे गेली आहे.
D-Mart चे काही खास वैशिष्ट
D-Mart चं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या स्टोर मध्ये ते कमी किंमतीत चांगल्यात चांगल्या वस्तु उपलब्ध करून देतात. तुम्ही कधी डी मार्ट मध्ये गेला असाल तर तुम्ही पहिलं असेल की तिथे सर्व गोष्टी तुम्हाला लागणाऱ्या आणि न लागणाऱ्या या एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. हे ग्राहकांच्या दृष्टीने खूप सोयीचे होते.
डी मार्ट चे व्हॅल्युएशन
D-Mart च्या शेअर ची किंमत सध्या स्टेबल आहे. काही क्वार्टर मध्ये कंपनीच्या शेअर किंमतीत घट झाली होती, पण लॉन्ग टर्म चा विचार केला तर डी मार्ट ही गुंतवणुकीसाठी खूप चांगली कंपनी आहे असे आपल्या लक्ष्यात येईल.
सध्या D-Mart चा P/E रेशो 98 च्या आसपास आहे, जो रीटेल क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त आहे. पण P/E रेशो जास्त असला तरी कंपनी चे इतर fundamentals बरेच स्ट्रॉंग आहेत.
निष्कर्ष
मित्रांनो सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की डी मार्ट ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून एक चांगली कंपनी आहे. सोबत कंपनीचे भविष्यातील धोरण पण एकंदरीत चांगले पाहायला मिळत आहे. तुम्ही तर लॉन्ग टर्म गुंतवणुकीचा विचार करत असाल तर डी मार्ट तुमच्या साठी चांगला पर्याय असू शकतो.
Disclaimer: या लेखातील माहिती शेअर बाजाराच्या संदर्भातील आहे. कृपया कोणत्याही गुंतवणुकीच्या आधी योग्य सल्लागाराचा सल्ला घ्या.