सिबिल स्कोर म्हणजे काय | CIBIL Score information in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये सिबिल स्कोर म्हणजे काय आणि सिबिल स्कोर बद्दल सर्व माहिती (CIBIL Score information in marathi) अगदी सखोलपणे जाणून घेणार आहोत.

सर्वात अगोदर सिबिल स्कोरलाच क्रेडिट स्कोर (Credit Score) असेही म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी हे दोन शब्द आपण आलटून पालटून वापरू शकतो.

सिबिल स्कोर बद्दल माहिती (CIBIL Score information in Marathi)

CIBIL म्हणजे काय ? (CIBIL score meaning in Marathi)

मित्रांनो सिबिलचा लॉन्ग फॉर्म (CIBIL long form) होतो क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited) अर्थात CIBIL.

ही एक भारतातील अशी कंपनी आहे जी भारतातील लोकांचा क्रेडिट डेटा किंवा माहिती गोळा करते ती माहिती आपल्याकडे साठवते आणि बँकांना ती माहिती पुरवते.

ज्याचा वापर करून बँका कोणाला कर्ज (Loan) द्यायचे हे ठरवतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिबिल स्कोर म्हणजे काय ? (what is CIBIL score in marathi ?)

मित्रांनो सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणजेच क्रेडिट स्कोर (Credit Score) ही एक तीन अंकी संख्या आहे, जी 300 ते 900 च्या मध्ये असू शकते.

ही संख्या तुमचा आर्थिक व्यवहारातील इतिहास (क्रेडिट हिस्ट्री) दर्शवते.

सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही याच्या अगोदर जे लोन घेतले होते, त्या लोणचे हफ्ते (EMI) रेग्युलर भरले की नाही याची माहिती देणार स्कोर म्हणजे सिबिल स्कोर होय.

या मध्ये तुमचा स्कोर जेवडा जास्त तेव्हडे बँका तुम्हाला लवकर आणि सहज कर्ज देतात.

आपण साधारणतः 750 पेक्ष्या जास्त स्कोरला चांगला सिबिल स्कोर म्हणतो.

या पेक्ष्या कमी स्कोर असल्यास बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकते.

क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट रीपोर्ट फरक

मित्रांनो क्रेडिट स्कोर ही फक्त एक तीन अंकी संख्या आहे.

पण क्रेडिट रीपोर्ट मध्ये तुमची सर्व माहिती जसे की तुम्ही याच्या अगोदर कोठून कोठून कर्ज घेतलेले आहे. त्याचा कालावधी किती होता, त्याचे हफ्ते किती दिवसाला भरले, काही थकबाकी किंवा एखादा हप्ता भरलाच नाही असे काही आहे का.

या सर्व गोष्टी अगदी सखोल पणे या रीपोर्ट मध्ये दिलेल्या असतात.

सिबिल स्कोर कसा तपासायचा

यासाठी अनेक मोफत वेबसाइट आहेत जसे की पैसाबजार.

सर्वात अगोदर तुम्ही पैसाबजार या संकेत स्थळावर जायचे आहे. तिथे तुमची माहिती जसे की नाव, फोन नंबर भरायची आहे.

सिबिल स्कोर कसा तपासायचा

या नंतर तुम्हाला तुमच्या नंबर वरती एक OTP प्राप्त होईल तो एंटर करून Get free credit report या बटणवर क्लिक करायचे आहे.

या नंतर तुमची पॅन कार्ड माहिती भरायची आहे.

तुमचा रीपोर्ट काहीसा पुढील प्रमाणे असेल.

CIBIL Score information in marathi

हा रीपोर्ट paisabazaar.com वरती फ्री मध्ये पाहू शकता.

सिबिल स्कोर वरती परिणाम करणारे घटक

1. पेमेंट हिस्ट्री (Payment History)

मित्रांनो तुमच्या सिबिल स्कोर वरती परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नियमित कर्जाची परतफेड.

जर तुमच्या कडून एखादा कर्जाचा हप्ता भरायचा राहून गेला तर लेगेचच तुमचा सिबिल स्कोर खाली घसरतो.

म्हणून एक चांगला क्रेडिट स्कोर रखण्यासाठी वेळच्या वेळी कर्जाची परतफेड करणे खूप महत्वाचे असते.

2. क्रेडिट वापर (Credit utilization)

क्रेडिट वापर म्हणजे तुम्हाला मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर.

समजा तुमच्या कडे एक क्रेडिट कार्ड आहे ज्याची मर्यादा 1,00,000 आहे. तर चांगला क्रेडिट स्कोर रखण्यासाठी तुम्ही फक्त 30% म्हणजेच 30,000 वापरले पाहिजेत.

याचा फायदा असा की बँकला तुम्ही दाखवत आहात की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर संयमाने करत आहात.

3. क्रेडिटचे वय (Age of Credit)

समजा एखादे क्रेडिट कार्ड तुमच्या कडे 5 वर्षापासून आहे. या कार्ड वरती तुमची बरीच क्रेडिट हिस्ट्री तयार झालेली असते.

यामुळे तुम्हाला भविष्यात नवीन कर्ज मिळण्यात किंवा नवीन क्रेडिट कार्ड मिळण्यात खूप मदत होते.

4. टाइप्स ऑफ लोन अकाउंट्स

जर तुम्ही वेगवेगळे लोन घेतलेले असतील जसे की बाइक लोन , एड्युकेशन लोन तर यातील विविधतेचा एक चांगला परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वरती होतो.

5. इतर घटक

सारखे सारखे कर्जाची मागणी करणे किंवा त्याची चौकशी करणे यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोर वरती नेगेटिव परिणाम होतो.

सिबिल स्कोर कसा वाढवायचा

1. कर्जाचे हफ्ते वेळेवर भरणे

मित्रांनो कर्जाची परतफेड वेळेवर करणे चांगला सिबिल स्कोर रखण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

तुमचे हफ्ते नियमित जात आहेत का हे तपसून पाहत जा. जर एखादा हप्ता थकला तर लगेच त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वर होतो.

2. आपला सिबिल स्कोर वेळोवेळी तपासत रहा

मित्रांनो ठराविक काळानंतर आपला क्रेडिट स्कोर तपासत जा. कुठले घटक त्यावर वाईट परिणाम करत आहेत किंवा कुठली थकबाकी तर नाही आणि असेल तर ती तात्काळ भरा.

3. आपल्या कर्जाचा वापर मर्यादित ठेवा

जसं की मी तुम्हाला वरती सांगितल नेहमी आपल्याला मंजूर झालेल्या रक्कमेच्या 30% च्या आसपास आपण कर्जाचा वापर केला पाहिजे याने तुमच्या स्कोर मध्ये वाढ होण्यास मदत होते.

तुम्हाला आमचे हे लेख नक्की आवडतील

Leave a Comment