नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (Cryptocurrency information in Marathi), ती कसे कार्य करते, त्याचे फायदे आणि तोटे आणि सोबतच बिटकॉइन म्हणजे काय (Bitcoin mhanje kay) याबद्दल माहिती पाहणार आहोत.
क्रिप्टोकरन्सी ही एक अभिनव आर्थिक संकल्पना आहे जी गेल्या काही वर्षांत जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
Cryptocurrency information in Marathi | Cryptocurrency in Marathi
क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक डिजिटल किंवा आभासी (Vertual) चलन आहे. व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी बँका किंवा इतर केंद्रीय प्राधिकरणांवर अवलंबून नसते. ते पीअर-टू-पीअर (खरेदीदार आणि विकणार) सिस्टम आहे जे वापरकर्त्यांना थेट व्यवहारांमध्ये गुंतण्यास सक्षम करते किंवा मुभा देते.
म्हणजे समजा तुम्ही मला 100 रुपयाची क्रिप्टोकरन्सी पाठवली तर ती डायरेक्ट माझ्या बँक अकाऊंट मध्ये किंवा ज्याला क्रिप्टो वॉलेट म्हणतात त्यात जमा होते.
या व्यवहारात कुठलीच बँक किंवा सरकारी संस्था काम करत नाही किंवा मध्यस्ती करत नाही.
क्रिप्टोकरन्सी व्यवहार क्रिप्टोग्राफीद्वारे (Cryptography) सुरक्षित केले जातात, ज्यामुळे फसवणूक आणि नकली करणे जवळजवळ अशक्य होते.
क्रिप्टोकरन्सी कशी काम करते? | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी ही विकेंद्रित (Decentralized) पद्धतीने कार्य करते. या विकेंद्रीकरणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की सर्व क्रिप्टोकरन्सी शासकीय नियंत्रणापासून मुक्त आहेत.
तयार केलेल्या व्यवहारांच्या प्रत्येक ब्लॉकचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्याच्या अधिकृततेची पडताळणी करण्यासाठी कॉम्प्लेक्स गणितीय समीकरणे सोडवणाऱ्या कॉम्प्यूटर्सचा वापर केला जातो. एकदा व्यवहार वैध ठरला की, तो ब्लॉकचेनमध्ये समाविष्ट केला जातो.
ब्लॉकचेन म्हणजे काय ?
ब्लॉकचेनला तुम्ही एक खाते वही म्हणू शकता ज्यात क्रिप्टोकरन्सी मध्ये होणाऱ्या प्रतेक व्यवहाराचा तपशील असतो.
क्रिप्टोकरन्सी मायनिंग म्हणजे काय ?
क्रिप्टोकरन्सी मायनिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात कॉम्प्लेक्स कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे व्यवहार पडताळणी करण्याचे काम केले जाते. आणि जे हे व्यवहार पडताळणी करण्याचे काम करतात त्यांना क्रिप्टोकरन्सी मायनर्स असे म्हणतात.
मित्रांनो क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल करंसी असल्या मुळे यात पावरफुल सांगणकांचा म्हणजे (Computers) चा वापर केला जातो .
समजा मी क्रिप्टोकरन्सी मायनिंग करत आहे. मी काय करणार एक शक्तिशाली संगणक (Computer) खरेदी करणार आणि जगात जे काही क्रिप्टोकरन्सी व्यवहार होत आहेत त्या साठी माझ्या संगणक उपलब्ध करून देणार.
तुम्ही म्हणाण की यात तुमचा काय फायदा ? . तर मित्रांनो माझ्या संगणकाद्वारे पूर्ण केलेल्या प्रतेक व्यवहाराच्या बदल्यात मला काही भाग मिळतो.
आणि याच संकल्पनेवर क्रिप्टोकरन्सी मायनर्स काम करतात. कारण त्यांना पण संगणकाचा खर्च लाइट बिल या सारखे खर्च असतात.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे
- विकेंद्रीकरण: क्रिप्टोकरन्सीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँका किंवा सरकार यांसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणाकडून क्रिप्टोकरन्सीला नियंत्रित केले जात नाही. याचा अर्थ असा की क्रिप्टोकरन्सीची किंमत तिच्या मागणी नुसार कमी जास्त होते. कुठली बँक किंवा सरकार तिची किंमत ठरवू शकत नाही.
- सुरक्षितता: क्रिप्टोकरन्सीसाठी क्रिप्टोग्राफी ही प्रणाली वापरली जाते, ह्या प्रणाली मुळे सर्व व्यवहार सुरक्षित बनतात.
- गुपीतता : क्रिप्टोकरन्सी एक निश्चित स्तरावर अनामितता (गुपीतता) प्रदान करते, ज्याचा अर्थ व्यवहारांचा मागोवा घेणे कठिण होते. कुठल्या दोन व्यक्तींमध्ये किती रककमेचा व्यवहार झाला हे कोणालाच माहीत नसते.
- कमी शुल्क: क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहार शुल्क पारंपरिक आर्थिक संस्थांने आकारलेल्या शुल्कापेक्षा खूपच कमी असते.
- जागतिक मान्यता: क्रिप्टोकरन्सी जगभरातील पेमेंट स्वीकारण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग ऑफर करते. अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीला मान्यता मिळालेली आहे.
क्रिप्टोकरन्सीचे तोटे
- अस्थिरता: क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात, ज्यामुळे ते गुंतवणूकीसाठी धोकादायक होते.
- गुन्हेगारी कारवायांमध्ये वापर: क्रिप्टोकरन्सीच्या निनावी स्वरूपामुळे त्यांचा वापर काळ्या बाजारातील व्यवहारांसाठी होऊ शकतो.
बिटकॉइन म्हणजे काय (Bitcoin mhanje kay)
बिटकॉइन ही पहिली आणि सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे. २००९ मध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या अज्ञात व्यक्तीने ही करन्सी तयार केली होती. बिटकॉइन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करते.
थोडक्यात बिटकॉइन सुद्धा एक क्रिप्टोकरन्सीच आहे, म्हणजे आपण जी माहिती वरती समजाऊन सांगितली ती सर्व माहिती प्रतेक क्रिप्टोकरन्सीला लागू होते.
तुम्ही म्हणान की बिटकॉइन व्यतिरिक्त अजून कुठल्या क्रिप्टोकरन्सी आहेत , तर त्या पुढील प्रमाणे-
- बिटकॉइन (BTC): २००९ मध्ये सुरू झालेली पहिली आणि सर्वाधिक प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे .
- इथेरियम (ETH): स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स कार्यक्षमतेसाठी ओळखली जाणारी, बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी आहे.
- टेथर (USDT): अमेरिकन डॉलरशी जोडलेले स्थिर चलन (स्टेबलकॉइन), म्हणजेच त्याचे मूल्य १ डॉलरच्या जवळ राहण्याचा उद्देश असतो.
- बायनन्स कॉइन (BNB)
- सोलाना (SOL)
- कार्डानो (ADA)
- यूएसडी कॉइन (USDC): अमेरिकन डॉलरशी जोडलेले आणखी एक स्थिर चलन (स्टेबलकॉइन).
- डॉगकोइन (DOGE)
या सोबतच तुम्ही विकिपीडीया वरील हा लेख पण वाचू शकता.
सोबतच आमचा शेअर मार्केट म्हणजे काय हा लेख सुद्धा नक्की वाचा.