Intraday trading in Marathi

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Intraday trading in Marathi

मित्रांनो शेअर मार्केट हे केवळ लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी नसून, इंट्राडे ट्रेडिंग सारख्या गोष्टींमधून तुम्ही थोड्या वेळात भरपूर नफा देखील कामऊ शकता. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार एकाच दिवसात शेअर्स खरेदी आणि विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण इंट्राडे ट्रेडिंग हा प्रकार धोका आणि जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठीच योग्य मानला जातो.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Intraday trading meaning in Marathi

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आज खरेदी केलेले शेअर आजच विकून टाकणे. यामध्ये ट्रेडरला शेअर्स आपल्या डिमॅट खात्यात ठेवता येत नाहीत, कारण बाजार बंद होण्याआधीच सर्व व्यवहार पूर्ण करावे लागतात. यामुळे, बाजारातील एका दिवसात किंवा थोड्या कालावधीत जो काही चढ उतार होतो त्याचा फायदा तुम्हाला करून घ्यावा लागतो.

इंट्राडेचा सगळा गेम हा पट पट निर्णय घेण्यात आहे. कुठला शेअर कधी घ्यायचा आणि कधी विकायचा हे पटकन समजले पाहिजे, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त नफा मिळऊ शकाल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंट्राडे ट्रेडिंग कसे कार्य करते? | Intraday trading in Marathi

  • ट्रेडरला बाजाराच्या सुरुवातीला एक विशिष्ट शेअर निवडायचा असतो.
  • त्या शेअरच्या किंमतीतील बदलांचे तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल अनॅलिसिस) करून योग्य खरेदी-विक्रीचे निर्णय घेतले जातात.
  • समजा ट्रेडरने सकाळी १०० रुपयांना शेअर खरेदी केला आणि दुपारी १०५ रुपयांना विकला, तर त्याला ५ रुपयांचा नफा होतो.
  • पण पण पण शेअरची किंमत जर वाढण्याच्या ऐवजी कमी झाली तर तुमचे मोठे नुकसान पण होऊ शकते.

इंट्राडे ट्रेडिंगचे प्रकार

इंट्राडे ट्रेडिंगचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन आणि धोरण असते.

1. मोमेंटम ट्रेडिंग (Momentum Trading)

कसे काम करते?

  • या पद्धतीत बाजारातील ट्रेंड आणि Momentum चा अभ्यास केला जातो.
  • कोणत्या शेअरच्या किमतीमध्ये वेगाने वाढ किंवा घट होत आहे, हे ओळखून त्यात ट्रेडिंग केली जाते.
  • मोठ्या ब्रेकआउट्स किंवा अचानक होणाऱ्या हालचाली (जसे की, आर्थिक घोषणा किंवा कंपनीच्या बातम्या) यांचा फायदा घेतला जातो. म्हणून तुम्हाला अश्या बारीक बारीक गोष्टी आणि बतम्यावर्ति लक्ष ठेऊन राहावे लागते.

2. ब्रेकआउट ट्रेडिंग (Breakout Trading)

कसे काम करते?

  • बाजारातील महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेसिस्टन्स लेव्हल्स ओळखल्या जातात.
  • जर एखादा शेअर ठराविक स्तरावर जाऊन नवीन उच्चांक किंवा नीचांक गाठत असेल, तर त्याचा फायदा घेत ट्रेडिंग केली जाते.
  • उदाहरणार्थ, जर कोणता शेअर 200 रुपयांच्या Resistance पातळीवर अडकला असेल आणि अचानक ती ओलांडून वर गेला, तर तो शेअर खरेदी केला जातो.

3. स्कॅल्पिंग (Scalping)

कसे काम करते?

  • स्कॅल्पिंग मध्ये खूप लहान कालावधीत (सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंत) ट्रेडिंग केली जाते.
  • छोट्या किंमतीतील बदलांवर लक्ष केंद्रित करून वारंवार खरेदी-विक्री केली जाते.
  • एकाच ट्रेडमध्ये मोठा नफा न मिळवता अनेक लहान-लहान ट्रेडमध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न स्कॅल्पिंग मध्ये केला जातो.

4. रिव्हर्सल ट्रेडिंग (Reversal Trading)

कसे काम करते?

  • रिव्हर्सल ट्रेडिंग या प्रकारात बाजारातील ट्रेंड बदलण्याच्या स्थितीचा अंदाज घेतला जातो.
  • उदाहरणार्थ, जर तुम्हाला वाटले की एखादा शेअर सारखा वाढत आहे आणि टेक्निकल अनॅलिसिस नुसार तो रिव्हर्स होण्याची शक्यता असेल, तर तुम्ही तो शेअर विकून टाकणार आणि यातून प्रॉफिट कामावणार.
  • उलट, एखादा शेअर बऱ्याच दिवसापासून खाली पडत असेल आणि तुम्ही केलेल्या अनॅलिसिस वरुण तुम्हाला तो अचानक जंप घेणार असे वाटत असेल तर तुम्ही त्याला विकत घेणार.

5. रेंज ट्रेडिंग (Range Trading)

कसे काम करते?

  • काही वेळेस बाजार विशिष्ट रेंजमध्ये चालतो.
  • अशा परिस्थितीत सपोर्ट (Support) आणि रेसिस्टन्स (Resistance) लेव्हल्स ओळखून ट्रेडिंग केली जाते.
  • उदाहरणार्थ, जर एखादा शेअर 150 ते 160 रुपयांच्या दरम्यान वारंवार फिरत असेल, तर 150 वर खरेदी आणि 160 वर विक्री केली जाते.

इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे

  1. जलद नफा मिळवण्याची संधी – योग्य ज्ञान आणि स्ट्रॅटजीने कमी वेळेत चांगला परतावा मिळवता येतो.
  2. मार्जिन ट्रेडिंगचा लाभ – इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ब्रोकर मार्जिन सुविधा देतो, म्हणजेच कमी भांडवलात मोठी गुंतवणूक करता येते.
  3. दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज नाही – एका दिवसात व्यवहार पूर्ण होतो, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या रिस्क पासून बचाव करता येतो.
  4. तांत्रिक विश्लेषणाचा फायदा – मार्केटमधील ट्रेंड आणि hints चा योग्य अभ्यास केल्यास, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन चांगला नफा मिळवता येतो.

इंट्राडे ट्रेडिंगचे तोटे

  1. जास्त जोखीम – बाजारातील किंमतींमध्ये मोठे चढ-उतार होतात, ज्यामुळे क्षणात मोठे नुकसान होऊ शकते.
  2. भावनिक तणाव – सततच्या किंमतीतील चढ-उतारांमुळे तणाव आणि मानसिक दडपण वाढते.
  3. सतत लक्ष ठेवण्याची गरज – इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बाजारावर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करावे लागते, ज्यामुळे वेळेची आवश्यकता वाढते.
  4. सर्वांसाठी योग्य नाही – नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी हे ट्रेडिंग धोकादायक ठरू शकते, कारण बाजाराची सखोल माहिती आणि अनुभव आवश्यक असतो.

इंट्राडे ट्रेडिंग यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

मार्केटचा अभ्यास करा – शेअर्सच्या किंमतीतील चढ-उतार आणि बाजारातील ट्रेंड समजून घ्या. यासाठी काही बेसिक गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे असते. म्हणून वेगवेगळी शेअर मार्केट बुक्स तुम्ही वाचू शक्यता.
स्टॉप-लॉस वापरा – संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी स्टॉप-लॉस सेट करणे गरजेचे आहे.
भावनिक निर्णय टाळा – घाईगडबडीत किंवा भावनिक निर्णय घेणे टाळा, तांत्रिक विश्लेषणावर आधारित ट्रेड करा. जर तुम्हाला टेक्निकल अनॅलिसिस वरती लेख हवा असल्यास आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.
योग्य ब्रोकरेज प्लॅटफॉर्म निवडा – कमी ब्रोकरेज आणि चांगल्या सुविधा देणारा ब्रोकिंग प्लॅटफॉर्म निवडा.
ट्रेडिंगचा दररोज सराव करा – सुरुवातीला डेमो ट्रेडिंग करून सराव करा आणि नंतरच खऱ्या ट्रेडिंगला सुरुवात करा. आजकाल मार्केट मध्ये खूप सारे मोबाइल अप्स आलेले आहेत त्यावरती तुम्ही डेमो ट्रेडिंग करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top