Groww IPO details in Marathi

Groww IPO details in Marathi | Groww IPO मराठी माहिती

Groww IPO details in Marathi: नमस्कार मित्रांनो! आज आपण Groww Limited IPO बद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून या IPO बद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे, आणि त्यामुळेच आपण हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Groww IPO Introduction

मित्रांनो, Groww Limited ही कंपनी भारतातील अग्रगण्य फिनटेक (Fintech) कंपन्यांपैकी एक आहे. Groww या प्लॅटफॉर्मवरून आपण Mutual Funds, शेअर्स, IPO, Gold, आणि ETF मध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ही कंपनी 2016 साली Bengaluru येथे सुरू झाली. सुरुवातीला Groww फक्त Mutual Fund गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध होती, पण कालांतराने कंपनीने शेअर मार्केट ट्रेडिंग, SIP, आणि विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले.

सध्या Groww चे ॲप वापरणारे 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत, आणि कंपनी सतत नवी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा देत आहे. मी स्वतः पण म्यूचुअल फंड गुंतवणुकीसाठी याच ॲपचा वापर करतो.

इंडस्ट्री अनॅलिसिस

मित्रांनो, भारतात सध्या फिनटेक इंडस्ट्री अतिशय वेगाने वाढत आहे. गुंतवणुकीबद्दलची जागरूकता वाढल्यामुळे लोक आता मोबाईल ॲप्सद्वारे थेट शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत.

Groww, Zerodha, Upstox आणि Angel One या कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. यापैकी Groww ने आपल्या सोप्या इंटरफेसमुळे आणि पारदर्शक फी स्ट्रक्चरमुळे युजर्समध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

तज्ञांच्या मते, पुढील काही वर्षांत भारतात ऑनलाईन गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढणार आहे, आणि या वाढीचा थेट फायदा Groww सारख्या कंपन्यांना होणार आहे.

Groww Growth Analysis

मित्रांनो, गेल्या काही वर्षांतील Groww च्या वाढीचा विचार केला तर कंपनीने उत्तम कामगिरी दाखवली आहे. खालील आकडेवारीतून तुम्हाला कंपनीच्या वाढीचा अंदाज येईल —

KPIFY2022FY2023FY2024Q1 FY2025
एकूण उत्पन्न (₹ कोटी)3511,2772,580780
निव्वळ नफा (₹ कोटी)-23973448182
नफा मार्जिन-68%5.7%17.3%23.3%
सक्रिय युजर्स (कोटी)3.15.89.210.5

वरील आकडे पाहता Groww कंपनीने गेल्या काही वर्षांत सातत्याने उत्पन्न आणि नफ्यात वाढ केली आहे.

Groww Financial Analysis

मित्रांनो, Groww चे आर्थिक निकाल पाहता कंपनी आता तोट्यातून बाहेर पडून चांगला नफा कमावू लागली आहे. कंपनीचा महसूल आणि ग्राहकसंख्या दोन्ही झपाट्याने वाढत आहेत.

त्याचबरोबर कंपनीने स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले असून, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही क्षेत्रात उत्तम वाढ दिसून येत आहे.

महत्वाचे मुद्दे – जोखीम

मित्रांनो, प्रत्येक कंपनीप्रमाणेच Groww मध्ये पण काही जोखीम आहेत.

  • भारतातील फिनटेक क्षेत्रात स्पर्धा प्रचंड आहे. Zerodha, Upstox, Angel One या मोठ्या कंपन्या त्याच मार्केटमध्ये आहेत.
  • सेबी आणि RBI यांच्या धोरणांमध्ये बदल झाल्यास कंपनीच्या बिझनेसवर परिणाम होऊ शकतो.
  • तांत्रिक अडचणी, सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसी ही सुद्धा महत्त्वाची जोखीम मानली जाते.

Groww IPO details in Marathi

  • IPO तारीख: 18 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025
  • प्राइस बँड: ₹820 ते ₹865 प्रति शेअर
  • एकूण इश्यू आकार: ₹3,500 कोटी
  • फ्रेश इश्यू: ₹2,500 कोटी
  • ऑफर फॉर सेल (OFS): ₹1,000 कोटी
  • लिस्टिंग तारीख: 25 नोव्हेंबर 2025
  • एक्सचेंज: NSE आणि BSE

कंपनी IPO मधून जमा होणारी रक्कम तंत्रज्ञान सुधारणा, मार्केट विस्तार, आणि नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी वापरणार आहे.

थोडक्यात महत्वाचे

मित्रांनो, Groww Limited ही कंपनी भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फिनटेक कंपन्यांपैकी एक आहे.
ऑनलाईन गुंतवणुकीकडे वाढता कल आणि कंपनीचा मजबूत ग्राहक आधार पाहता हा IPO गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरू शकतो.

तरीसुद्धा, नेहमीप्रमाणे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतंत्र सल्लागाराचा सल्ला घ्या.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना पण हा लेख नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top