डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे | Demat account information in Marathi

डिमॅट अकाउंट म्हणजे काय? | Demat account information in Marathi

Demat account information in Marathi

Demat account information in Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण गुंतवणुकीतलं एक महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल म्हणजे डिमॅट अकाउंट याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाने डिमॅट अकाउंट उघडणे गरजेचे असते, पण नक्की डिमॅट अकाउंट म्हणजे काय? आणि ते कसं ओपन करायचं चला, तर मग याबद्दल समजून घेऊ.

डिमॅट अकाउंट म्हणजे काय? | Demat account meaning in Marathi

डिमॅट अकाउंट म्हणजे (Demat meaning in Marathi) आपल्या शेअर्स व अन्य सिक्युरिटीजच्या डिजिटल साठवणीसाठी असलेले एक प्रकारचे खाते होय.

मित्रांनो आधीच्या काळात, शेअर्सचे कागदी प्रमाणपत्र असायचे, पण आता हे सर्व शेअर डिजिटल स्वरूपात आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये साठवले जातात.

ज्या प्रकारे बँक अकाऊंटमध्ये आपण पैसे ठेवतो, तसंच डिमॅट अकाऊंटमध्ये आपले शेअर्स आणि अन्य सिक्युरिटीज ठेवता येतात. यामुळे तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोपी बनते.

समजा तुम्हाला तुमचे पैसे शेअर मार्केट , म्यूचुअल फंड किंवा बॉन्ड मध्ये गुंतवायचे आहेत. तर मग या सगळ्या मध्ये तुम्ही पैसे डायरेक्ट गुंतऊ शकता का ? तर उत्तर आहे नाही.

मग यासाठी लागतो एक एजेंट. याच एजेंटला ब्रोकर असेही म्हणतात. भारतात वेगवेगळे ब्रोकर आहेस जसे की Zerodha, Upstox , Groww किंवा Angle Broking.

थोडक्यात तुम्हाला जी पण गुंतवणूक करायची आहे ती फक्त यांच्या माध्यमातूनच करता येते.

यासाठी तुमच एक खातं उघडलं जातं त्यालाच डिमॅट अकाउंट असे म्हणतात.

जसं की मी वरती सांगितल डिमॅट अकाउंट मध्ये तुमचे शेअर्स इलेक्ट्रोनिक पद्धतीने साठवले जातात. शेअर्स सोबतच डिमॅट अकाउंट मध्ये बॉन्ड आणि ETF पण स्टोर केले जातात

डिमॅट अकाऊंटचे फायदे

1. सुरक्षितता

अगोदरच्या काळात शेअर कागदाचे असल्याने शेअर्स हरवण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असायचा, पण डिमॅट अकाऊंटमुळे ते पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आता सर्व शेअर्स तुमच्या डिजिटल खात्यात सुरक्षित असतात.

2. जलद व्यवहार

डिमॅट अकाऊंटमुळे शेअर्सची खरेदी-विक्री काही क्षणांत करता येते. तुमचे व्यवहार सहजपणे आणि कमी वेळेत पूर्ण होतात.

3. कमीतकमी खर्च

शेअर्सची साठवण कागदी पद्धतीपेक्षा कमी खर्चात होते आणि देखभालीसाठी वेगळा खर्च लागत नाही.

4. एकाच ठिकाणी साठवण

तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बॉंड्स, आणि सरकारी सिक्युरिटीज सुद्धा एकाच खात्यात ठेवू शकता, यामुळे तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ व्यवस्थित एकाठीकणी राहतो.

डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) किंवा सेवाप्रदात्याची गरज पडते. काही बँका, ब्रोकर कंपन्या, आणि फिनटेक कंपन्या डीपी सेवा पुरवतात. जसे की Zerodha, Upstox, HDFC Securities, इत्यादी.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  1. पॅन कार्ड
  2. ओळखेचा पुरावा – जसे की आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स.
  3. पत्त्याचा पुरावा – जसे की आधार कार्ड, विजेचे बिल, बँक स्टेटमेंट.
  4. बँक पासबुक किंवा स्टेटमेंट
  5. पासपोर्ट साइज फोटो

डिमॅट अकाउंट उघडण्याच्या स्टेप्स

स्टेप 1-

सर्वात अगोदर प्ले स्टोर (Play Store) वरुण पुढील पैकी कुठले ही एक मोबाइल ॲप डाउनलोड करून घ्या.

  • Zerodha
  • Upstox
  • Groww
  • Angle Broking

या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण Upstox ॲप घेतले आहे.

कारण Upstox वरती डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी कुठल्याच प्रकारचा चार्ज लागत नाही.

सर्वात अगोदर डाउनलोड बटणावर क्लिक करून मोबाइल ॲप डाउनलोड करून घ्या.

स्टेप 2-

आता डाउनलोड झाल्या नंतर ते ॲप उघडा.

तुम्ही डाउनलोड केलेल्या ॲप नुसार थोडा फार बदल होऊ शकतो. पण मूळ स्टेप्स सारख्याच आहेत.

तुमचा चालू मोबाईल क्रमांक एंटर करा, जर OTP विचारला तर तो एंटर करा.

आता तुम्हाला पुढील पर्याय दिसेल. त्यातील पहिलं पर्याय निवड.

डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे

या नंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड बद्दल माहिती विचारली जाईल. पॅन कार नंबर एंटर करा आणि तुमची जन्म तारीख एंटर करा.

डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे
स्टेप 3-

आता तुम्हाला तुमचा पत्ता दिसेल जो तुमच्या पॅन कार्ड वरुण घेतलेला असेल तो नक्की करा.

स्टेप 4-

या नंतर तुम्हाला तुमचे बँक अकाऊंट लिंक करावे लागेल.

येथे तुम्ही UPI चा पर्याय नवडू शकता किंवा बँक ची माहिती एंटर करू शकता.

डिमॅट अकाउंट उघडण्याच्या स्टेप्स

याच्या नंतर बाकी काही जास्तीची माहिती तुम्ही स्कीप करून पुढे या.

स्टेप 5-

या स्टेप मध्ये तुम्हाला आधार कार्ड चा नंबर एंटर करायचा आहे.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर भरायचा आहे.

ही तुमची शेवटची स्टेप असेल. यानंतर तुमची KYC पूर्ण होण्यास 3-4 दिवसाचा वेळ लागेल.

यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल वर तुमचं यूजर आइडि (User ID) आणि पासवर्ड प्राप्त होईल . ज्याचा वापर करून तुम्ही परत लॉगिन करू शकाल.

जरी तुम्हाला काही अडचण आल्यास आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

डिमॅट अकाऊंटचे प्रकार

  • सिंगल होल्डर अकाउंट – एकाच व्यक्तीच्या नावावर असलेले डिमॅट अकाऊंट.
  • जॉइंट अकाउंट – ज्या प्रकारे आपले बँक मध्ये दोन किंवा अधिक लोकांचे मिळून जाइंट अकाऊंट असते.

डिमॅट अकाउंट उघडताना होणारा खर्च

काही डीपी कंपन्या डिमॅट अकाउंट उघडण्याचं शुल्क घेतात, तर काही फ्री मध्ये सुविधा पुरवतात. वार्षिक मेंटेनन्स चार्जेस मात्र लागू होतात. हे चार्जेस विविध डीपींप्रमाणे वेगवेगळे असतात.

फ्री अकाउंट देणाऱ्या कंपन्याही साधारणतः मेंटेनन्स फी घेतात, म्हणून सर्व माहिती बरकाव्याने तपासून मगच तुम्हाला कोठून डिमॅट अकाऊंट ओपन करायचे आहे ते ठरवा.

डिमॅट अकाऊंटद्वारे व्यवहार करताना घ्यायची काळजी

  1. सर्व व्यवहार नियमित तपासात जा – कोणत्याही खात्यातील व्यवहारांची खात्री करून ते सुरक्षित आहेत की नाही याची काळजी घ्या.
  2. शेअर होल्डिंग रिपोर्ट नियमित पहा – तुमच्या शेअर होल्डिंगमध्ये काही बदल तर झाले नाही ना यावर लक्ष ठेवा.
  3. आवश्यक तेवढेच व्यवहार करा – गुंतवणूक करताना कमी खर्चात अधिक फायदेशीर व्यवहार करून जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करा.

डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट फरक

बऱ्याच लोकांचा यात गोंधळ होतो की डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट यांच्यात काय फरक आहे.

तर डिमॅट अकाउंट हे एखाद्या बँक अकाऊंट सारखे असते. ज्या प्रकारे आपल्या बँक अकाऊंट मध्ये पैसे साठवले जातात त्याच प्रकारे तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये शेअर साठवले जातात.

मात्र ट्रेडिंग अकाऊंट हे एक व्यासपीठ आहे जिथे तुम्ही शेअर ची खरेदी विक्री करता. यात खरेदी केलेले शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये साठवले जातात.

किंवा जर तुम्ही एखादा शेअर विकला तर तो तुमच्या डिमॅट अकाउंट मधून वजा होतो.

आजकाल आपल्याला हे दोन्ही अकाऊंट एकाच वेळी ब्रोकर तर्फे काढून मिळतात. त्यामुळे आपलं तान कमी होतो.

समजा तुम्हाला TATA Motors चे 10 शेअर खरेदी करायचे आहेत. यासाठी तुम्ही ट्रेडिंग अकाऊंट चा वापर करणार आणि एकदा का तुम्ही ते शेअर खरेदी केले तर मग ते शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये स्टोर होणार.

मित्रांनो, शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करण्यासाठी डिमॅट अकाऊंट हे पहिले पाऊल आहे. डिमॅट अकाऊंट सहज, सुरक्षित आणि अत्यंत सोयीचं असल्याने शेअर्सची खरेदी-विक्री करणे खूपच सोपे झालेले आहे. गुंतवणुकीची सुरुवात करताना योग्य डीपी किंवा ब्रोकर निवडून सुरुवात करा.

मित्रांनो तुम्हाला डिमॅट अकाऊंट बद्दल अजून काही प्रश्न असल्यास आम्हाला खालील कोंमेंट्स सेक्शन मध्ये नक्की विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top