डेट म्यूचुअल फंड म्हणजे काय | Debt mutual funds meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये डेट म्यूचुअल फंड म्हणजे काय (Debt mutual funds meaning in Marathi) हे पाहणार आहोत.

डेट म्यूचुअल फंड म्हणजे काय ? (Debt mutual funds meaning in Marathi)

सर्वात अगोदर आपण डेट म्हणजे काय हे समजून घेऊ, तर डेट (Debt) म्हणजे कर्ज किंवा लोन (Loan).

समजा तुम्ही एक कार खरेदी करण्यासाठी गेले, त्या कार ची किंमत आहे 10 लाख रुपये , तुमच्या कडे आहेत 5 लाख रुपये शोरूम वाला लगेच काय म्हणणार , सर मी तुम्हाला कर्ज मिळवून देतो.

नक्कीच त्यासाठी तुम्हाला काही व्याज (Interest) द्यावा लागेल.

आता तुमच्या सारखेच मोठ्या मोठ्या कंपन्या पण त्यांचे उद्योग धंदे वाढवण्यासाठी असे कर्ज काढत असतात. सोबतच सरकार पण विविध योजना , रस्ते, रेल्वे यांच्या बांधकामासाठी कर्ज काढत असताते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मग जेव्हा या कंपन्याला किंवा सरकारला कर्जाची गरज असते तेव्हा ते काही बॉन्ड (Bond) जारी (Issue) करत असतात.

या बॉन्डलाच स्थिर-उत्पन्न रोखे (Fixed-Income Security) असे ही म्हंटले जाते.

डेट फंड म्हणजे काय (Debt fund meaning in Marathi)

आता आपण पाहू डेट म्यूचुअल फंड म्हणजे काय ? (Debt fund meaning in Marathi).

तर मी तुम्हाला वरती बॉन्ड म्हणजे काय हे सांगितल , पण हे बॉन्ड जे कंपन्या किंवा सरकार जारी करते यात तुम्ही आम्ही लोक सरळ पैसे नाही टाकू शकत.

कारण त्यांची कर्जाची गरज ही खूप मोठी असते , हजारो कोटी . इथे कामाला येते म्यूचुअल फंड ची संकल्पना .

डेट म्यूचुअल फंड मध्ये बऱ्याच लोकांचे पैसे एकत्रित करून ते पैसे अश्या बॉन्ड मध्ये गुंतवले जातात. यासाठी एक फंड मॅनेजर (Fund Manager) ठरवून दिलेला असतो.

शक्यतो असे डेट म्यूचुअल फंड बऱ्याच बॉन्ड मध्ये पैसे गुंतवतात, म्हणजे म्यूचुअल फंड एकाच पण पैसे 5-10 वेगवेगळ्या बॉन्ड मध्ये.

याचा फायदा असा होतो की, तुमचे जोखीम कमी होते आणि परतावा चांगला मिळण्यास मदत होते.

डेट म्यूचुअल फंडाचे प्रकार (Types of Debt mutual funds)

1. लिक्विड आणि मनी मार्केट फंड (Liquid and Money market fund)

खूपच कमी कालावधीच्या गुंतवणुकीसाठी (1 ते 90 दिवस) लिक्विड आणि मनी मार्केट फंड हा चांगला पर्याय आहे.

समजा तुमच्याकडे अचानक थोडे फार पैसे आले आणि तुम्ही विचार करते की मी या पैश्यांना कुठे गुंतऊ आणि 2 ते 3 महीने तुम्हाला ते पैसे वापरात येणार नाहीत. तर अश्या वेळेस तुम्ही हे पैसे लिक्विड आणि मनी मार्केट फंड (Liquid and Money market fund) मध्ये गुंतऊ शकता.

यात तुम्हाला बचत खत्यापेक्षा (Savings Account) चांगला परतावा मिळेल. यातून तुम्ही 6-7% वार्षिक परतव्याची अपेक्षा करू शकता.

हे लिक्विड म्यूचुअल फंड सरकारी सेक्युर्टी (Governmet Security) मध्ये आपले पैसे गुंतवता, म्हणून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. परतावा मात्र इतर डेट म्यूचुअल फंड पेक्ष्या कमी राहतो.

अजून एक फायदा म्हणजे लिक्विड फंड मधून तत्काळ पैसे तुमच्या बँक अकाऊंट मध्ये ट्रान्सफर होतात.

2. अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड (Ultra Short Term Funds)

जर तुमचं गुंतवणूक कालावधी 3-6 महीने असणार आहे , तर तुम्ही तुमचे पैसे अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतऊ शकता.

अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड मध्ये तुम्हाला 6.5 तर 7.5 % पर्यन्त परतावा मिळू शकतो.

हे फंड आपले पैसे कमर्शियल पेपर आणि ट्रेझरी बिल्स मध्ये गुंतवतात. ज्यांची मॅच्युरिटी 6 महिन्या पर्यन्त असते.

3. शॉर्ट टर्म फंड (Short Term Funds)

जर तुम्हाला 6 ते 12 महिन्याच्या कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही शॉर्ट टर्म फंड मध्ये गुंतऊ शकता. या फंड मध्ये तुम्हाला 6-8% वार्षिक परतावा मिळू शकतो.

शॉर्ट टर्म फंड आपले पैसे कमर्शियल पेपर, कमर्शियल डिपॉजिट , कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये गुंतवतात.

4. मीडियम टर्म फंड (Medium Term Funds)

या प्रकारात तुम्ही 1 ते 3 वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. मीडियम टर्म फंड आपले पैसे कमर्शियल पेपर, कमर्शियल डिपॉजिट , कॉर्पोरेट बॉन्ड मध्येच गुंतवतात. मॅच्युरिटी पीरियड 3 वर्षाचा पर्यंतचा असतो.

5. लॉन्ग टर्म फंड (Long Term Funds)

जर तुम्हाला 3 वर्षापेक्ष्या अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही लॉन्ग टर्म फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.

वार्षिक परतावा दर 8 ते 9 % या प्रकारात मिळू शकतो.

या फंड ची गुंतवणूक कंपन्याचे बाँड, सरकारी मुदत ठेवी, बँक एफडी, कंपनी एफडी मध्ये असते.

लिक्विड आणि मनी मार्केट फंड परतावा तर कमी देतात पण रिस्क खूप कमी असते. या उलट लॉन्ग टर्म फंड परतावा चांगला देतात पण जोखीम तुलनेने जास्त असते.

डेट म्यूचुअल फंडचे अजून काही प्रकार

  1. फ्लोटिंग रेट
  2. डायनॅमिक बॉन्ड
  3. फिक्स मॅच्युरिटी प्लान
  4. गिल्ट फंड
  5. क्रेडिट ऑपर्चुनिटी फंड

डेट म्यूचुअल फंड बद्दल अधिक माहिती साठी सेबी च्या संकेत स्थळाला भेट द्या.

Leave a Comment