PE ratio म्हणजे काय? | What is P/E ratio in Marathi

What is P/E ratio in Marathi | PE ratio म्हणजे काय?

What is P/E ratio in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये PE ratio म्हणजे काय? हे पाहणार आहोत.

मित्रांनो आपण शेअर ची खरेदी करताना चांगल्यात चांगला शेअर कसा निवडता येईल याची काळजी घेत असतो. काही कंपण्याच्या शेअर ची किंमत खूप जास्त असते, तर काही कंपनीच्या शेअर ची किंमत खूप कमी असते. पण कंपनीच्या शेअर च्या किंमतीवरून तो शेअर किती चांगला आहे किंवा किती खराब आहे हे ठरवता येत नाही.

अश्या वेळी आपण P/E ratio चा वापर करून एखादा शेअर आपल्याला स्वस्त मिळत आहे की महाग मिळत आहे हे पाहू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक चांगला गुंतवणूकदार नेहमी P/E ratio पाहूनच शेअर ची खरेदी करतो. थोडक्यात काय तर P/E ratio हा स्टॉक मार्केट मध्ये व्यवहार करताना अत्यंत महत्वाचा घटक आहे, आणि म्हणूनच आज आपण या लेखात P/E ratio बद्दल सर्व माहिती अगदी डीटेल मध्ये पाहणार आहोत.

P/E ratio म्हणजे Price To Earning Ratio. P/E ratio मध्ये P म्हणजे शेअर ची किंमत (Share Price) आणि E म्हणजे Earnings Per Share.

थोडक्यात कंपनीच्या शेअर ची किंमत आणि कंपनी प्रती शेअर मागे किती नफा मिळवत आहे याचे गुणोत्तर किंवा प्रमाण यालाच P/E ratio असे म्हणतात.

P/E ratio हे महत्वाचे वॅल्यूएशन एकक आहे, ज्याचा वापर करून एखानद्या कंपनीचा शेअर आपल्याला स्वस्त मिळत आहे की महाग याची कल्पना मिळते.

P/E ratio आपल्याला हे ही सांगतो की एखाद्या कंपनीमधून 1 रुपया प्रॉफिट कमवायला आपल्याला किती किंमत द्यावी लागेल.

P/E ratio Formula | P/E ratio चे सूत्र

P/E ratio हा पुढील सूत्राच्या मदतीने काढतात-

P/E ratio Formula

मित्रांनो वरील सूत्रामध्ये प्राइस पर शेअर म्हणजे एका शेअर ची किंमत तर Earnings per share(EPS) म्हणजे प्रती शेअर कमाई.

मित्रांनो EPS बद्दल आम्ही EPS म्हणजे काय या लेखात सर्व माहिती दिलेली आहे.

P/E ratio कसा Calculate करायचा?

आता आपण P/E ratio म्हणजे काय हे एका उदहरणातून समजून घेऊ-

समजा एखाद्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे 150 रुपये आणि त्या कंपनी चा EPS आहे 10 मग त्या कंपनीचा P/E ratio झाला 15 (150/10=15).

पण P/E ratio 15 आहे म्हणजे नेमका काय? तर याचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदाराला त्या कंपनीतून 1 रुपया कमवायला स्वतःकडचे 15 रुपये गुंतवावे लागतील. किंवा गुंतवणूकदार 1 रुपया त्या कंपनीतून कामावण्यासाठी 15 रुपये गुंतवायला तयार आहेत.

P/E ratio चा दूसरा उपयोग म्हणजे एखादा स्टॉक इंडस्ट्री पेक्षा महाग मिळत आहे की स्वस्त हे तपासणे. यासाठी पुढील उदाहरण समजून घेऊ-

समजा एक कंपनी आहे तीच नाव आहे कंपनी A. या कंपनी च्या एका शेअर ची किंमत 150 तर ईपीएस 10 आहे म्हणजे तिचा P/E ratio आला 15, बरोबर?

आता दुसरी एक कंपनी आहे कंपनी B. तिचा एक शेअर 300 रुपयाचा आहे आणि ईपीएस 30 आहे तर हीचा P/E ratio किती आला,? तर 10 (300/30=10)

कंपनी A P/E ratio = 15

कंपनी B P/E ratio = 10

समजा या कंपन्या ज्या इंडस्ट्री मधल्या आहेत त्या इंडस्ट्री मधल्या कंपण्याचा P/E ratio आहे 13.

म्हणजे कंपनी A चा शेअर त्या सेक्टर मधील बाकी कंपनी च्या शेअर पेक्ष्या जास्त महाग आहे.

आणि कंपनी B चा शेअर त्या सेक्टर मधील कंपण्याच्या तुलनेत स्वस्त आहे.

आता B कंपनीचा शेअर स्वस्त आहे म्हणजे लगेच खरेदी करायचा असे नाही आत्ता फक्त आपण P/E ratio पहिला. शेअर खरेदी करताना बाकीचे फॅक्टर्स पण महत्वाचे असतात. यातून आपल्याला ही आयडिया आली की बाबा कंपनी A चा शेअर थोडासा महाग मिळतोय, तर कंपनी B चा थोडासा स्वस्त.

P/E ratio चे प्रकार

कंपनीच्या उत्पन्नानुसार P/E ratio चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे-

  1. फॉरवर्ड पी/ई रेशो (Forward P/E ratio)- ह्या प्रकारचा P/E ratio कंपनीच्या भविष्यातील कमाईच्या आधारावर काढला जातो. यात कंपनीच्या चालू शेअर च्या किंमतीला एस्टिमेटेड ईपीएसने भागले जाते.
  2. Trailing P/E ratio- या प्रकारात P/E ratio हा कंपनीच्या मागील कमाईच्या आधारावर काढला जातो.

हे पण वाचा –हमकास आयपीओ मिळण्यासाठीच्या काही स्ट्रॅटेजी

P/E ratio काही इम्पॉर्टंट पॉईंट्स

मित्रांनो P/E ratio हा कधी कमी तर कधी जास्त असू शकतो, हे वेगवेगळ्या गोष्टींवर्ति अवलंबून असते.

कमी P/E ratio असण्याची करणे-

  1. स्टॉक स्वस्त असल्या नंतर
  2. कमी किंवा नेगेटिव ग्रोथ असल्यास
  3. भविष्याबद्दल शाश्वती नसल्यास

जास्त P/E ratio असण्याची करणे-

  1. स्टॉक महाग विकला जात असल्यास
  2. कंपनीची ग्रोथ जास्त असल्यास
  3. भविष्यातील ग्रोथ चांगली होणार असल्यास

P/E ratio चेक करताना नेहमी सारख्या क्षेत्रातील कंपन्यांचा करा. उदा. जर तुम्ही इन्फोसिस चा P/E ratio तपासत असाल तर त्याची तुलना तुम्ही इतर आयटी कंपन्या सोबतच केली पाहिजे जसे की TCS, Whipro .

जर P/E ratio जास्त किंवा कमी असेल तर तो तासा का आहे हे नक्की तपासा .

सोबतच ग्रोथ लॉन्ग टर्म आहे की तात्पुरती आहे हे ही तपासून पाहणे खूप गरजेचे आहे.

मराठी P/E ratio कॅल्क्युलेटर

किंमत-ते-उत्पन्न (P/E) कॅल्क्युलेटर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top