एसआयपी म्हणजे काय? | SIP meaning in Marathi
SIP information in Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये एसआयपी म्हणजे काय? आणि एसआयपी बद्दल सर्व माहिती अगदी डिटेल मध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो तुम्ही जर म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर दोन गोष्टी तुम्ही नक्की ऐकल्या असतील. एक म्हणजे SIP आणि दुसरी म्हणजे एकठोक (Lump Sum).
एसआयपी आणि Lump Sum हे दोन्ही म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग आहे. या दोन्ही मध्ये नेमका काय फरक आहे हेही आपण समजून घेणार आहोत.
तर मित्रांनो एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. थोडक्यात सांगायचं तर एका ठराविक रकमेची, एका ठराविक अवधीनंतर, शिस्तबद्धपणे केलेली गुंतवणूक म्हणजे SIP होय.
SIP म्हणजे काय उदाहरणासहित | SIP information in Marathi with example
आता आपण यासाठी ची माहिती एका उदाहरणासह समजून घेऊ-
समजा तुम्हाला कुठल्या पण एका म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे आणि तुम्हाला असे वाटत आहे की दर महिन्याला एक हजार रुपये मी या म्युचल फंड मध्ये गुंतवावे.
आता सुरुवातीला तर कदाचित तुम्ही ते नित्यनियमाने पाळाल. दर महिन्याला ठरवलेल्या तारखेला ठरवलेली रक्कम म्यूचुअल फंड मध्ये गुंतवाल.
पण कधी कधी तुमची तारीख मागेपुढे होईल किंवा कधी कधी तुम्ही ते विसरून पण जाल. या मुळे तुमच्या गुंतवणुकीत ती शिस्त ती नियमितता राहणार नाही.
तर इथेच तुमची मदत करते एसआयपी. एसआयपी मध्ये काय होतं तर तुम्ही ठरवून दिलेल्या तारखेला, तुम्ही ठरवून दिलेले रक्कम, तुम्ही ठरवलेल्या म्युचल फंड मध्ये ऑटोमॅटिक जमा होते.
इथे तुम्हाला फक्त एकदाच सर्व गोष्टी ठरवून द्यायच्या आहेत मग तिथून पुढे एका ठरलेल्या तारखेला ऑटोमॅटिक तुमच्या बँक अकाउंट मधून तुम्ही ठरवलेली रक्कम वजा होऊन ते पैसे तुम्ही ठरवलेल्या म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट होणार.
आहे की नाही अगदी सोपं!
SIP आणि Lum sum मध्ये काय फरक आहे?
जसं की अगोदर सांगितलं SIP मध्ये सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होतात. पण एकठोक (Lum sum) गुंतवणूक ही तुम्हाला करावी लागते.
मित्रांनो मार्केट मध्ये सतत चढ उतार येत असतात. आता तुम्ही एकठोक गुंतवणूक करण्याचे ठरवले तर कदाचित त्या दिवशी मार्केट हे महाग किंवा स्वस्त असू शकते.
पण SIP ही दर महिन्याला ठरविक वेळेत सेट केलेली असते . या मुळे काय होत जरी येखांदा महिना मार्केट खूपच वरती असेल किंवा खूपच खाली असेल तुमचा परतावा मात्र सरासरी स्थिर राहतो.
आता खालील उदाहरण पहा. यात आपण 10,000 ची SIP सुरू केली आहे. लाल रकाना मार्केट डाऊन असताना आणि हिरवा म्हणजे मार्केट वरती असताना.
इथ दोन शक्यता असू शकतात एक तर सगळीच रक्कम सुरवातीला म्हणजे 1 मे रोजी एकठोक गुंतवली किंवा मग 10,000 रुपये SIP सुरू केली.
दोन्ही प्रकारात काय होते ते पाहू.
सर्व गणित केल्या नंतर तुम्ही हे पाहू शकता की एकठोक पैसे गुंतवणूक केल्या नंतर चढ-उतारच्या मार्केट मध्ये तुम्हाला वजा 6% परतावा मिळाला. म्हणजे तुमचे 6% नुकसान झाले.
या ऐवजी जर तुम्ही 10,000 दर महिन्याला असे पैसे गुंतवले असते तर तुम्हाला 21% परतावा मिळाला असता.
एक लक्षात घ्या शेवटी गुंतवणूक रक्कम तर सारखीच आहे. जवळ पास 1,20,000 फक्त गुंतवणूक करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे.
एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे | SIP benefits in Marathi
1. कमी रिस्क जास्त फायदा
मित्रांनो हा पॉइंट मी सर्वात महत्वाचा मानतो. आता बघाना मी साधारण 2 वर्षा पूर्वी सहज 200-300 रुपये दर महिना असे SIP मध्ये गुंतवायला लागलो.
नकळत ते कधी 6000 रुपये झाले मला समजल पण नाही. त्या पेक्ष्या महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वरती मला तब्बल 51% परतावा मिळाला आहे.
तेव्हाच मला SIP काय चीज आहे हे समजले. खाली दिलेला फोटो एकदा पहा.
यात ना मी कुठल्या कंपनी बद्दल रेसर्च केला ना मला तेवढा वेळ होता. मी फक्त एक म्यूचुअल फंड सिलेक्ट केला आणि त्यात SIP सुरू केली.
माझ्या पैशाचे व्यवस्थापन हा त्या म्यूचुअल फंडचा Fund Manager करतो जो की एक एक्स्पर्ट असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याचे एकाच काम असते, कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहणे.
2. वेळेची बचत
जसं की मी म्हंटल ना आपल्याला कुठल्या कंपनी बद्दल रिसर्च करायची गरज आहे ना आपल्याला आपला वेळ वाया घालवण्याची गरज आहे .
ही सर्व कामे आपल्या म्यूचुअल फंड चा फंड मॅनेजर करतो. पर्यायी आपण आपला वेळ वाचतो.
सोबतच SIP चालू केल्या नंतर तुम्हाला सारखे सारखे जाऊन पैसे गुंतवण्याची गरज नाही. कारण तुम्ही ठरवलेल्या तारखेला पैसे तुमच्या बँक अकाऊंट (Bank Account) मधून वजा (Debit) होऊन ठरवलेल्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतणार (Invest) पण होणार.
3. ध्येयपूर्ती आणि एसआयपी
मित्रांनो SIP तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय साध्य करण्यात मदत करते. समजा तुम्हाला काही वर्षात एक कार खरेदी करायची आहे तर तुम्ही त्या साठी आजपासूनच सिप चालू करू शकता. कोणाला शिक्षणासाठी पैसे वाचवायचे असतील तर कोणला लग्नासाठी.
या सर्व गोष्टी आणि त्यांचा खर्च याचं प्लॅनिंग तुम्ही आमच्या एसआयपी कॅल्कुलेटर च्या मदतीने करू शकता.
4. पॉवर ऑफ कंपाउंडिंग
मित्रांनो SIP ची खरी ताकत ही दीर्घ काळ पैसे गुंतवण्यात आहे. जसा जसा वेळ वाढत जातो तसे तसे तुमचे पैसे चक्रवाढ पद्धतीने वाढत जातात.
याला एक उदाहरणातून समजून घेऊ.
समजा तुम्ही दर महा 5000 रुपये अशी SIP चालू केली. या वरती 15% च्या दराने 10 वर्षात तुम्हाला जवळपास 8,00,000 रुपये एवढा परतावा मिळेल.
पण खरी जादू या नंतर सुरू होणार. आता 15 आणि 20 वर्षा नंतर चा परतावा एकदा खाली पहा.
पाहिलत नंतर च्या 5 वर्षात तुमचे पैसे कसे झपाट्याने वाढले. यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाउंडिंग.
अश्या प्रकारचे कॅलक्युलेशन करण्यासाठी तुम्ही आमच्या एसआयपी कॅल्क्युलेटर वापरू शकता.
5.कमी भांडवलात गुंतवणुकीची सुरवात
मित्रांनो हा एसआयपी चा खूप मोठा फायदा आहे. काही म्यूचुअल फंड तुम्हाला अगदी 100 रुपया पासून SIP सुरू करण्याची सुविधा देतात.
यात तुम्ही 100 रुपये दर महिना किंवा तुमच्या सोईणूसार SIP चालू करू शकतात.
SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी ? | SIP investment in Marathi
मित्रांनो SIP मध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपं आहे.
Step 1 –
सर्वात महत्वाचे तुम्हाला अगोदर एक म्यूचुअल फंड ॲप (Mutual Fund App) निवडावे लागेल.
म्यूचुअल फंडसाठी बेस्ट टॉप 5 ॲप आम्ही अगोदरच सांगितलेले आहेत. तुम्ही तो लेख वाचू शकता.
Step 2 –
या नंतर तुमच्या आवडीचा तुम्ही माहिती काढलेला म्यूचुअल फंड निवडा. म्यूचुअल फंड कसा निवडायचा याची माहिती आम्ही एका वेगळ्या लेखा मध्ये दिलेली आहे. (लेख वाचा)
मी माझ्या म्यूचुअल फंड गुंतवणुकीसाठी Groww App चा वापर करतो.
म्यूचुअल फंड निवडल्या नंतर तुम्हाला खाली दाखवल्या प्रमाणे Start SIP चा पर्याय दिसेल.
त्या बाटणवर्ती क्लिक करा.
Step 3 –
या नंतर तुमहल पुढील पर्याय दिसेल.
या मध्ये सर्वात वरती तुम्हाला किती रुपयाची एसआयपी चालू करायची आहे ती रक्कम टाकायची आहे. उदारणार्थ आपण तुम्ही दर महा 100 रुपये अशी SIP सुरू करू इच्छिता.
त्याच्या खाली तुम्हाला तारीख निवडण्याचा पर्याय दिसेल.
हे सर्व केल्या नंतर Start SIP वर्ती क्लिक करा.
Step 4 –
आता तुम्हाला तुमच्या मोबाइल वरती OTP प्राप्त होईल. काळजी करण्याचे काही कारण नाही हा OTP तुम्ही enter केल्या नंतर तुम्हाला पुढील मेसेज प्राप्त होईल.
मित्रांनो ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. सोबत काही सूचना असतील ते ही कळवा.
आधिक माहितीसाठी सेबी च्या संकेत स्थळाला भेट द्या.