EPS म्हणजे काय? | EPS Meaning in Marathi
EPS Meaning in Marathi : नमस्कार मित्रांनो! आज आपण EPS म्हणजेच Earnings Per Share बद्दल चर्चा करणार आहोत. EPS एक महत्त्वाचा आर्थिक निर्देशांक आहे जो कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे मूल्यमापन करण्यात मदत करतो.
मित्रांनो EPS म्हणजेच Earnings Per Share ला मराठीत ‘प्रती शेअर कमाई’ असे म्हणतात.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, EPS म्हणजे कंपनीने शेअरधारकांना दिलेल्या कमाईस एकूण शेअर्सच्या संखेने भागून मिळवलेली रक्कम होय. म्हणजेच, जर तुमच्याकडे एका कंपनीचे 100 शेअर्स असतील आणि त्या कंपनीने एकूण 100000 रुपये कमावले असतील, तर तुमच्या शेअर्सवरची कमाई म्हणजे 1000 रुपये (100000/100=1000).
EPS चा उपयोग काय आहे?
- कंपनीचे प्रदर्शन समजून घेणे: EPS चा उपयोग कंपनीच्या आर्थिक प्रदर्शनाची तुलना करण्यासाठी केला जातो. जास्त EPS म्हणजे कंपनी चांगली कामगिरी करत आहे असे आपण समजतो. यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना मदत मिळते.
- इतर कंपन्यांशी तुलना करणे: EPS चा वापर बाजारातील इतर कंपन्यांशी तुलना करण्यासाठी देखील केला जातो. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची निवड करताना चांगली माहिती मिळते. विशेषतः तुम्ही एखाद्या उद्योगातील दोन किंवा अधिक कंपन्यांची तुलना करत असाल, तर EPS तुम्हाला चांगली कंपनी कुठली हे निवडण्यास मदत करतो.
- गुंतवणूक निर्णय घेणे: गुंतवणूकदार EPS च्या आधारे निर्णय घेतात. जास्त EPS असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते.
EPS कसे काढतात? | EPS Calculation Formula
EPS चे पुढील गणितीय सूत्र आहे:
तुम्ही एवढे गणित करत बसण्याची गरज नाही, आमच्या EPS कॅल्कुलेटरचा उपयोग करून तुम्ही सहज आणि डायरेक्ट ईपीएस कॅल्क्युलेट करू शकता.
यामध्ये:
- शुद्ध नफा: म्हणजेच कंपनीचा निव्वळ नफा
- डिविडंड्स: कंपनीने भागधारकांना अदा केलेले पैसे.
- संपूर्ण अद्याप शेअर्स: कंपनीचे एकूण शेअर्स किंवा कंपनीकडे सध्या किती शेअर आहेत.
EPS चे प्रकार
प्रामुख्याने EPS चे प्रकार 2 पडतात.
- बेसिक EPS: हे साधारणतः शुद्ध नफ्याच्या आधारे कॅल्क्युलेट जाते.
- डिल्यूटेड EPS: यामध्ये भविष्यामध्यील संभाव्य शेअर्सचा समावेश केला जातो, जसे की स्टॉक ऑप्शन्स किंवा कन्वर्टिबल बॉंड्स.
EPS चा वापर करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- फक्त EPS पाहून चालत नाही: मित्रांनो गुंतवणूक करत असताना फक्त एक फॅक्टर पाहून चालत नाही, बाकी महत्वाचे गटक विचारात घेऊनच गुंतवणूक करावी लागते. याबद्दल चांगला स्टॉक कसा निवडावा ? या लेखात सर्व माहिती आम्ही दिलेली आहे.
- EPS चा पूर्ण ग्राफ तपासात चला : मित्रांनो ईपीएस पाहताना मागील काही महिन्याचा ईपीएस पण चेक करणे महत्वाचे ठरते. जेणे करून ईपीएस चा आलेख चढता आहे की उतरता याची आपल्याला आयडिया येते.
- EPS च्या वाढीचे प्रमाण : शक्यतो स्टेबल EPS चांगला मानला जातो आणि जर ईपीएस वाढत जाणार असेल तर अती उत्तम.
EPS चे महत्व
मित्रांनो ईपीएस च्या आधारे गुंतवणूकदार एखाद्या कंपनीची नफा मिळऊन देण्याची क्षमता तपासू शकतात. चांगला EPS एक पॉजिटिव पॉइंट समजले जाते, कारण यामुळे आपल्याला कंपनीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. जास्त EPS असलेल्या कंपन्या अधिक विश्वासार्ह आणि स्थिर गुंतवणूक मानल्या जातात.
निष्कर्ष
EPS एक महत्वाचा वित्तीय निर्देशक आहे जो गुंतवणूकदारांना कंपनीच्या आर्थिक आरोग्याची माहिती देतो. त्यामुळे EPS चा अभ्यास करणे आणि त्यावर आधारित गुंतवणूक निर्णय घेणे आवश्यक आहे.
यशस्वी गुंतवणुकीसाठी EPS हे एक प्रभावी साधन आहे. तुमची गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
ईपीएस आणि पीयी रेशो यातील फरक | EPS Vs. P/E Ratio
मित्रांनो आता आपण ईपीएस आणि पीयी रेशो यातील फरक पाहू.
EPS (प्रति शेअर उत्पन्न) आणि P/E Ratio (प्रति शेअर मूल्य गुणोत्तर) यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी खालील टेबल वाचा.
मापदंड | EPS | P/E Ratio |
---|---|---|
परिभाषा | कंपनीच्या निव्वळ नफ्यावरील प्रति शेअर प्रमाण. | कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत आणि प्रति शेअर उत्पन्न यांचे गुणोत्तर. |
समीकरण | EPS = (निव्वळ नफा – डिविडंड्स) / साधारण शेअर्सची संख्या | P/E Ratio = शेअरची सध्याची किंमत / EPS |
उद्दिष्ट | कंपनीच्या प्रत्येक शेअरवर मिळणारा नफा कळतो. | कंपनीच्या शेअरचे बाजारमूल्य आणि कमाईचे प्रमाण कळते. |
महत्त्व | कंपनीची आर्थिक स्थिती आणि नफा कमाऊन देण्याची क्षमता दर्शवतो. | कंपनीची बाजारातील स्थिती आणि भविष्यातील वृद्धीची शक्यता सांगतो. |
उपयोग | गुंतवणूकदारांना कंपनीची नफा मिळाऊन देण्याची क्षमता समजते. | एखाद्या कंपनीचा शेअर महाग मिळत आहे की स्वस्त याची आयडिया पीयी रेशो आपल्याला देत असतो. |
कमी/जास्त | जास्त EPS कंपनीची चांगली स्थिती दर्शवतो. | P/E Ratio जास्त असेल तर शेअर महाग आहे, कमी असेल तर स्वस्त आहे असे कळते. |
रिस्क | जास्त ईपीएस म्हणजे स्थिर कंपनी | उच्च P/E Ratio म्हणजे जास्त रिस्क |