Commodity Mutual Fund information in Marathi
Commodity Mutual Fund information in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेख मध्ये कमोडिटी म्यूचुअल फंड बद्दल माहिती अगदी सोप्या भाषेत समजाऊन सांगितली आहे.
कमोडिटी म्हणजे काय?
कमोडिटी (Commodity) म्हणजे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित वस्तू ज्यांचे मूल्य वजन किंवा मापणे ठरवले जाते अश्या गोष्टींना कमोडिटी (Commodity) असे म्हणतात.
या मध्ये कच्चे तेल, सोने, धान्य, धातू आणि विविध प्रकारचा कच्चा माल याचा समावेश होतो.
या गोष्टी देशाच्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात खूप महत्वाच्या असतात.
म्हणूनच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून या गोष्टी खूप महत्वाच्या बनतात.
कमोडिटीच्या किंमती या जागतिक राजकारणावर्ती खूप जास्त अवलंबून असतात. जागतिक पातळीवरील युद्ध , नैसर्गिग आपत्ति या सारख्या गोष्टी यांच्या किंमतीवर प्रभाव टाकतात.
कमोडिटी म्यूचुअल फंड म्हणजे काय?
कमोडिटी (Commodity) शी निगडीत कंपन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्यूचुअल फंडला कमोडिटी म्यूचुअल फंड (Commodity Mutual Fund) असे म्हणतात.
सामान्य व्यक्ति हे डायरेक्ट कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे खरेदी विक्री करू शकत नाही. सरकार याची परवानगी देत नाही.
मग इथे कमोडिटी म्यूचुअल फंड खूप फायद्याचे ठरतात.
कमोडिटी म्यूचुअल फंडचे प्रकार
- बेसिक कमोडिटी म्यूचुअल फंड- या प्रकारातील गुंतवणूक मुख्यत्वे नैसर्गिक मालमत्ता जसे खनिजे, धातू या मध्ये असते.
- नॅच्युरल रिसोर्सेस फंड- यात गुंतवणूक प्रामुख्याने अश्या कंपण्यात असते ज्या क्रूड ऑइल , पेट्रोलियम , खनिजे अश्या गोष्टीमध्ये बिझनेस करतात.
- फ्युचर कमोडिटी फंड- हा प्रकार सर्वात जास्त रिस्क असणारा प्रकार आहे. यात फंड मॅनेजर कमोडिटी ट्रेडिंग फ्युचर मध्ये कॉल घेत असतात.
- कॉम्बिनेशन फंड- हा प्रकार म्हणजे बेसिक आणि फ्युचर फंडचा मिळून बनलेला फंड आहे. यात फ्युचर फंड खूप जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता आणि बेसिक फंड मुले गुंतवणूक स्थिरता राहते.
काही चांगले कमोडिटी म्यूचुअल फंड
- ICICI Prudential Commodities Fund
- Tata Resources and Energy Fund
- DSP Natural Resources and New Energy Fund
- Aditya Birla Sun Life Commodity Equities – Global Agri Fund
मित्रांनो म्यूचुअल फंड बद्दल अधिक माहिती आमच्या म्यूचुअल फंड म्हणजे काय या लेखात दिलेली आहे.
कमोडिटी म्यूचुअल फंड फायदे
1. एक्स्पर्ट फंड मॅनेजर
मित्रांनो जसं की मी वरती तुम्हाला सांगितलं कमोडिटीच्या किंमती या कश्या बदलू शकतात म्हणून या वरती नजर ठेऊन राहणे सगळ्यांना शक्य होत नाही.
अश्या वेळी तुम्ही जर म्यूचुअल फंडच्या मध्यमातून कमोडिटी मध्ये गुंतवणूक केलेली असेल तर फंड मॅनेजर या सर्व गोष्टी करतो.
2. गुंतवणुकीत सुलभता
मित्रांनो एकदाच सगळे पैसे गुंतवण्यापेक्ष्या तुम्ही एसआयपी च्या मध्यमातून गुंतवणूक सुरू करू शकता.
एसआयपी म्हणजे काय आणि ती कशी फायद्याची असते याबद्दल सविस्तर माहिती आमच्या एसआयपी म्हणजे काय या लेखात दिलेली आहे.
3. महागाई पासून बचाव
मित्रांनो महागाईच्या काळात कमोडिटीच्या किंमती झपाट्याने वाढतात आणि तुमचीच गुंतवणूक जर कमोडिटी मध्ये असेल तर तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो.
आपण बतम्यात अनेकदा पाहतो की कुठल्या तरी दोन देशयात युद्ध झाले आणि म्हणून कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या.
अश्या आणीबाणीच्या काळात तुम्हाला कमोडिटी गुंतवणूक चांगला फायदा मिळाऊन देऊ शकते.
4. अस्थिर मार्केट पासून बचाव
मित्रांनो शक्यतो मार्केट हे अस्थिर असते पण जर तुमची गुंतवणूक सोने , चांदी या सारख्या कमोडिटी मध्ये असेल तर तुम्हाला स्थिर परतावा मिळण्यास मदत होते.
5. गुंतवणुकीचे विविधिकरन
कमोडिटी म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक असल्या मुळे तुमच्या गुंतवणुकीचे विविधिकरण होण्यास मदत होते.
यासाठी तुम्ही इक्विटि , कमोडिटी म्यूचुअल फंड किंवा हायब्रिड म्यूचुअल फंड अश्या फंड मध्ये थोडी थोडी गुंतवणूक करू शकता.
अधिक माहितीसाठी SEBI च्या संकेत स्थळाला भेट द्या.