Afcons Infrastructure IPO info in Marathi | Afcons इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड IPO अॅनालिसिस
Afcons Infrastructure IPO info in Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Afcons इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड IPO अॅनालिसिस पाहणार आहोत हा आयपीओ 25 तरखे पासून सुरू होत आहे.
यात कंपनी काय करते, इंडस्ट्री कशी आहे याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. जेणे करून तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही हा आयपीओ कन्सिडर केला पाहिजे की नाही.
मित्रांनो Afcons Infrastructure Limited ही एक नावाजलेली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. अफकोंस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही शापूरजी पल्लोनजी ग्रुप ची एक कंपनी आहे.
अफकोंस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी जवळ पास मागील 6 दशकांपासून या सेक्टर मध्ये आहे.
या कंपनीची खास ओळख म्हणजे त्यांनी केलेले अतिशय महत्वाचे आणि चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स. काही प्रोजेक्ट्स सांगायचे झाले तर चेनाब ब्रिज जो की सर्वात उंच सिंगल अर्च रेल्वे ब्रिज आहे.
परत आपला समृद्धी महामार्ग त्याच्या पण काही पॅकेज चे काम याच कंपनीने केले आहे.तुम्ही अटल टनेल बद्दल ऐकून असाल तो ही याच कंपनीने बाधलेला आहे.
या सारखे बरेच प्रोजेक्ट्स या कंपनीने पूर्ण केलेले आहेत. हे सर्व प्रोजेक्ट्स कंपनी EPC म्हणजेच Engineering, Procurement and Construction या पद्धतीने पूर्ण करते.
कंपनीने मागील 11 वित्तीय वर्षात 79 प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. हे प्रोजेक्ट्स फक्त भारतात नाही तर 17 वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्ण केले आहेत. या पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट्स ची एकूण किंमत सुमारे 563.05 बिल्यन रुपये एवढी आहे.
आज तरखेपर्यन्त त्यांचे 65 प्रोजेक्ट्स 12 वेगवेगळ्या देशांमध्ये चालू आहेत. ज्यांची ऑर्डर वॅल्यू जवळ पास 317.47 बिल्यन रुपये एवढी आहे.
कंपनीच्या इतर प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी चौथा कंटेनर टर्मिनल जेएनपीटी मुंबई, कोलकाता मेट्रो हे प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. सोबत मुंबई – अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचे काम चालू आहे.
कंपनीचे प्रकल्प पाच प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत:
- सागरी आणि औद्योगिक: पोर्ट्स आणि हार्बर जेटीज, ड्राय डॉक, ओले बेसिन्स, ब्रेकवॉटर, आउटफॉल आणि इनटेक स्ट्रक्चर्स, द्रवीकृत नैसर्गिक वायू टँक्स आणि साहित्य हाताळणी प्रणाली.
- पृष्ठभाग वाहतूक: महामार्ग आणि रस्ते, इंटरचेंज, खाण संबंधित पायाभूत सुविधा आणि रेल्वे.
- शहरी पायाभूत सुविधा: उन्नत आणि भूमिगत मेट्रो कार्ये, पूल, उड्डाणपूल आणि उन्नत कॉरिडोर.
- जलविद्युत आणि भूमिगत: धरणे आणि बॅरेजेस, बोगदे (मोठे रस्ते बोगदेसहित) आणि भूमिगत कामे, पाणीपुरवठा आणि सिंचन.
- तेल आणि वायू: किनाऱ्यावरील तसेच किनाऱ्यावरचे तेल आणि वायू प्रकल्प.
इंडस्ट्री अॅनालिसिस
मित्रांनो येणाऱ्या काळात भारताच्या जीडीपी चा विचार केला तर भारताची इकनॉमिक ग्रोथ 2026-27 आर्थिक वर्षासाठी 6.8% इतकी अपेक्षित आहे. मात्र 2025 या आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी दरवर्षी 7.5% ने वाढण्याची अपेक्षा आहे.
मित्रांनो जीडीपी आपण पूर्ण देशाचा विकास पाहण्या करीत करत असतो. पण आपण एखाद्या सेक्टर बद्दल बोलत असतो तेव्हा आपण GVA म्हणजेच Gross Value Added ही संकल्पना वापरत असतो. जेव्हडा GVA जास्त तेव्हडं चांगल.
मित्रांनो बांधकाम क्षेत्रातील सकल मूल्यवर्धन (GVA) FY2012 मध्ये INR 7.8 ट्रिलियन वरून वाढून FY2024 मध्ये INR 14.4 ट्रिलियन वर पोहोचला आहे.
FY2024 मध्ये बांधकाम क्षेत्रातील GVA मध्ये वार्षिक 9.9% वाढ झाली आहे. सरकारने पायाभूत सुविधा विकासावर दिलेला भर व मजबूत ऑर्डर बुकमुळे FY2025 मध्ये या क्षेत्रात 9-11% दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे.
एकंदरीत कन्स्ट्रकशन क्षेत्राचा GVA ग्राफ वाढत चाललेला आहे.
Afcons इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड Financials
Particulars | June 30, 2024 | June 30, 2023 | March 31, 2024 | March 31, 2023 | March 31, 2022 |
---|---|---|---|---|---|
Revenue from Operations (INR Million) | 31,543.60 | 31,714.13 | 132,674.95 | 126,373.82 | 110,189.66 |
% Revenue from Overseas Projects | 26.22% | 29.15% | 24.89% | 31.92% | 32.27% |
Total Income (INR Million) | 32,134.70 | 32,215.01 | 136,468.74 | 128,440.90 | 112,695.49 |
EBITDA (INR Million) | 3,716.93 | 3,140.55 | 15,831.24 | 13,737.89 | 10,685.99 |
EBITDA Margin (%) | 11.57% | 9.75% | 11.60% | 10.70% | 9.48% |
Profit after tax (PAT) (INR Million) | 915.86 | 909.62 | 4,497.38 | 4,108.60 | 3,576.05 |
PAT Margin (%) | 2.85% | 2.82% | 3.30% | 3.20% | 3.17% |
Annual Results:
Particulars | March 31, 2024 | March 31, 2023 | March 31, 2022 | CAGR |
---|---|---|---|---|
Revenue from Operations (INR Million) | 132,674.95 | 126,373.82 | 110,189.66 | 9.72% |
EBITDA (INR Million) | 15,831.24 | 13,737.89 | 10,685.99 | 21% |
Profit after tax (PAT) (INR Million) | 4,497.38 | 4,108.60 | 3,576.05 | 12% |
सारांश
गेल्या काही वर्षांपासून परदेशी प्रकल्पांमधून मिळणारे उत्पन्न वाढत आहे. कंपनीचा एकूण नफा आणि नफा मार्जिन सुधारत आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न, नफा आणि नफा मार्जिन यांच्या वाढीचा दर (CAGR) चांगला आहे.
कॉम्पटिशन अनॅलिसिस
Sr.No | Name of the Company | Revenue (Rs. Crores) | EBITDA Margin | PAT Margin | EPS (Rs.) | ROE | ROCE | NAV (Rs.) | RONW |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Afcons Infrastructure | 13,267.50 | 11.60% | 3.30% | 13.20 | 13.28% | 20.18% | 104.92 | 12.58% | |
1 | KEC International Limited | 19,914.17 | NA | 1.92% | 13.49 | NA | NA | 6.68 | 27.04% |
2 | Kalpataru Project International Limi | 19,626.43 | NA | 1.82% | 31.37 | NA | NA | 10.17 | 16.42% |
3 | Dilip Buildcon Limited | 12,011.90 | NA | 4.43% | 13.36 | NA | NA | 4.44 | 25.32% |
4 | Larsen & Toubro Limited | 221,112.91 | NA | 9.05% | 93.88 | NA | NA | 15.24 | 25.32% |
वॅल्यूएशन
कंपनीचा सध्याचा P/E रेशो 35.07 आहे जो की इंडस्ट्री च्या सरासरी 47.91 पेक्ष्या बऱ्यापैकी कमी आहे.
जर याचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तर PE ratio म्हणजे काय? हा लेख नक्की वाचा.
कंपनीशी निगडीत काही रिस्क
कंपनी वरती काही केस भानगडी चालू आहेत. सर्व केस चे मिळून एकूण अमाऊंट तब्बल 50,000 मिल्यन रुपये एवढे आहे. जे की प्रॉफिट च्या 11 पट आहे.
सोबतच कंपनील जास्तीत जास्त कामे ही सरकार कडून मिळतात, तसं पाहायला गेले तर ही एवढी मोठी रिस्क नाही.
इतर गोष्टींमध्ये प्रोजेक्ट फेल होणे, बाधकामच्या जागेवर काही घटना घडणे, प्रोजेक्ट कंप्लीट न होणे या सारख्या गोष्टी असू शकतात.
Afcons Infrastructure IPO details in Marathi
- एकूण IPO आकार: ₹5,430.00 कोटी
- ताज्या शेअर्सची संख्या: 2.7 कोटी शेअर्स, ₹1,250.00 कोटी
- ऑफर फॉर सेल: 9.03 कोटी शेअर्स, ₹4,180.00 कोटी
- आवेदनाची तारीख: 25 ऑक्टोबर 2024 ते 29 ऑक्टोबर 2024
- अलॉटमेंटची तारीख: 30 ऑक्टोबर 2024
- लिस्टिंग तारीख: 4 नोव्हेंबर 2024
- शेअर किंमत बँड: ₹440 ते ₹463 प्रति शेअर
- किमान लॉट आकार: 32 शेअर्स
- किमान गुंतवणूक: ₹14,816 (रिटेल गुंतवणूकदारांसाठी)
- कर्मचाऱ्यांसाठी सूट: ₹44 प्रति शेअर