Best 10 Share Market Book in Marathi: नमस्कार मित्रांनो कसे आहात? मजेत ना? तर मित्रांनो या लेखा मध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय टॉप 10 बुक्स जे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या अगोदर वाचने खूप फायद्याचे ठरते.
मित्रांनो शेअर मार्केट एक विशाल महासागर आहे, आणि म्हणूनच या Market च्या सागरात उतरण्या पूर्वी तुमची नाव ही एकदम भक्कम असली पाहिजे, आणि ही शेअर बाजार मराठी पुस्तके तुमच्या ज्ञानात नक्कीच खूप भर घालतील.
या लेखात आम्ही 3-4 sources मधून माहिती घेऊन Share Market Book in Marathi ची यादी तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जास्त वाट न बघता आपण एक एक पुस्तक आणि त्याची माहिती पाहू.
फिजिकल पुस्तक का चांगलं?
- डोळ्यांवर कमी ताण: पीडीएफ किंवा ईबुक वाचताना स्क्रीन वेळ जास्त होतो, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
- माहिती टिकवणुकीसाठी सोयीचं: संशोधन असं सांगतं की फिजिकल पुस्तक वाचल्यामुळे माहिती अधिक चांगली आठवते.
- खुणा आणि टीपा: फिजिकल बुकमध्ये हायलाइट्स करणे आणि नोट्स लिहिणे सोपे असते.
- मनाची शांतता: फिजिकल पुस्तक वाचताना ईमेल, सोशल मीडिया अशा डिजिटल व्यत्ययांपासून दूर राहता येतं.
1.द इन्टेलिजन्ट् इन्वेस्टर (The Intelligent Investor- By Benjamin Graham)
बेंजमीन ग्राहम यांनी लिहिलेले हे शेअर बाजार मधल्या Investment साठीचं बायबल मानलं जातं. हे पुस्तक स्टॉक मार्केट मध्ये उतरू पाहणाऱ्या नवीन व्यक्ति साठी खूप फायद्याचे आहे.
या पुस्तका मध्ये मुख्यतः ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ (Value investing) ची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
या पुस्तकामध्ये Stock Market basics आणि स्टॉक मार्केट मधले बारकावे हे चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहेत. हे शेअर बाजार पुस्तक मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे.
मित्रांनो या लेखामधील सर्व पुस्तकांच्या खरेदी लिंक्स आम्ही दिलेल्या आहेत जर तुम्हाला कुठले पुस्तक आवडल्यास तुम्ही ते खरेदी करू शकता.
द इन्टेलिजन्ट् इन्वेस्टर (मराठी आवृत्ती) – खरेदी लिंक
2.वन अप ऑन वॉल स्ट्रीट (One up on Wall Street)
हे पुस्तक टॉप इन्वेस्टर पीटर लींच (Mr. Peter Lynch) यांनी लिहिलेले आहे. त्यांनी या पुस्तक मध्ये त्यांच्या investment शैलीचा उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठले Stocks निवडायचे आणि गुंतवणूक कशी करायची याबद्दल माहिती देते.
हे पुस्तक तुम्हाला योग्य शेअर निवडणे आणि त्याच्यात गुंतवणूक करणे या साठी अत्यंत महत्वाचे ठरेल.
वन अप ऑन वॉल स्ट्रीट (मराठी आवृत्ती) – खरेदी लिंक
3.द रीचेस्ट मॅन इन बेबीलोन (The Richest Man in Babylon)
मित्रांनो जर तुम्हाला ट्रेडिंग बद्दल कुठले पुस्तक हवे असल्यास हे पुस्तक खास तुमच्या साठीच आहे. स्टॉक मार्केट मध्ये वापरल्या जाणाऱ्या top books पैकी हे एक पुस्तक आहे.
या पुस्तकाचा unique point म्हणजे यात तुम्हाला Investment आणि share market बद्दल ची माहिती ही छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात अगदी मजेशीर पणे सांगितलेली आहे.
द रीचेस्ट मॅन इन बेबीलोन (मराठी)- खरेदी लिंक.
4.कॉफी कॅन इन्वेस्टिंग (Coffee Can Investing)
या पुस्तका मध्ये तुम्हाला Investment चा ‘Coffee Can’ approach समजावून सांगितलेला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर कमीत कमी रिस्क घेऊन Investment कशी करावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे.
Real Estate, Gold, Mutual funds, FD या सारख्या गोष्टी व्यतिरिक्त अजून पण खूप पर्याय investment साठी असू शकतात आणि ते पर्याय कुठले या बद्दल माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
कॉफी कॅन इन्वेस्टिंग (मराठी)- खरेदी लिंक
5.रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)
Share market मध्ये उतरु पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. या पुस्तकामद्धे श्रीमंत लोक कसे विचार करतात, ते कसे वागतात या बद्दल माहिती दिलेली आहे.
Robert Kiyosaki’s यांनी लिहिलेले हे पुस्तक तुम्हाला पैसा कसा काम करतो आणि त्याची काही गुपीत माहिती देऊन जाते.
रिच डॅड पुअर डॅड(मराठी)- खरेदी लिंक
6.थिंक अँड ग्रो रिच (Think And Grow Rich)
मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला असा confidence देऊन जाईल की बस्. हे पुस्तक तुम्हाला विश्वास देऊन जाईल की तुम्ही पण एक दिवस खूप श्रीमंत होऊ शकता, successful होऊ शकता.
या पुस्तकाची टॅग लाइनच आहे ‘विचार करा आणि श्रीमंत व्हा’. Napoleon Hill यांनी लिहिलेले हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावे.
थिंक अँड ग्रो रिच (मराठी)- खरेदी लिंक
7.पैशाचे मानसशास्त्र (The Psychology of Money)
या पुस्तक मध्ये तुम्हाला financial freedom, Money अश्या गोष्टी बद्दल माहिती दिलेली आहे . सोबतच Rich vs Wealthy मध्ये काय फरक असतो, वेअलथी लोक आपले पैसे कसे वाढवतात, यासारख्या गोष्टींबद्दल माहिती दिलेली आहे.
थोडक्यात मित्रांनो पैशयाबद्दल सर्व महत्वाच्या गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहेत. तुम्ही म्हणाण की या पुस्तकाचा stock market शी काय संबंध , तर मित्रांनो जेवडं महत्व पैसे गुंतवण्यात आहे , त्या पेक्षा पैशाचे मानसशास्त्र समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
पैशाचे मानसशास्त्र (मराठी)- खरेदी लिंक
8.Warren Buffett यांचे गुंतवणूक मंत्र
मित्रांनो तुम्ही जर share market बद्दल ऐकले असेल तर Warren Buffett हे नाव तुम्हाला खात्रेशीर माहिती असणार. या पुस्तकामध्ये वॅरेन बफेट यांनी सांगितलेले Investment बद्दल चे कानमंत्र दिलेले आहेत.
Warren Buffett यांचे गुंतवणूक मंत्र (मराठी)- खरेदी लिंक
मित्रांनो खाली दिलेली Stock Market Books ही जरी मराठी मध्ये Available नसली तरी खूप खूप महत्वाची आहेत. खास करून Indian stock market समजण्यात हे books तुमची खूप मदत करतील.
9. Stocks To Riches: Insights On Investor Behaviour By Parag Parikh
भारतीय शेअर मार्केट समजावून घेण्यासाठी पुस्तक पण भारतीय व्यक्तीचेच हवे ना!
तर मित्रांनो Parag Parikh यांनी लिहिलेले हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा . हे पुस्तक इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे.
10. Value Investing and Behavioral Finance
हे पुस्तक Parag Parikh यांनीच लिहिलेले आहे. Indian share market समजण्यासाठी अजून एक चांगले आणि खूप लोकांनी सुचवलेले बूक आहे. हे बूक English मध्ये available आहे.
हे पुस्तक तुम्ही नक्की वाचू शकता. खरेदी लिंक
मित्रांनो शेअर मार्केट बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचा शेअर मार्केट म्हणजे काय हा लेख नक्की वाचा.
Disclaimer
This Article contains amazon affiliate links Visit our Disclaimer page for more information.
नमस्कार मित्रांनो,
मी सचिन जगताप , MarketMarathi.com चा संस्थापक. ब्लॉगिंग क्षेत्रात मी मागील ५-६ वर्षांपासून कार्यरत आहे. मला WordPress, SEO, आणि डिजिटल मार्केटिंग याबद्दल अनुभव आहे. आर्थिक विषयांवर वाचन व रिसर्च करणे, तसेच माझ्या गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडणे हे माझे आवडते विषय आहेत.