सिबिल स्कोर म्हणजे काय | CIBIL Score information in Marathi

सिबिल स्कोर बद्दल माहिती | CIBIL Score Information in Marathi

CIBIL Score Information in Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात सिबिल स्कोर म्हणजे काय आणि सिबिल स्कोर बद्दल सर्व माहिती सखोलपणे जाणून घेणार आहोत.

सर्वात अगोदर सिबिल स्कोरलाच क्रेडिट स्कोर (Credit Score) असेही म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी हे दोन शब्द आपण आलटून पालटून वापरू शकतो.

CIBIL म्हणजे काय ?

मित्रांनो, सिबिलचा लॉन्ग फॉर्म (CIBIL long form) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited) अर्थात CIBIL.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ही एक भारतातील कंपनी आहे जी भारतातील लोकांचा क्रेडिट डेटा गोळा करते, साठवते आणि बँकांना ती माहिती पुरवते. ज्याचा वापर करून बँका कोणाला कर्ज द्यायचे हे ठरवतात.

सिबिल स्कोर म्हणजे काय?

मित्रांनो, सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणजेच क्रेडिट स्कोर (Credit Score) ही एक तीन अंकी संख्या आहे, जी 300 ते 900 च्या मध्ये असू शकते.

ही संख्या तुमच्या आर्थिक व्यवहारातील इतिहास (क्रेडिट हिस्ट्री) दर्शवते. सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही यापूर्वी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते (EMI) नियमित भरले की नाही, याची माहिती देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर होय.

स्कोर जेवढा जास्त, तेव्हढे बँका तुम्हाला लवकर आणि सहज कर्ज देतात. साधारणतः 750 पेक्षा जास्त स्कोरला चांगला सिबिल स्कोर म्हणतात. या पेक्षा कमी स्कोर असल्यास बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकते.

क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट रीपोर्ट फरक

मित्रांनो, क्रेडिट स्कोर ही फक्त एक तीन अंकी संख्या आहे. पण क्रेडिट रीपोर्टमध्ये तुमची सर्व माहिती असते, जसे की तुम्ही यापूर्वी कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आहे, त्याचा कालावधी, हफ्ते किती नियमित भरले, काही थकबाकी आहे का. या सर्व गोष्टी सखोलपणे क्रेडिट रीपोर्टमध्ये दिलेल्या असतात.

सिबिल स्कोर कसा तपासायचा

यासाठी अनेक मोफत वेबसाइट्स आहेत जसे की पैसाबजार. तुम्हाला फक्त पैसाबजार या संकेतस्थळावर जाऊन नाव, फोन नंबर, पॅन कार्ड माहिती भरून, OTP प्रविष्ट करून ‘Get free credit report’ या बटणावर क्लिक करायचे आहे.

सिबिल स्कोर कसा तपासायचा

तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट रीपोर्ट तुम्हाला मिळेल.

CIBIL Score information in marathi

सिबिल स्कोर वरती परिणाम करणारे घटक

  1. पेमेंट हिस्ट्री (Payment History)
    मित्रांनो, सिबिल स्कोरवर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कर्जाची नियमित परतफेड. एखादा हप्ता चुकला की सिबिल स्कोर खाली घसरतो. म्हणून चांगला क्रेडिट स्कोर राखण्यासाठी वेळच्या वेळी कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
  2. क्रेडिट वापर (Credit Utilization)
    क्रेडिट वापर म्हणजे तुम्हाला मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर. समजा तुमच्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे ज्याची मर्यादा 1,00,000 आहे. चांगला क्रेडिट स्कोर राखण्यासाठी तुम्ही फक्त 30% म्हणजेच 30,000 वापरले पाहिजेत.
  3. क्रेडिटचे वय (Age of Credit)
    एखादे क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे 5 वर्षांपासून असेल तर त्या कार्डवर तुमची बरीच क्रेडिट हिस्ट्री तयार झालेली असते, जी भविष्यात नवीन कर्ज मिळवण्यात मदत करते.
  4. टाइप्स ऑफ लोन अकाउंट्स
    विविध प्रकारचे लोन घेतल्यास, जसे की बाइक लोन, एज्युकेशन लोन, याचा सकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोरवर होतो.
  5. इतर घटक
    सारखे सारखे कर्जाची मागणी करणे किंवा चौकशी करणे यामुळे क्रेडिट स्कोरवर नेगेटिव परिणाम होतो.

सिबिल स्कोर कसा वाढवायचा

  1. कर्जाचे हफ्ते वेळेवर भरणे
    कर्जाची परतफेड वेळेवर करणे चांगला सिबिल स्कोर राखण्यासाठी खूप महत्वाचे आहे. हफ्ते नियमित जात आहेत का ते तपासा.
  2. आपला सिबिल स्कोर वेळोवेळी तपासत रहा
    ठराविक काळानंतर आपला क्रेडिट स्कोर तपासा. कुठले घटक त्यावर वाईट परिणाम करत आहेत किंवा कुठली थकबाकी आहे का ते पाहा आणि ती तात्काळ भरा.
  3. आपल्या कर्जाचा वापर मर्यादित ठेवा
    मंजूर झालेल्या रक्कमेच्या 30% च्या आसपास कर्जाचा वापर करा. याने क्रेडिट स्कोर वाढण्यास मदत होते.

तुम्हाला आमचे हे लेख नक्की आवडतील:

सिबिल स्कोर किती वेळाने अपडेट होतो?

सिबिल स्कोर दर महिन्याला एकदा अपडेट होतो, जेव्हा बँका आणि वित्तीय संस्थांमधून तुमची क्रेडिट माहिती सिबिलला मिळते.

सिबिल स्कोर कसा सुधारायचा?

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी वेळेवर कर्जाचे हफ्ते भरणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे आणि अनावश्यक कर्ज घेणे टाळणे हे काही प्रमुख उपाय आहेत.

सिबिल स्कोर चेक करणे फ्री आहे का?

होय, अनेक वेबसाइट्स जसे की पैसाबजार, तुम्हाला फ्री मध्ये तुमचा सिबिल स्कोर तपासण्याची सेवा पुरवतात.

सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर यामध्ये फरक आहे का?

नाही, सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर एकच गोष्ट आहे. सिबिल स्कोर हा CIBIL या संस्थेकडून दिला जातो.

निष्कर्ष

मित्रांनो, सिबिल स्कोर तुमच्या आर्थिक आरोग्याचा एक महत्वाचा घटक आहे. वेळेवर कर्जाची परतफेड, क्रेडिट कार्डचा योग्य वापर, आणि आपला क्रेडिट स्कोर नियमित तपासत राहणे हे सिबिल स्कोर सुधारण्यासाठी महत्वाचे आहे. तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला सिबिल स्कोर राखणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top