स्विगी आयपीओ | Swiggy IPO details in Marathi

Rate this post

Swiggy IPO details in Marathi : नमस्कार मित्रांनो खुप प्रचलित कंपनी स्विगी लिमिटेड चा आयपीओ लवकरच येत आहे. या लेखात आपण सर्व माहिती जसे की कंपनी बद्दल माहिती, इंडस्ट्री अनॅलिसिस आणि financials पाहणार आहोत.

Swiggy IPO details in Marathi

मित्रांनो कधीही आपल्याला बाहेरून जेवण ऑर्डर करायचं असेल तर आपल्या मनात साधारणतः दोन नावे येतात एक म्हणजे Swiggy आणि एक म्हणजे Zomato.

माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मला स्विगीची सर्विस थोडी बरी वाटते. पण कदाचित तुमच्या एरिया मध्ये वेगळा पण असू शकता, बर असो आपण आता मूल विषयावर येऊ.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्विगीची सुरवात

मित्रांनो स्विगी ही कंपनी 2014 मध्ये सुरू झाली. सर्वात अगोदर त्यांनी त्यांचे मोबाइल अ‍ॅप लॉंच केले. या वरती ग्राहक विविध जेवणाच्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करू शकत होते.

नंतर पुढे चालून त्यांनी किराणा आणि घरगुती वस्तुसाठी Instamart नावाने नवीन अ‍ॅप लॉंच केले.

Swiggy ची खासियत म्हणजे त्या वरती मिळणारे discounts आणि offers यातून त्यांची लोकप्रियता वाढतच गेली.

इंडस्ट्री अनॅलिसिस

मित्रांनो Swiggy सारखे व्यवसाय हे पूर्णपणे इंटरनेट आणि त्याचा वापर यावरती अवलंबून आहेत.

याबद्दल अधिक बोलायचे झाले तर भारतातील इंटरनेट वापरणाऱ्य लोकांची संख्या सुमारे 58 टक्के एवढी आहे, ही माहिती 2023 ची आहे.

यातील सुमारे 47% लोक स्मार्ट फोन वापरतात आणि तब्बल 17% लोक असे आहेत जे ऑनलाईन खरेदी वगेरे करतात.

काही सर्वेच्या अंदाजानुसार हे आकडे 2028 पर्यन्त 7-9 टक्क्यांनी नक्की वाढतील असा अंदाज आहे.

7-9 टक्के वाढ ही भारतासारख्या देशासाठी खूप जास्त म्हणावी लागेल.

ही वाढ म्हणजे Swiggy सारख्या कंपन्यांची चांदीच म्हणावी लागेल.

फक्त Online Food Delivery मार्केटचा जर आपण विचार केला तर 2018 ते 2023 या काळात यात तब्बल 42% वाढ नोंदवली गेली आहे. येणाऱ्या काळात म्हणजे 2023 ते 2028 पर्यन्त यात 17-22% एवढी वाढ होण्याचा अंदाज आहे.

म्हणजे परत आपल्या कंपनीसाठी एक पॉजिटिव इंडिकेटर.

मित्रांनो यात आपण अमिरिकेसारख्या देशाचा विचार केला तर प्रतेक 100 जेवणामागे 55-60 जेवण हे ऑनलाईन मागवले जातात.

भारतात हा आकडा 9-12% एव्हडा आहे, म्हणजे प्रतेक 100 जेवण मागे 9-12 जेवण हे ऑनलाईन पद्धतीने मागवले जातात. पण, मित्रांनो ग्रोथ खूप पॉजिटिव आहे हे मात्र नक्की.

Financials

Sr. No.ParticularsUnitAs of and for the three months ended June 30, 2024As of and for the three months ended June 30, 2023As of and for the financial year ended March 31, 2024As of and for the financial year ended March 31, 2023As of and for the financial year ended March 31, 2022
1Swiggy Platform B2C Orders Total(# in million)213.92182.39760.18648.65495.80
2B2C GOV(in ₹ million)101,895.8682,771.86349,690.75277,405.18201,222.59
3Consolidated Gross Revenue(in ₹ million)34,772.8726,938.48123,203.1494,796.8968,604.44
4Consolidated Adjusted EBITDA(in ₹ million)(3,478.00)(4,868.96)(18,355.67)(39,103.37)(32,337.62)
5Average Monthly Transacting Users(# in million)15.9913.8814.2912.6710.26
6Average Monthly Transacting Delivery Partners(#)457,249350,280392,589322,819243,496
7Platform Frequency(#)4.504.424.484.344.14

यातील पॉजिटिव मुद्दे पहायचे झाले तर ते खालीलप्रमाणे आहेत:

  • ऑर्डर्स: B2C आणि B2C GOV दोन्ही प्रकारच्या ऑर्डर्समध्ये मोठी वाढ झाली दिसून येत आहे आहे.
  • महसूल वाढ: एकूण महसूल वाढलेला दिसून येत आहे.
  • सक्रिय वापरकर्ते आणि पार्टनर्सची वाढ: मित्रांनो सरासरी प्रतेक महिन्याचे सक्रिय वापरकर्ते आणि डिलिव्हरी पार्टनर्स मंथ ऑन मंथ बेसिस वरती वाढलेले दिसून येत आहेत.
  • स्थिर प्लॅटफॉर्म फ्रिक्वेंसी: प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांची सरासरी वापर फ्रिक्वेंसी ही पण स्थिर राहिली आहे.

मित्रांनो एवढा सगळं असून ही कंपनी मात्र अजून लॉस मेकिंग कंपनी आहे. सोबतच कॅश फ्लो सुद्धा नेगेटिव आहे.

कॉम्पटिशन

मित्रांनो या इंडस्ट्री मध्ये खूप खूप कॉम्पटिशन आहे. मुख्य प्रतिस्पर्धी सांगायचा झाला तर तो आहे Zomato, सोबत Big Basket, Blinkit, Zepto या सारखे काही प्लेअर्स पण आहेत.

वॅल्यूएशन

  • P/E Ratio– NA (कारण कंपनी लॉस मध्ये आहे)
  • इंडस्ट्री P/E Ratio- 287 (Zomato)
  • प्राइस टू सेल – 7.76
  • इंडस्ट्री P/S Ratio- 13.4 (Zomato)

स्विगी आयपीओ माहिती

  • IPO तारीख: 6 नोव्हेंबर 2024 ते 8 नोव्हेंबर 2024
  • लिस्टिंग तारीख: 13 नोव्हेंबर 2024
  • फेस व्हॅल्यू (मूल्य प्रति शेअर): ₹1 प्रति शेअर
  • प्राइस बँड: ₹371 ते ₹390 प्रति शेअर
  • एकूण इश्यू आकार: ₹11,327.43 कोटी
  • ताज्या इश्यूचे मूल्य: ₹4,499.00 कोटी
  • विक्रीसाठी ऑफर (OFS): ₹6,828.43 कोटी
  • किमान अर्ज (रिटेल): ₹14,820

IPO नंतर मार्केट कॅप: ₹87,300 कोटी (झोमॅटोच्या ₹2.22 लाख कोटी मार्केट कॅपच्या तुलनेत).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top