ROE म्हणजे काय? | Return on Equity in Marathi

Rate this post

रिटर्न ऑन इक्विटी (ROE) म्हणजे काय? | Return on Equity in Marathi

Return on Equity in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण रिटर्न ऑन इक्विटी (ROE) या अतिशय महत्वाच्या वित्तीय मापदंडावर चर्चा करणार आहोत. ROE म्हणजे काय?, ते कसं मोजलं जातं आणि ते स्टॉक निवडताना का महत्वाचं आहे, हे आपण सविस्तर पाहूया.

रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय तर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या भांडवलावर किती परतावा मिळवला, हे दर्शवणारा मापदंड होय.

साध्या भाषेत सांगायचं तर, एखाद्या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्स च्या गुंतवलेल्या 100 रुपयांवर किती उत्पन्न कमावलं, हे सांगणारा मापदंड म्हणजेच ROE होय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ROE कसे मोजले जाते? | Return on Equity formula

ROE कसे मोजले जाते?

उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीने 100 रुपये गुंतवले आणि त्यातून 10 रुपये निव्वळ नफा मिळवला, तर ROE असेल 10%

म्हणजेच काय तर ती कंपनी तुम्ही तिच्यात गुंतवलेल्या प्रतेक 100 रुपया मागे 10 रुपये प्रॉफिट कमावत आहे.

जर तुम्हाला याबद्दल अजून स्पष्टीकरण हवे असल्यास आम्हाला कोंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Return on Equity in Marathi

मित्रांनो ROE कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही आमचे रिटर्न ऑन इक्विटी कॅल्क्युलेटर वापरू शकता.

ROE का महत्वाचा आहे?

मित्रांनो, एखाद्या कंपनीचा ROE जर चांगला असेल तर तो एक पॉजिटिव सिग्नल समजला जातो. ROE जास्त असणे म्हणजे कंपनी आपल्या शेअरधारकांच्या भांडवलाचा प्रभावी वापर करून चांगला परतावा मिळवत आहे असा होतो. यामुळे स्टॉक निवडताना ROE हा महत्वाचा मापदंड समजला जातो.

मित्रांनो लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी साधारण 15% पेक्षा जास्त ROE चांगला समजला जातो.

ROE चे फायदे

  1. शेअरहोल्डर्सच्या भांडवलावर परतावा: ROE जास्त असणे म्हणजे कंपनी शेअरहोल्डर्सच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवत आहे.
  2. कंपनीची कार्यक्षमता: ROE वरून कंपनी आपल्या भांडवलाचा कसा वापर करते याचा अंदाज येतो.
  3. स्पर्धात्मकता: चांगला ROE असणाऱ्या कंपन्या इतर कंपण्याच्या तुलनेत सरस ठरतात.

ROE चा उपयोग कसा करायचा?

मित्रांनो कुठलाही स्टॉक निवडताना आपल्याला काही मापदंड विचारात घ्यावे लागतात. याबद्दल अधिक माहिती आमच्या चांगला स्टॉक कसा निवडावा? या लेखात दिलेली आहे. बाजार भांडवल, विक्री वाढ, फ्री कॅश फ्लो, डेट टू इक्विटि रेशो, P/E ratio, EPS आणि मोट हे सगळे मापदंड वापरुन चांगला स्टॉक कसा निवडायचा हे नक्की वाचा.

निष्कर्ष

मित्रांनो, स्टॉक निवडताना ROE हा एक महत्वाचा मापदंड आहे. ROE जास्त असलेल्या कंपन्या आपल्याला चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगतात. त्यामुळे, स्टॉक निवडताना ROE सह इतर सर्व वित्तीय मापदंड विचारात घ्या आणि आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top