म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Mutual Funds Information in Marathi
नमस्कार मित्रांनो कसे आहात? आज आपण या लेखामध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि सोबतच म्यूचुअल फंड बद्दल सर्व काही माहिती ही मराठीमध्ये समजून घेणार आहोत.
मित्रांनो म्यूचुअल फंड मध्ये ‘म्यूचुअल’ म्हणजे परस्पर आणि ‘फंड’ म्हणजे निधी. परस्पर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त. सोप्या शब्दात सांगायचे तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांनी आपआपसात एकत्रित येऊन केलेला फंड म्हणजेच म्यूचुअल फंड.
अगोदर आपण म्यूचुअल फंडची व्याख्या समजून घेऊ आणि नंतर एका उदाहरणाद्वारे सोप्या भाषेत म्यूचुअल फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.
म्युच्युअल फंडाची व्याख्या
“म्यूचुअल फंड हा अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड असतो. ज्यामध्ये गुंतवलेले एकूण पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्यासाठी वापरले जातात आणि गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न केला जातो.”
उदाहरणाद्वारे समजून घेऊया
चला आता आपण एक उदाहरण घेऊन म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे समजून घेऊ.
समजा तुम्ही आणि तुमचे तीन मित्र असे चार लोकांना एक मोकळा प्लॉट पसंद पडला, ज्याची किंमत आहे ४० लाख रुपये. पण तुमच्या पैकी कोणाकडेच एक रक्कमी ४० लाख नव्हते. मग तुम्ही १० लाख रुपये प्रत्येकी असे मिळून ४० लाखात तो प्लॉट खरेदी केला.
या खरेदी केलेल्या जागेवर मस्त पैकी गाळे काढले आणि तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम यायला चालू झाली. म्हणजेच तुम्ही आपआपसात एकत्र येऊन एक ४० लाखांचा फंड तयार केला आणि त्याची प्लॉट मध्ये गुंतवणूक केली.
आता आपण वरती प्लॉटचे उदाहरण घेतले पण जरूरी नाही की हा गोळा केलेला फंड प्लॉट मध्येच गुंतवावा, तो फंड मधला पैसा तुम्ही शेअर मार्केट मध्ये किंवा इतर कुठल्या पण ठिकाणी पण गुंतवू शकता. फरक फक्त एवढाच की म्यूचुअल फंड मध्ये हा गोळा झालेला पैसा म्हणजेच फंड सांभाळण्यासाठी एक फंड मॅनेजर (Fund Manager) निश्चित केलेला असतो.
हा फंड मॅनेजर गोळा केलेला पैसा कुठल्या शेअर मध्ये, किती काळासाठी, कधी गुंतवायचा हे ठरवत असतो. साहजिकच त्या फंड मॅनेजरला शेअर मार्केट बद्दल सर्व ज्ञान असते.
मित्रांनो भारतामध्ये असे अनेक म्यूचुअल फंड्स आहेत. अनेक मोठ्या मोठ्या कंपनी मार्फत असे म्यूचुअल फंड चालवले जातात. जसे की एचडीएफसी म्यूचुअल फंड (HDFC), एसबीआय म्यूचुअल फंड (SBI), पराग पारिख म्यूचुअल फंड (Parag Parikh). यामध्ये तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक पण पैसे गुंतवू शकतात.
या सर्व गोष्टींवरती नजर ठेवण्यासाठी एक रेग्युलेटर पण असतो आणि भारतात या रेग्युलेटरच नाव आहे सेबी (SEBI – Securities and Exchange Board of India).
म्युच्युअल फंडाचे प्रकार (Types of Mutual Funds)
मित्रांनो म्यूचुअल फंडचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात:
- डेट म्यूचुअल फंड (Debt Mutual Fund)
- हायब्रिड म्यूचुअल फंड (Hybrid Mutual Fund)
- इक्विटि म्यूचुअल फंड (Equity Mutual Fund)
- कमोडिटी म्यूचुअल फंड (Commodity Mutual Fund)
मित्रांनो हे सर्व म्यूचुअल फंडचे प्रकार आम्ही दुसऱ्या वेगळ्या लेखामध्ये एकदम सविस्तररित्या समजावून सांगितलेले आहेत. त्या त्या म्यूचुअल फंडवर क्लिक करून तुम्ही त्यांच्या बद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता.
म्युच्युअल फंड फायदे मराठी (Benefits of Mutual Funds)
- विविधीकरण (Diversification) – विविधीकरण कशाचे तर ते तुमच्या पैशाचे. समजा तुम्ही म्यूचुअल फंड निवडला जो १० कंपन्यांमध्ये समान पैसे गुंतवतो आणि त्यात तुम्ही १००० इन्वेस्ट केले. आता काय होणार तुमचे हे गुंतवलेले १००० रुपये प्रत्येक कंपनीमध्ये १०० रुपये या प्रमाणे इन्वेस्ट होणार.
- तुलनेने कमी जोखीम – जसं वरती सांगितल्या प्रमाणे तुमचे एका कंपनीमध्ये फक्त १०० च रुपये इन्वेस्ट झाले. जरी उद्या त्या कंपनी मध्ये काही झाले तरी १००० रुपया पैकी तुमचे १०० च रुपये रिस्क मध्ये असणार.
- एक्स्पर्ट कडून व्यवस्थापन – मित्रांनो तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरती देखरेख ठेवण्यासाठी एक फंड मॅनेजर असतो त्यामुळे तुमच्या पैशाची गुंतवणूक ही नेहमीच चांगल्या संशोधन केलेल्या कंपन्यांमध्येच होत असते.
- वेळेची बचत – मित्रांनो जर तुम्ही जॉब करत असाल किंवा इतर काही धंदा असेल तर मी तर म्हणेन की म्यूचुअल फंड सही है!. कारण प्रत्येक कंपनी बद्दल रिसर्च करणे, तिचे fundamentals जाणून घेणे हे सगळ्यांना शक्य होत नाही.
- ध्येय साध्यं करण्यात मदत – मित्रांनो समजा काही दिवस नंतर तुम्हाला काही पैशाची गरज लागणार आहे. त्यासाठी तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये SIP चालू करून पैसे वाचवायला सुरू करू शकता.
- गुंतवणुकीची लवचिकता – मित्रांनो गुंतवणूक करण्यासाठी म्यूचुअल फंडमध्ये तुम्हाला हजारो पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधी पण, कुठे पण, कशी पण गुंतवणूक करू शकता.
- एसआयपी (SIP) ची सुविधा – मित्रांनो म्यूचुअल फंड तुम्हाला एसआयपी सारख्या सुविधा उपलब्ध करून देते त्यामुळे यात गुंतवणूक करणे अगदी सरळ आणि सोपे होते. अधिक माहितीसाठी आमचा एसआयपी म्हणजे काय हा लेख वाचा.
- एफडी पेक्ष्या जास्त परतावा – मित्रांनो सध्याच्या काळात म्यूचुअल फंड एफडी (FD) पेक्ष्या कधीही जास्त परतावा (Return) देऊन जातील.
- पैसे काढण्यात सोपेपणा – मित्रांनो म्यूचुअल फंडमध्ये जसे पैसे गुंतवणे सोपे आहे त्याच प्रमाणे पैसे काढणे पण तेवढेच सोपे आहे. यामध्ये SWP (Systematic Withdrawal Plan) सारख्या सुविधा खूपच फायदेशीर ठरतात.
म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? (How to invest in Mutual Fund)
म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत:
- एसआयपी (SIP)
- एकठोक (Lumpsum)
मित्रांनो चांगला म्यूचुअल फंड कसा निवडायचा याबद्दल सर्व माहिती आम्ही आमच्या ‘चांगला म्यूचुअल फंड कसा निवडावा’ या लेखात दिलेली आहे, हा लेख तुम्ही नक्की वाचा.
मित्रांनो एसआयपी बद्दल ‘एसआयपी म्हणजे काय’ या लेखामध्ये अगदी सविस्तर रित्या माहिती दिलेली आहे. कृपया तुम्ही तो लेख नक्की वाचा. म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी हा पर्याय निवडला पाहिजे, याबद्दल पण सविस्तर रित्या माहिती एसआयपी च्या लेखामध्ये दिलेली आहे.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१. म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हा अनेक गुंतवणूकदारांच्या पैशांनी बनलेला एक फंड असतो. हा जमा झालेला पैसा शेअर बाजार आणि इतर ठिकाणी तज्ञ फंड मॅनेजरद्वारे गुंतवला जातो जेणेकरून चांगला परतावा मिळू शकेल.
२. म्युच्युअल फंडाचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड आणि कमोडिटी फंड असे प्रकार पडतात.
३. म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करता येते?
तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून (SIP – Systematic Investment Plan) किंवा एकदाच मोठी रक्कम गुंतवून (Lumpsum) गुंतवणूक करू शकता.
४. भारतातील म्युच्युअल फंडांवर कोणाचे नियंत्रण असते?
भारतातील सर्व म्युच्युअल फंडांवर नियंत्रण आणि नियमन करण्याचे काम ‘सेबी’ (SEBI – Securities and Exchange Board of India) करते.
