ELSS म्हणजे काय? | ELSS information in Marathi

Rate this post

ELSS information in Marathi

ELSS information in Marathi: नमस्कार मित्रांनो! आजच्या लेखात आपण ELSS म्हणजे काय?, त्याचे फायदे आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे सविस्तरपणे बघणार आहोत.

ELSS म्हणजे काय?

मित्रांनो, ELSS म्हणजेच Equity Linked Savings Scheme जो की एक म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे.

ELSS हा एक टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड आहे. ज्यात आपली गुंतवणूक मुख्यतः शेअर्समध्ये केली जाते. या स्कीममध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलत मिळते. या गुंतवणुकीचा लॉक-इन कालावधी 3 वर्षे असतो, म्हणजेच आपण गुंतवलेले पैसे किमान 3 वर्षे यामध्ये ठेवावे लागतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ELSS चे फायदे

ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. काही महत्वाचे फायदे खालील प्रमाणे-

  • कर सवलत: ELSS हा एकमेव म्युच्युअल फंड आहे जो 80C अंतर्गत कर सवलत देतो.
  • लहान लॉक-इन कालावधी: ELSS चा लॉक-इन फक्त 3 वर्षांचा असतो, जो PPF आणि अन्य कर-बचत योजनांच्या तुलनेत कमी आहे.
  • उच्च परतावा: ELSS चे पैसे मुख्यतः इक्विटी बाजारात गुंतवले जात असल्यामुळे चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते.

ELSS मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य पद्धत

ELSS मध्ये गुंतवणूक करताना काही स्ट्रॅटेजी वापरल्यास, आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. चला या स्ट्रॅटेजी जाणून घेऊ.

स्ट्रॅटेजी 1 – SIP चा वापर करा

मित्रांनो, एकावेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी आपण ELSS मध्ये SIP च्या माध्यमातून लहान-लहान रक्कम दर महिन्याला गुंतवू शकतो. यामुळे मार्केटमधील उतार-चढावांचा आपल्यावर कमी परिणाम होतो आणि आपली गुंतवणूक अधिक सुरक्षित होते.

आम्ही SIP बद्दल आमच्या एसआयपी म्हणजे काय? या लेखात सर्व माहिती सांगितलेली आहे.

स्ट्रॅटेजी 2 – दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा

जरी ELSS चा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असला, तरीही दीर्घकालीन गुंतवणूक ठेवल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. इक्विटी मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते.

स्ट्रॅटेजी 3 – विविध ELSS फंडांचे मूल्यमापन करा

तुमच्या गुंतवणुकीसाठी कोणता ELSS फंड योग्य आहे हे ठरवताना फंडाचा मागील परतावा, फंड मॅनेजमेंट आणि जोखीम यांचा विचार करा. मार्केटमध्ये बरेच ELSS फंड उपलब्ध आहेत, त्यातील चांगला फंड निवडून तुम्ही गुंतवणूक करू शकता.

ELSS बद्दलचे काही महत्वाचे मुद्दे

  • जोखीम: ELSS एक इक्विटी-आधारित गुंतवणूक आहे, त्यामुळे जोखीम जास्त असू शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्या अगोदर सर्व माहिती घेणे गरजेचे आहे.
  • मार्केट कंडिशन: इक्विटी आधारित असल्यामुळे मार्केटमधील चढ उतरचा परिणाम ELSS वर होतो. त्यामुळे मार्केटचे ट्रेंड जाणून घेऊन मग योग्य वेळी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
  • लक्ष्य निश्चित करा: ELSS हा केवळ कर-बचत उपाय नसून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा पर्याय सुद्धा आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना एक टार्गेट सेट करून त्या हिशोबणे गुंतवणूक सुरू करू शकता.

निष्कर्ष

तर मित्रांनो, ELSS ही एक उत्तम कर-बचत गुंतवणूक योजना आहे, जी चांगल्या परताव्याची शक्यता देते. योग्य स्ट्रॅटेजी, दीर्घकालीन दृष्टिकोन, आणि फंडाचे योग्य मूल्यांकन केल्यास तुम्ही ELSS मध्ये उत्तम परतावा मिळाऊ शकता. आशा आहे की, हा लेख वाचून तुम्हाला ELSS बद्दल बेसिक माहिती मिळाली असले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top