Waaree Energies IPO details in Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण वारी एनर्जीज लिमिटेड आयपीओ बद्दल सर्व सखोल माहिती या लेखात पाहणार आहोत. खूप चर्चा चालू आहे या आयपीओ बद्दल, म्हणूनच आपण हा लेख तुमच्या साठी घेऊन आलोय.
Waaree Energies IPO Introduction
मित्रांनो Waaree Energies Ltd ही कंपनी प्रामुख्याने Solar Modules चे उत्पादन करते. मित्रांनो याच Solar Modules चा वापर सोलार पॅनल तयार करण्यासाठी करतात.
मित्रांनो भारतात सध्या अक्षय ऊर्जा (Renewable energy) ला खूपच महत्व प्राप्त झालेले आहे. एकंदरीत विचार केला तर येणाऱ्या काळात हे मार्केट खूपच लांब जाणार असे तज्ञांचे मत आहे.
मित्रांनो Waaree Energies या कंपनीचे Solar Modules तयार करण्याचे कारखाने सध्या चिखली, सूरत, तुंब, आणि नंदीग्राम या ठिकाणी आहेत.
सोबतच Waaree Renewable Technologies ही अजून एक कंपनी आहे जिच्यात आपली जी मुख्य कंपनी आहे Waaree Energies Ltd यांचा 74.46% हिस्सा आहे.
मित्रांनो सर्वात महत्वाची आणि कदाचित धक्कादायक गोष्ट म्हणजे Waaree Renewable Technologies या कंपनीने लिस्टिंग पासून आज पर्यन्त 61500% एवढा परतावा दिलेला आहे.
इंडस्ट्री अनॅलिसिस
मित्रांनो येणाऱ्या काळात भारतात विजेचा वापर हा वाढतच जाणार आहे. भरतातची लोकसंख्या पण झपाट्याने वाढत जात आहे आणि एकंदरीतच सर्वच गोष्टी कश्या न कश्या ह्या विजेच्या वापराशी निगडीत आहेतच.
सोबतच लोकांमध्ये अक्षय ऊर्जा (Renewable energy) यात प्रामुख्याने सोलार एनर्जीकडे लोकांचा कल हा वाढत चाललेला आहे.
दिवसंदिवास विविध सोलार साहित्य हे भारतात तयार होत आहे. सोलार पॅनल हे पण मोठ्या प्रमाणात भारतात तयार होत आहेत.
आणि म्हणूनच Waaree Energies Ltd या सारख्या कंपन्या सध्या खूप जास्त तेजीत पाहायला मिळत आहेत.
या सोबतच विविध प्रकारचे सोलार मोडूल एक्सपोर्ट पण केले जातात, यातून पण भारतातील कंपन्या खूप तेजीत आलेल्या दिसत आहेत.
खाली दिलेल्या ग्राफ वरुण तुम्हाला चांगली आयडिया येईल.
Waaree Energies Growth analysis
KPI | मार्च 31, 2022 | मार्च 31, 2023 | मार्च 31, 2024 | जून 30, 2023 | जून 30, 2024 |
---|---|---|---|---|---|
EBITDA मार्जिन | 6.88% | 13.76% | 15.56% | 16.23% | 18.30% |
कर्ज ते इक्विटी गुणोत्तर | 0.72 | 0.15 | 0.08 | 0.08 | 0.06 |
सरासरी वापरलेल्या भांडवणावरील परतावा | 23.49% | 48.83% | 36.95% | 17.75% | 9.56% |
PAT मार्जिन | 2.70% | 7.29% | 10.96% | 9.91% | 11.47% |
क्षमता GW मध्ये | 4 | 9 | 12 | 12 | 12 |
ऑर्डर बुक GW मध्ये | 3.28 | 18.06 | 19.93 | 17.19 | 16.66 |
Waaree Energies Financial analysis
विशेषता | 2022 (लाखांमध्ये) | 2023 (लाखांमध्ये) | 2024 (लाखांमध्ये) | जून 30, 2023 (लाखांमध्ये) | जून 30, 2024 (लाखांमध्ये) |
---|---|---|---|---|---|
ऑपरेशनमधून प्राप्त महसूल | 28,542.65 | 67,508.73 | 113,976.09 | 33,282.92 | 34,089.01 |
एकूण उत्पन्न | 29,458.51 | 68,603.64 | 116,327.63 | 34,149.98 | 34,964.13 |
EBITDA | 2,025.32 | 9,441.34 | 18,095.77 | 5,542.96 | 6,399.89 |
EBITDA मार्जिन | 6.88% | 13.76% | 15.56% | 16.23% | 18.30% |
करपूर्व पुनर्स्थापित नफा | 1,183.73 | 6,771.50 | 17,342.01 | 4,573.62 | 5,305.29 |
वर्ष/काळासाठी पुनर्स्थापित नफा | 796.50 | 5,002.77 | 12,743.77 | 3,382.73 | 4,011.25 |
PAT मार्जिन | 2.70% | 7.29% | 10.96% | 9.91% | 11.47% |
महत्वाचे मुद्दे – जोखीम
मित्रांनो PLI स्कीम अंतर्गत कंपनीला जवळपास 1923 कोटी रुपये अवॉर्ड करण्यात आले होते.
पण कंपनीला दिलेली 18 एप्रिल 2025 ची तारीख कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. या साठी कंपनीने 24 महीने वेळ वाढून मागीतलेला आहे जो की त्यांना अजून पर्यन्त मिळालेला नाही आहे.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो कच्चा माल सोलार मोडूल तयार करण्यासाठी लागतो आहे त्यातील बऱ्याच माल हा चीन मधून इम्पोर्ट होत आहे.
म्हणून भविषतील जागतिक राजकारणाचा परिणाम यावरती होऊ शकतो.
या व्यतिरिक्त कंपनी वरती कुठल्या मोठ्या केस भानगडी चालू नाहीत.
Waaree Energies IPO details in Marathi
- IPO ची तारीख: 21 ऑक्टोबर 2024 ते 23 ऑक्टोबर 2024
- प्राइस बँड: प्रति शेअर रुपये 1427 ते रुपये 1503
- एकूण जारी आकार: 4321.44 कोटी रुपये
- फ्रेश इश्यू : 3600 कोटी रुपये
- ऑफर फॉर सेल : 721.44 कोटी
- लिस्टिंग तारीख: 28 ऑक्टोबर 2024
नोट: ही माहिती केवळ संदर्भासाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतंत्र सल्ला घ्या.