हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय | Hybrid Mutual Fund Information Marathi

Rate this post

Hybrid Mutual Fund Information Marathi

Hybrid Mutual Fund Information Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि सोबतच हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल सर्व माहिती अगदी सखोल रित्या पाहणार आहोत.

मित्रांनो जर तुम्हाला म्यूचुअल फंड बद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमचा म्यूचुअल फंड म्हणजे काय हा लेख नक्की वाचा.

हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय?

तर हायब्रिड म्हणजे थोडक्यात मिश्रित किंवा मिक्स. या प्रकारात दोन म्यूचुअल फंडचे गुण आहेत असे आपण म्हणू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक म्हणजे इक्विटी म्यूचुअल फंड आणि दूसरा डेट म्यूचुअल फंड. म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये पैसे हे काही प्रमाणात इक्विटि मध्ये तर काही प्रमाणात डेट (कर्ज) मध्ये गुंतवले जातात.

या सोबतच या म्यूचुअल फंड मध्ये पैसे सोन्यात पण गुंतवलेले असू शकतात.

हायब्रिड म्युच्युअल फंडचे प्रकार

हायब्रिड म्युच्युअल फंडचे प्रकार हे त्याच्या अंतर्भूत मालमत्ता म्हणजे असेट क्लासेस (Asset Classes) वर पडतात.

1. इक्विटि ओरिएंटेड हायब्रिड फंड

या प्रकारात इक्विटिचा हिस्सा 65 ते 70 % येव्हडा असतो. राहिलेला भाग डेट मध्ये गुंतवलेला असतो.

प्युअर इक्विटि म्यूचुअल फंड पेक्षा याचा परतावा स्थिर असतो कारण 30 ते 35% पैसे हे डेट मध्ये गुंतवलेले असतात.

यात दोन लघु प्रकार येतात.

  1. बॅलेन्स फंड
  2. आर्बिट्राज फंड

2. डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड

या प्रकारात डेट मध्ये गुंतवणूक जास्त असते. 60 ते 65% गुंतवणूक ही डेट मध्ये तर राहिलेला भाग हा इक्विटि मध्ये गुंतवलेला असतो.

यात जास्त पैसे डेट मध्ये गुंतवलेले असल्या मुळे कमी जोखीम आणि स्थिर परतावा मिळण्यास मदत होते. सोबतच काही प्रमाणात इक्विटि मध्ये पैसे असल्या मुळे बाजारातील तेजीचा फायदा उठवता येतो.

इक्विटि ओरिएंटेड हायब्रिड फंड पेक्षा यात जोखीम अगदी कमी असते.

थोडक्यात इक्विटि ओरिएंटेड हायब्रिड फंड मध्ये तुलनेने जास्त जोखीम पण जास्त परतावा (Returns) आणि डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड मध्ये तुलनेने कमी जोखीम पण थोडा कमी परतावा.

म्हणून तुमचे गुंतवणुकीचे ध्येय, कालावधी याचा विचार करून आपण म्यूचुअल फंड निवडू शकता.

3. आक्रमक हायब्रिड फंड (Aggressive Hybrid Fund) AHF

या प्रकारात 65 ते 80% गुंतवणूक ही इक्विटि मध्ये असते म्हणून याला आक्रमक (Aggressive) असे म्हणतात.

जास्त गुंतवणूक इक्विटि मध्ये असल्या मुळे परतावा चांगला मिळू शकतो पण जोखीम जासते असते.

4. कॉन्झर्व्हेटीव्ह हायब्रिड फंड

या प्रकारात 10 ते 25% रक्कम इक्विटि आणि 75 ते 90% रक्कम डेट मध्ये गुंतवलेली असते म्हणून याला कॉन्झर्व्हेटीव्ह फंड असेही म्हणतात.

हायब्रिड म्युच्युअल फंडचे फायदे

1. तुलनेने कमी जोखीम

हायब्रिड म्युच्युअल फंड हे जोखीम मुक्त नक्कीच नसतात. त्यांच्या मधील इक्विटि गुंतवणुकीचा हिस्सा किती आहे याच्यावर जोखीम ठरत असते.

पण निव्वळ इक्विटि म्यूचुअल फंड च्या तुलनेत या प्रकारात जोखीम जरा कमीच असते.

तरी आक्रमक हायब्रिड फंड हा प्रकार हायब्रिड म्युच्युअल फंड मधील सर्वात जोखमीचा पण सर्वात जास्त परतावा मिळवून देणारा प्रकार असे म्हणू शकतो.

जेव्हडी जास्त गुंतवणूक ही डेट मध्ये असणार तेव्हडे जोखीम कमी आणि परतावा पण कमी.

2. परतावा

परतावा हा तुम्ही कुठला हायब्रिड म्युच्युअल फंड निवडता या वर अवलंबून असेल.

मार्केट तेजी मध्ये असताना नक्कीच इक्विटि फंड जास्त परतावा देतात पण हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये डेट मध्ये पण गुंतवणूक असल्या मुळे बाजारातील मंदीच्या काळात स्थिर परतावा मिळण्यास मदत होते.

3.गुंतवणुकीचे विविधीकरण (Diversification)

हायब्रिड म्यूचुअल फंड किंवा कुठल्या ही म्यूचुअल फंड मध्ये आपले पैसे एक पेक्ष्या जास्त ठिकाणी गुंतलेले असतात, म्हणून गुंतवणुकीचे विविधीकरण होते.

अधिक माहिती साठी AMFI च्या संकेत स्थळाला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top