चांगला स्टॉक कसा निवडावा? | How to Select Good Stock in Marathi
नमस्कार मित्रांनो! आज आपण शेअर बाजारातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे ‘चांगला स्टॉक कसा निवडावा? (How to select good stock in Marathi)’. मित्रांनो, स्टॉक निवडताना आपण साधारणतः दीर्घकालीन (Long Term) गुंतवणुकीच्या उद्देशानेच विचार केला पाहिजे.
कुठलाही स्टॉक निवडताना सर्वात बेसिक विचार आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे ‘भारताची इकॉनॉमी (Economy) कशी कामगिरी करत आहे?’. मित्रांनो, सध्या भारताची अर्थव्यवस्था जबरदस्त तेजीत आहे, आणि पुढील अनेक वर्षे ती अशीच वेगाने वाढण्याचा अंदाज आहे.
भविष्याचा विचार कसा करावा? (Top-Down Approach)
भारताच्या अर्थव्यवस्थेनंतर आपल्याला हे पाहायचे असते की, देशातील कोणत्या ‘सेक्टर’ (Sector) किंवा क्षेत्रातील कंपन्या चांगली ग्रोथ दाखवत आहेत.
आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला कसं समजणार? तर खूप सोपे आहे. मोबाईलवर दुसरा टाईमपास करण्यापेक्षा आपण बातम्यांमध्ये किंवा बजेटमध्ये कोणत्या घोषणा होत आहेत, याकडे लक्ष द्यायचे आहे.
एक उदाहरण समजून घेऊ:
समजा, यंदाच्या बजेटमध्ये सरकारने ‘रस्ते आणि हायवे’ बांधण्यासाठी भरघोस निधी दिला. आता हायवे म्हटले की तुम्हाला लगेच क्लिक झाले पाहिजे की, रस्ते बनवण्यासाठी ‘सिमेंट आणि स्टील’ लागणार (म्हणजे हे स्टॉक्स तेजीत येणार). त्यानंतर रस्ते पूर्ण झाल्यावर त्यावर वाहने धावणार, म्हणजे त्यांना ‘पेट्रोल/बॅटरी आणि टायर्स’ लागणार (म्हणजे ऑटो आणि टायर स्टॉक्स वाढणार). सोबतच हायवेच्या बाजूला हॉटेल्स आणि इमारती उभ्या राहणार, म्हणजेच ‘रिअल इस्टेट’ सेक्टरला फायदा होणार.
असा ब्रॉड आणि ‘लिंक’ लावणारा विचार आपल्याला करावा लागेल, जेणेकरून तुमचे गुंतवणुकीचे ‘लॉजिक’ तयार होईल.
स्टॉक निवडताना वापरायचे 8 महत्त्वाचे निकष
तुम्ही कोणतीही कंपनी (उदा. सिमेंट इंडस्ट्री) निवडल्यानंतर, त्या क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी शोधण्यासाठी तुम्हाला खालील 8 निकषांवर (Parameters) सर्व कंपन्यांची तुलना करावी लागते.
यासाठी तुम्ही Screener.in या फ्री वेबसाईटचा वापर करू शकता. स्क्रीनरवर तुम्हाला खालील सर्व माहिती एका सेकंदात मिळेल.
| क्र. | निकष (Parameter) | तो कसा असावा? (नियम) |
|---|---|---|
| 1 | बाजार भांडवल (Market Cap) | नेहमी जास्त असावे (लार्ज कॅप सुरक्षित असतात). |
| 2 | विक्री वाढ (Sales Growth) | मागील 3-5 वर्षांत सातत्याने वाढत असावी. |
| 3 | फ्री कॅश फ्लो (FCF) | पॉझिटिव्ह (+) आणि जास्त असावा. |
| 4 | कर्ज (Debt to Equity) | नेहमी कमी असावे (शक्यतो 1 च्या आत). |
| 5 | रिटर्न ऑन इक्विटी (ROE) | किमान 15% पेक्षा जास्त असावा. |
| 6 | P/E Ratio | इंडस्ट्रीच्या सरासरीपेक्षा कमी असावा (स्वस्त). |
| 7 | प्रती शेअर कमाई (EPS) | दरवर्षी वाढत जाणारी असावी. |
| 8 | मोट (Economic Moat) | कंपनीचा ब्रँड किंवा ‘खासियत’ मजबूत असावी. |

हे निकष सविस्तर समजून घेऊया:
1. बाजार भांडवल (Market Capitalization)
बाजार भांडवल म्हणजे कंपनीचा आकार. नवीन गुंतवणूकदारांनी नेहमी मोठी ‘मार्केट कॅप’ असलेल्या (Large Cap) कंपन्यांची निवड करावी, कारण त्या अधिक स्थिर आणि सुरक्षित असतात. (सविस्तर माहिती: मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय?)
2. विक्री वाढ (Sales Growth)
सेल्स ग्रोथ म्हणजे वेळेनुसार कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत होणारी वाढ. एखाद्या कंपनीचा माल बाजारात किती खपतोय, हे यावरून समजते. ही वाढ जेवढी जास्त, कंपनी तेवढी चांगली.
3. फ्री कॅश फ्लो (Free Cash Flow)
कंपन्या जो व्यवसाय करतात त्यातून त्यांना पैसे मिळतात. सर्व खर्च आणि टॅक्स वजा केल्यानंतर कंपनीच्या हातात जी ‘कॅश’ (रोख रक्कम) शिल्लक राहते, त्याला ‘फ्री कॅश फ्लो’ म्हणतात. तो नेहमी पॉझिटिव्ह आणि जास्त असावा.
4. डेट टू इक्विटी रेशो (Debt to Equity)
यामध्ये प्रामुख्याने कंपनीने घेतलेले कर्ज आणि कंपनीने स्वतःच्या खिशातून टाकलेले पैसे यांचे प्रमाण तपासले जाते. डेट टू इक्विटी रेशो हा नेहमी 1 च्या आत असावा. (जास्तीत जास्त 2 पर्यंत चालेल). कर्जाचा बोजा जेवढा कमी, तेवढी कंपनी मजबूत!
5. रिटर्न ऑन इक्विटी (ROE)
ROE म्हणजे कंपनीने शेअरहोल्डर्सच्या 100 रुपयांच्या भांडवलावर किती टक्के नफा कमवून दिला. साधारणतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी 15% पेक्षा जास्त ROE असणाऱ्या कंपन्या उत्तम मानल्या जातात. (सविस्तर माहिती: ROE म्हणजे काय?)
6. P/E Ratio (Price to Earning Ratio)
P/E Ratio आपल्याला हे ओळखण्यास मदत करतो की एखादा स्टॉक ‘स्वस्त’ मिळत आहे की ‘महाग’. शेअर खरेदी करताना याची तुलना नेहमी त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांशी करा. (सविस्तर माहिती: PE Ratio म्हणजे काय?)
ईपीएस म्हणजे कंपनी एका शेअरमागे किती रुपये नफा (Profit) कमवत आहे. मागील 3 ते 5 वर्षांचा ईपीएस जर सातत्याने वाढत असेल, तर तो एक अतिशय चांगला स्टॉक आहे असे समजावे. (सविस्तर माहिती: EPS म्हणजे काय?)
8. मोट (Economic Moat)
‘मोट’ म्हणजे या कंपनीत काही ‘खास’ आहे का? ज्यामुळे दुसरी नवीन कंपनी त्यांना सहजासहजी हरवू शकणार नाही. उदा. UltraTech Cement ही भारतातील सर्वात मोठी सिमेंट तयार करणारी कंपनी आहे, किंवा Asian Paints चे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अफाट आहे. हा त्या कंपन्यांचा ‘मोट’ (मजबूत किल्ला) झाला.
मित्रांनो, कुठल्याही स्टॉकचे ॲनालिसिस करत असताना नेहमी या 8 निकषांवर कंपन्यांना तपासा (Filter करा) आणि जो स्टॉक या परीक्षेत सर्वात पुढे राहील, त्याचीच आपल्या पोर्टफोलिओसाठी निवड करा.
जर तुम्हाला स्टॉक निवडण्याबद्दल अजून काही शंका असतील, तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!
