PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना | PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025

PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025: नमस्कार मित्रांनो! आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी युवांसाठी मोठी रोजगार योजना जाहीर केली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. या योजनेंतर्गत सुमारे ₹1 लाख कोटींची प्रचंड अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर झाली आहे.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने अंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून ₹15,000 थेट लाभ देण्याची तरतूद या योजनेत असणार आहे. ही योजना आजपासून (15 ऑगस्ट 2025) लागू झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा उद्देश काय? | PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025

  • भारतातील तरुणांना औपचारिक (formal) रोजगारात आणणे
  • पहिली नोकरी घेताना येणारा आर्थिक ताण कमी करणे
  • आणि नोकरी निर्मितीला वेग देणे

सरकारचे लक्ष्य किमान 3 कोटी तरुणांना या योजनेचा फायदा देण्याचे आहे.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना प्रमुख वैशिष्ट्ये

  • मोठा निधी: एकूण अंदाजे ₹1 लाख कोटी अर्थसंकल्पीय तरतूद.
  • थेट लाभ (DBT): खाजगी क्षेत्रात “पहिली नोकरी” मिळालेल्या पात्र तरुणाला ₹15,000 पर्यंत प्रोत्साहन.
  • तात्काळ अंमलबजावणी: योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू.
  • कॅबिनेट पार्श्वभूमी: या योजनेस 1 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती (आज त्याची देशव्यापी अंमलबजावणी जाहीर).

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना पात्रता

प्राथमिक माहितीप्रमाणे (अधिकृत तपशील लवकरच सविस्तर येतील):

  • जॉइनिंग तारीख: 15 ऑगस्ट 2025 नंतर तुम्ही नवी नोकरी जॉइन केलेली असावी.
  • संस्था: तुमची कंपनी EPFO-नोंदणीकृत असावी.
  • मासिक एकूण वेतन (Gross Wages): ₹1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • UAN निर्मिती: UMANG अ‍ॅपवर Aadhaar-आधारित फेस ऑथेंटिकेशन करून UAN (EPFO) तयार करणे अपेक्षित.
  • हप्त्यांची अट: कमीतकमी 6 महिने नोकरी टिकविल्यावर पहिला हप्ता; 12 महिने आणि Financial Literacy Training पूर्ण केल्यावर दुसरा हप्ता देण्याची तरतूद सुचवली आहे.

नोंद: वरील निकष प्राथमिक रिपोर्ट्सवर आधारित आहेत; अधिकृत सविस्तर नियमावली EPFO/श्रम मंत्रालय कडून प्रसिद्ध झाल्यावर अंतिम मानली जाईल.

या योजनेचा कोणाला फायदा होईल?

पदवीधर, डिप्लोमा, ITI धारक तसेच पहिली औपचारिक नोकरी घेणारे तरुण/तरुणी. शहरांसोबतच ग्रामीण भागातील EPFO-नोंदणीकृत उद्योगांमध्ये सामील होणाऱ्यांनाही लाभ.

अर्ज प्रक्रिया कशी असेल?

सर्वात अगोदर EPFO मधील UAN तयार करा (UMANGवर Aadhaar फेस-ऑथेंटिकेशन). त्यानंतर 15 ऑगस्ट 2025 नंतर EPFO-नोंदणीकृत कंपनीत जॉइन करा. नोकरी 6–12 महिने टिकवल्यावर योजनेनुसार हप्ते DBT द्वारे तुमच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होतील.

नियोक्ता (Employer) (म्हणजेच तुमच्या कंपनीचा) Shram Suvidha Portal मार्फत EPFO कोड असणे आवश्यक आणि EPFO employer पोर्टलवर नोंदणी/कंप्लायन्स अद्ययावत ठेवणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे (संभाव्य)

मित्रांनो ही यादी फक्त संभाव्य आहे अजून अधिकची माहिती अजून येणे बाकी आहे.

  • Aadhaar (UAN/ऑथेंटिकेशनसाठी),
  • EPFO/UAN तपशील
  • बँक खाते माहिती (DBTसाठी).

अधिकृत यादी EPFO/PIB कडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित होईल.

मित्रांनो प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही तरुणांना प्रोत्साहन देणारी मोठी योजना आहे. या योजनेत तब्बल ₹1 लाख कोटींची तरतूद केलेली असून, ₹15,000 थेट लाभ आणि EPFO-आधारित फ्रेमवर्कमुळे औपचारिक रोजगारात प्रवेश वेगाने वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अधिकृत आणि सविस्तर GR जसे प्रसिद्ध होतील, तशी अजून माहिती मिळण्यास मदत होईल. तोपर्यंत वरील तोपर्यंत वरील माहिती तुम्ही वापरू शकता.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील सर्व आर्थिक मुद्दे आमच्या जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या 15 ऑगस्ट 2025 च्या भाषणातील अर्थकारण आणि बाजारपेठेवरील महत्त्वाच्या घोषणा या लेखात वाचू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top