रिटायरमेंट कॅल्क्युलेटर
Best Retirement Calculator in Marathi | रिटायरमेंट कॅल्क्युलेटर
Retirement Calculator in Marathi: नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी जागतिक दर्जाचे रिटायरमेंट कॅल्क्युलेटर अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. मित्रांनो रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो, आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेऊनच आम्ही हे रिटायरमेंट कॅल्क्युलेटर तयार केले आहे.
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. या साठी तुम्ही आमचा रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय हा लेख नक्की वाचा.
How to use Retirement Planning Calculator
मित्रांनो आमचे रिटायरमेंट प्लॅनिंग कॅल्क्युलेटर वापरणे खूपच सोपे आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या रकाण्यात तुमचे सध्याचे वय टाकायचे आहे. त्यानंतर पुढील रकाण्यात तुम्हाला कधी रिटायरमेंट घ्यायची आहे ते वय टाकायचे आहे.
त्या नंतर जर तुम्ही सध्या काही पैसे बचत करून ठेवले असतील तर ते टाकायचे आहे. समजा तुम्ही काहीच बचत केलेली नसेल तर त्या रकाण्यात तुम्ही शून्य पण एंटर करू शकता.
त्या नंतर पुढचा रकाना आहे मासिक योगदानाचा म्हणजेच तुम्ही महिन्याला किती किती रुपये रिटायरमेंट प्लॅनिंग साठी बचत करू पाहत आहात.
पुढील रकाना आहे अपेक्षित वार्षिक परतावा, यात आम्ही सरासरी 7 हा आकडा अगोदरच टाकलेला आहे.
जर तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमच्या परतावा मिळण्या नुसार बदल करू शकता. पण शक्यतो बऱ्याच रिटायरमेंट योजना या सरासरी 7% परतावा देतात.
त्या नंतर शेवटचा रकाना हा महागाई दराचा आहे तो ही आम्ही सरासरी 6% एवढा पकडलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी शून्य पण एंटर करू शकता.
महागाई दर 6% पकडल्या मुळे आपला परतावा कमी जरूर होईल पण आजपासून 10, 15 वर्षा नंतर पैश्याची खरी खुरी किंमत किती असेल याचा अंदाज येतो.