What is GIFT Nifty

गिफ्ट निफ्टी म्हणजे काय? | What is GIFT Nifty

What is GIFT Nifty: नमस्कार मित्रांनो आज आपण गिफ्ट निफ्टीविषयी चर्चा करणार आहोत. गिफ्ट निफ्टी म्हणजे नेमके काय, त्याचे महत्त्व, आणि त्याचे भविष्य यावर सविस्तर चर्चा करूया.

गिफ्ट निफ्टी म्हणजे काय? | What is GIFT Nifty

पूर्वी गिफ्ट निफ्टीला सिंगापूर निफ्टी (SGX निफ्टी) म्हणून ओळखले जायचे. हा निफ्टी आधी सिंगापूरमध्ये ट्रेड होत असे. परंतु 2018 साली सिंगापूर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांच्यातील करार संपुष्टात आला. त्यानंतर 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये नवीन करार झाला आणि या निफ्टीला गांधीनगर, गुजरात येथील गिफ्ट सिटी मध्ये हलवण्यात आले. तेथून या नवीन प्रणालीला गिफ्ट निफ्टी असे नाव देण्यात आले.

गिफ्ट निफ्टी फूल फॉर्म

GIFT NIFTY = Gujarat International Finance Tec-City Nifty

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“गिफ्ट” म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी, जी गांधीनगर, गुजरात येथे आहे. हा एक विशेष आर्थिक झोन (Special Economic Zone – SEZ) आहे, जो आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांसाठी विकसित केला गेला आहे.

गिफ्ट निफ्टी (Gujarat International Finance Tec-City) मध्ये कार्यरत आहे. या प्रणालीमुळे भारतीय बाजारपेठ अधिक खुली झाली आहे. गिफ्ट निफ्टी चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 21 तासांचा ट्रेडिंग कालावधी.

वेळापत्रक

  • सकाळी 6:30 वाजता बाजार उघडतो आणि 3:40 वाजता पहिले सत्र संपते.
  • दुसरे सत्र 4:30 वाजता सुरू होते आणि रात्री 2:45 वाजता संपते.
    यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना भारतातील बाजारात गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.

गिफ्ट निफ्टीचा फायदा

गिफ्ट निफ्टीच्या माध्यमातून आता भारतीय शेअर मार्केट आणि जागतिक गुंतवणूकदार यांच्यातील अंतर कमी झाले आहे. यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स ची सोय सुद्धा उपलब्ध आहे.

उपलब्ध ऑप्शन्स:

  1. निफ्टी 50
  2. बँक गिफ्ट निफ्टी
  3. गिफ्ट IT निफ्टी
  4. गिफ्ट निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस

मर्यादा

सध्या या बाजारात फक्त मोठे गुंतवणूकदार आणि 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकणारे गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतात. रिटेल गुंतवणूकदारांसाठी अजूनही हे बाजार उघडलेले नाही.

निष्कर्ष

गिफ्ट निफ्टी म्हणजे जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजारात प्रवेशाचा एक नवा मार्ग आहे. यामुळे भारतातील गुंतवणूक बाजारपेठ आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक मजबूत होण्यास नक्कीच मदत होईल.

जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर जरूर शेअर करा आणि कोंमेंट्स नक्की करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top