Site icon Market Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Mutual funds information in Marathi

Mutual funds information in Marathi

Mutual funds information in Marathi : नमस्कार मित्रांनो कसे आहात? आज आपण या लेखा मध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि सोबतच म्यूचुअल फंड बद्दल सर्व काही माहिती ही मराठी मध्ये समजून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Mutual funds information in Marathi

मित्रांनो म्यूचुअल फंड मध्ये म्यूचुअल म्हणजे परस्पर आणि फंड म्हणजे निधी. परस्पर म्हणजे दोन किंवा दोन पेक्ष्या जास्त. सोप्या शब्दात सांगायचे तर दोन किंवा दोन पेक्ष्या जास्त लोकांनी आपआपसात एकत्रित येऊन केलाला फंड म्हणजेच म्यूचुअल फंड.

अगोदर आपण म्यूचुअल फंड ची व्याख्या समजून घेऊ आणि नंतर एका उदाहरणाद्वारे सोप्या भाषेत म्यूचुअल फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.

व्याख्या-

म्यूचुअल फंड हा अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड असतो. ज्या मध्ये गुंतवलेले एकूण पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्यासाठी वापरले जातात आणि गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न केला जातो.

चला आता आपण एक उदाहरण घेऊन म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे समजून घेऊ.

समजा तुम्ही आणि तुमचे तीन मित्र असे चार लोकांना एक मोकळा प्लॉट पसंद पडला, ज्याची किंमत आहे 40 लाख रुपये.

पण तुमच्या पैकी कोणाकडेच एक रक्कमि 40 लाख नव्हते. मग तुम्ही 10 लाख रुपये प्रतेकी असे मिळून 40 लाखात तो प्लॉट खरेदी केला.

या खरेदी केलेल्या जागेवर मस्त पैकी गाळे काढले आणि तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम यायला चालू झाली.

म्हणजेच तुम्ही आपआपसात एकत्र येऊन एक 40 लाखांचा फंड तयार केला आणि त्याची प्लॉट मध्ये गुंतवणूक केली.

आता आपण वरती प्लॉट चे उदाहरण घेतले पण जरूरी नाही की हा गोळा केलेला फंड प्लॉट मध्येच गुंतवावा, तो फंड मधला पैसा तुम्ही शेअर मार्केट मध्ये किंवा इतर कुठल्या पण ठिकाणी पण गुंतऊ शकता.

फरक फक्त येव्हडाच की म्यूचुअल फंड मध्ये हा गोळा झालेला पैसा म्हणजेच फंड सांभाळण्यासाठी एक फंड मॅनेजर निश्चित केलेला असतो.

हा फंड मॅनेजर गोळा केलेला पैसा कुठल्या शेअर मध्ये किती काळासाठी कधी गुंतवायचा हे ठरवत असतो.

साहजिकच त्या फंड मॅनेजरला शेअर मार्केट बद्दल सर्व ज्ञान असते.

मित्रांनो भरतामध्ये असे अनेक म्यूचुअल फंड्स आहेत. अनेक मोठ्या मोठ्या कंपनी मार्फत असे म्यूचुअल फंड चालवले जातात. जसे की एचडीयफसी म्यूचुअल फंड, एसबीआय म्यूचुअल फंड, पराग पारिख म्यूचुअल फंड.

या मध्ये तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक पण पैसे गुंतऊ शकतात.

या सर्व गोष्टींवर्ती नजर ठेवण्यासाठी एक रेग्युलेटर पण असतो आणि भारतात या रेग्युलेटरच नाव आहे सेबी (SEBI-Securities and Exchange Board of India).

म्युच्युअल फंडाचे प्रकार

मित्रांनो म्यूचुअल फंड चे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात.

मित्रांनो हे सर्व म्यूचुअल फंडचे प्रकार आम्ही दुसऱ्या वेगळ्या लेखामध्ये एकदम सविस्तररित्या समजाऊन सांगितलेले आहेत. त्या त्या म्यूचुअल फंडवर्ती क्लिक करून तुम्ही त्यांच्या बद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता.

म्युच्युअल फंड फायदे मराठी

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी?

म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत.

  1. एसआयपी
  2. एकठोक (Lumsum)

मित्रांनो चांगला म्यूचुअल फंड कसा निवडायचा याबद्दल सर्व माहिती आम्ही आमच्या चांगला म्यूचुअल फंड कसा निवडावा या लेखात दिलेली आहे, हा लेख तुम्ही नक्की वाचा.

मित्रांनो एसआयपी बद्दल एसआयपी म्हणजे काय या लेखा मध्ये अगदी सविस्तर रित्या माहिती दिलेली आहे. कृपया तुम्ही तो लेख नक्की वाचा.

म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी हा पर्याय निवडला पाहिजे, याबद्दल पण सविस्तर रित्या माहिती एसआयपी च्या लेखामध्ये दिलेली आहे.

Exit mobile version